Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरमध्ये २६,५८७ रद्द मतदारांची गावनिहाय यादी जाहीर करण्याची अमोल शेलकर यांची मागणी; प्रशासनाकडे पारदर्शकता आणण्याचा आग्रह

11/09/2026

संगमनेर नगरपरिषदेच्या पथ विक्रेता तक्रार निवारण समितीवर श्रीनिवास पगडाल आणि कृष्णा वालझाडे यांची निवड

11/09/2026

आज शुक्रवार ११सप्टेंबर — असे आहे आजच्या दिवसाचे राशिभविष्य

11/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » मोठ्या टीकेनंतर स्वारगेट अत्याचार प्रकरणातील नराधम आरोपीला अटक करण्यात पोलीस यशस्वी, मध्यरात्री गावातूनच केली अटक
गुन्हेगारी

मोठ्या टीकेनंतर स्वारगेट अत्याचार प्रकरणातील नराधम आरोपीला अटक करण्यात पोलीस यशस्वी, मध्यरात्री गावातूनच केली अटक

आरोपी दत्ता गाडे हा पुणे जिल्ह्यातील शिरुरमधील रहिवासी असून तो गावातील एका उसाच्या शेतात लपलेला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी शेतात सर्च ऑपरेशन सुरू केलं.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar28/02/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

पुणे, दि. २८ फेब्रुवारी 

२६ वर्षीय तरुणीवर स्वारगेट बस स्थानकामध्ये उभ्या असलेल्या शिवशाही बस मध्ये अत्याचार करणाऱ्या आरोपीला मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास पकडण्यात पुणे पोलिसांना यश आले आहे. पुणे पोलिसांनी बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेला त्याच्या गावातून अटक केल्याची माहिती पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी दिली.

स्वारगेट बस स्थानकात एका २६ वर्षीय तरुणीवर बसमध्येच बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. या प्रकरणी आरोपी दत्ता गाडे हा दोन दिवसांपासून फरार होता. फरार असलेल्या आरोपीला शोधण्यासाठी पोलिसांनी आरोपीवर १ लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं. बड्या राजकीय नेत्याच पोरग तीन तासात सापडतं आणि अत्याचार करणारा नराधम आरोपी पोलिसांना सापडत नाही, यावरून स्वारगेट बस स्थानकातील घटनेवरून सरकारवर जोरदार टीका होत होती. हे पोलिसांचं अपयश असल्याचा आरोप करण्यात येत होता.

या प्रकरणातील आरोपी दत्तात्रय रामदास गाडे (वय ३५ रा. शिक्रापूर) याला त्याच्या गावातून अटक करण्यात आली आहे. त्याच्या शोधासाठी पुणे पोलिसांनी विविध पथकं रवाना केली. तब्बल १८ पथक विविध ठिकाणी त्याचा शोध घेत होती. १०० पोलिस, श्वान पथक आणि ड्रोन कॅमेराची नजर, तरीही नराधम दत्ता गाडे पोलिसांना सापडत नव्हता.

आरोपी दत्ता गाडे हा पुणे जिल्ह्यातील शिरुरमधील रहिवासी असून तो गावातील एका उसाच्या शेतात लपलेला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी शेतात सर्च ऑपरेशन सुरू केलं. ड्रोनच्याद्वारे पोलीस आरोपीचा शोध घेत होते. अखेर मध्यरात्री त्याला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.

मध्यरात्री एक ते दीड वाजण्याच्या सुमारास दत्ता गाडे हा एका कॅनॉलमध्ये झोपलेला आढळून आला. त्यामुळे त्याला पोलिसांच्या पथकांनी चारीबाजुंनी वेढा घातला. यावेळी नराधम दत्ता गाडे याला ड्रोनमधून पोलिसांनी उद्घोषणा करुन तुला वेढल्याचं सांगितलं. त्यामुळे नराधम दत्ता गाडेची पाचावर धारण बसली. पोलिसांनी वेळ न दवडता या नराधमाच्या मुसक्या आवळल्या, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली. दरम्यान या संदर्भात आरोपीला दुपारी न्यायालयात नेले जाणार असून पोलीस पत्रकार परिषद घेऊन सर्व माहिती देणार आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,720
दत्ता गाडे स्वारगेट बस स्थानक अत्याचार
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

अवैध मावा तयार करणाऱ्या कारखान्यावर एलसीबीचा छापा; १९ वर्षांच्या तरुणासह १ लाख ५ हजारांचा मुद्देमाल जप्त

10/09/2026

धांदरफळ येथे महावितरण कर्मचाऱ्याला मारहाण; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

08/09/2026

कोपरगाव आणि संगमनेरमधील चैन स्नॅचिंगचे गुन्हे उघडकीस; दोन सराईत चोरट्यांकडून ५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत, अहिल्यानगर एलसीबीची कामगिरी

08/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
निवडणूक

संगमनेरमध्ये २६,५८७ रद्द मतदारांची गावनिहाय यादी जाहीर करण्याची अमोल शेलकर यांची मागणी; प्रशासनाकडे पारदर्शकता आणण्याचा आग्रह

By Annant Ppangarkar11/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – संगमनेर विधानसभा मतदारसंघातील विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (SIR) प्रक्रियेनंतर…

संगमनेर नगरपरिषदेच्या पथ विक्रेता तक्रार निवारण समितीवर श्रीनिवास पगडाल आणि कृष्णा वालझाडे यांची निवड

11/09/2026

आज शुक्रवार ११सप्टेंबर — असे आहे आजच्या दिवसाचे राशिभविष्य

11/09/2026

तरुणांच्या प्रश्नांवर उत्तरदायित्व मागण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचा उपक्रम; ‘जय भीम Gen-Z’ टाउनहॉल मालिकेचा टीझर प्रदर्शित

10/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.