Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अवैध मावा तयार करणाऱ्या कारखान्यावर एलसीबीचा छापा; १९ वर्षांच्या तरुणासह १ लाख ५ हजारांचा मुद्देमाल जप्त

10/09/2026

‘सध्याच्या राजकीय स्थितीमुळे लोकशाहीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह’ : प्रा. डॉ. शरद बाविस्कर

10/09/2026

आज गुरुवार, १० सप्टेंबर जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

10/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » कत्तलखाने उध्वस्त करूनही संगमनेरात गोवंश कत्तली सुरूच! अहिल्यानगर एलसीबीच्या छाप्यात १२०० किलो गोमांसासह नऊ लाखाचा मुद्देमाल हस्तगत
गुन्हेगारी

कत्तलखाने उध्वस्त करूनही संगमनेरात गोवंश कत्तली सुरूच! अहिल्यानगर एलसीबीच्या छाप्यात १२०० किलो गोमांसासह नऊ लाखाचा मुद्देमाल हस्तगत

राज्यात गोवंश हत्या बंदी कायदा लागू झाल्यानंतर आतापर्यंत शेकड्याने कारवाया येथील कत्तलखान्यावर करण्यात आल्या आहेत. वारंवार त्याच-त्याच कत्तलखान्यांवर कारवाया करून तेच-तेच आरोपी निष्पन्न झाले आहेत.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar27/02/2025Updated:27/02/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, दि. २७ फेब्रुवारी – 

मोठा गाजावाजा करत संगमनेर नगरपरिषदेने पोलिसांच्या मदतीने संगमनेरमधील पाच कत्तलखाने नेस्तनाबूत केले असले तरी देखील संगमनेरात अद्यापही गोवंश हत्या सुरूच आहे. संगमनेरमधील कत्तलखान्यावर थेट अहिल्यानगर एलसीबीने कारवाई केली आहे. मंगळवारी करण्यात आलेल्या या कारवाईत १२०० किलो गोमांसासह तब्बल नऊ लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

संगमनेरमधील जमजम कॉलनीमध्ये अब्दुल समद कुरेशी याच्या पत्राच्या शेडमध्ये गोवंश जनावरांची कत्तल सुरू असल्याची व कत्तलीसाठी जनावरे डांबून ठेवल्याची माहिती एनसीबीच्या पथकाला मिळाली होती. पथकातील पोलीस अंमलदार गणेश लोंढे, अशोक लिपणे, मनोज लातूरकर, विशाल तनपुरे यांनी माहिती मिळालेल्या ठिकाणी छापा टाकला.

त्यावेळी एका पत्राच्या शेडमध्ये कत्तलीच्या उद्देशाने निर्दयतेने गोवंश जनावरे डांबून ठेवत ४-५ लोक जनावरांची कत्तल करत असल्याचे दिसून आले. पथकाला बघताच सर्वांनी तेथून पळ काढला. कारवाईदरम्यान पोलीस पथकाने एकाला ताब्यात घेतले. तसेच या कारवाईमध्ये पोलिसांनी ३ लाख ६० हजार रुपये किमतीचे कत्तल केलेले गोमांस, ६० हजार रुपये किमतीच्या तीन गोवंश जातीच्या कालवडी, वजन काटा, कत्तलीसाठी वापरण्यात आलेली लोखंडी कुऱ्हाड, सुरा, टाटा कंपनीचा टेम्पो (एमएच 14 एफटी 1450) असा ९ लाख २२ हजार ७०० रुपये किमतीचा मुद्देमाल घटनास्थळावरून हस्तगत केला.

पोलिसांनी पकडलेल्या आरोपीचे नाव मुनावर मेहबूब कुरेशी (वय ४०, रा. जमजम कॉलनी, गल्ली क्रमांक २, संगमनेर जि. अहिल्यानगर) असे असून त्याच्या अन्य साथीदारांची नावे अदनान साऊथ कुरेशी, तबरेज याकूब कुरेशी अशी असून अन्य दोघांची नावे समजू शकली नाही. हे सर्व आरोपी फरार असून आरोपींनी अब्दुल समद जावेद कुरेशी याच्या सांगण्यावरून गोवंश जनावरांची कत्तल केल्याची माहिती दिल्याने सर्व आरोपींविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल विशाल तनपुरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर १३३ प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम ११, ३ महाराष्ट्र पशुसंवर्धन अधिनियम ५(ए), ५(बी), ५(सी), ९, भारतीय न्याय संहिता कलम २७१, ३२५, ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला पोलीस नाईक सुजाता थोरात या करत आहे.

राज्यात गोवंश हत्या बंदी कायदा लागू झाल्यानंतर आतापर्यंत शेकड्याने कारवाया येथील कत्तलखान्यावर करण्यात आल्या आहेत. वारंवार त्याच-त्याच कत्तलखान्यांवर कारवाया करून तेच-तेच आरोपी निष्पन्न झाले आहेत. मात्र या आरोपींविरोधात पोलीस अथवा प्रशासनाने कोणतीही ठोस भूमिका घेतलेली दिसत नाही. अवैध कत्तलखाने बंद करावेत या मागणीसाठी वेळोवेळी भाजपच्या नेत्यांनी पदाधिकाऱ्यांनी आणि हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलने केली. या आंदोलनामुळे येथील कत्तलखान्यांचा विषय चव्हाट्यावर आला. मात्र आता केंद्रात आणि राज्यात देखील सरकार असताना कोणतेही आंदोलन अथवा ठाम कारवाई या कत्तलखान्याविरोधात होताना दिसत नाही. मध्यंतरी येथील शिवसेनेचे आमदार अमोल खताळ यांनी देखील या कत्तलखान्यांविरोधात भूमिका घेतली होती, मात्र त्याचेही परिणाम अद्यापही समोर आलेले दिसत नाही.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,213
कत्तलखाना छापा गोवंश हत्या बंदी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

अवैध मावा तयार करणाऱ्या कारखान्यावर एलसीबीचा छापा; १९ वर्षांच्या तरुणासह १ लाख ५ हजारांचा मुद्देमाल जप्त

10/09/2026

धांदरफळ येथे महावितरण कर्मचाऱ्याला मारहाण; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

08/09/2026

कोपरगाव आणि संगमनेरमधील चैन स्नॅचिंगचे गुन्हे उघडकीस; दोन सराईत चोरट्यांकडून ५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत, अहिल्यानगर एलसीबीची कामगिरी

08/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

अवैध मावा तयार करणाऱ्या कारखान्यावर एलसीबीचा छापा; १९ वर्षांच्या तरुणासह १ लाख ५ हजारांचा मुद्देमाल जप्त

By Annant Ppangarkar10/09/20260

annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पारनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत…

‘सध्याच्या राजकीय स्थितीमुळे लोकशाहीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह’ : प्रा. डॉ. शरद बाविस्कर

10/09/2026

आज गुरुवार, १० सप्टेंबर जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

10/09/2026

आंदोलनाची हवा काढण्यासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट? : अमोल शेलकर यांचा घणाघात, पालकमंत्री व लोकप्रतिनिधींवर संगमनेरच्या हक्काची रेल्वे हिरावल्याचा थेट आरोप; कागदपत्रे सार्वजनिक करण्याचे आव्हान

09/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.