Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरमध्ये २६,५८७ रद्द मतदारांची गावनिहाय यादी जाहीर करण्याची अमोल शेलकर यांची मागणी; प्रशासनाकडे पारदर्शकता आणण्याचा आग्रह

11/09/2026

संगमनेर नगरपरिषदेच्या पथ विक्रेता तक्रार निवारण समितीवर श्रीनिवास पगडाल आणि कृष्णा वालझाडे यांची निवड

11/09/2026

आज शुक्रवार ११सप्टेंबर — असे आहे आजच्या दिवसाचे राशिभविष्य

11/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » एसटी बसमध्ये बसलेल्या महिलेच्या सीटवर मंगळसूत्रातील मनी पडले आणि पुढे घडले असे काही…
गुन्हेगारी

एसटी बसमध्ये बसलेल्या महिलेच्या सीटवर मंगळसूत्रातील मनी पडले आणि पुढे घडले असे काही…

अज्ञात चोरट्याविरुद्ध गळ्यातील दोन तोळे वजनाचे मंगळसूत्र चोरून नेल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास महिला पोलीस कर्मचारी सविता वायकर करत आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar28/02/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, दि. २८ फेब्रुवारी 

एसटी बसमधून प्रवास करणाऱ्या महिलेच्या सीटवर गळ्यातील मंगळसूत्रामधील मनी पडले असता महिलेला आपल्या गळ्यातील दोन तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र गायब झाल्याचे लक्षात आले. गुरुवारी (२७ फेब्रुवारी) संगमनेर बस स्थानकावर हा प्रकार घडला.

संगमनेर बस स्थानकामधून महिलांच्या गळ्यातील दागिने वारंवार चोरी जात आहे. दागिने चोरट्यांचा शोध लागत नसल्याने चोरट्यांचे मनोधैर्य वाढले असून दिवसाढवळ्या ते महिलांच्या गळ्यातील दागिन्यांच्या चोऱ्या करत आहे. दागिने चोरट्यांसाठी संगमनेर बस स्थानक आणि बसस्थानकावरील गर्दी फायद्याची ठरत आहे. बस स्थानकावर असलेल्या एखाद-दोन पोलिसांचा डोळा चुकवून बस स्थानकावरील सुरक्षारक्षकांच्या उपस्थितीतही चोऱ्या होऊ लागल्याने संगमनेरचे बस स्थानक महिलांसाठी असुरक्षित बनू लागले आहे.

संगमनेर तालुक्यातील पेमगिरी येथील एक महिला महाशिवरात्री निमित्ताने बुधवारी अकोले येथे आपल्या नातेवाईकांकडे गेली होती. गुरुवारी ती गावी जाण्यासाठी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास अकोल्याहून संगमनेरला परतली होती. संगमनेर बस स्थानकावर बसची वाट पाहत असताना साडेतीन वाजण्याच्या सुमारास पेमगिरीला जाण्यासाठी फलाटावर बस लागली होती.

बसमध्ये चढण्यासाठी शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी आणि लोकांची गर्दी होती. गर्दीत महिला कशीबशी बसमध्ये चढली आणि सीटवर बसल्यानंतर गळ्यातील मनी मंगळसूत्रामधील काही मनी सीटवर पडल्याचे महिलेच्या लक्षात आले. त्यामुळे महिलेने आपल्या गळ्यातील मंगळसूत्र बघितले असता गळ्यात मंगळसूत्र नव्हते. अज्ञात कोणीतरी गळ्यातील मंगळसूत्र तोडून चोरून नेल्याचे महिलेच्या लक्षात आले.

त्यामुळे संध्याकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास महिलेने संगमनेर शहर पोलीस स्टेशन गाठत याबाबत माहिती दिली. महिलेच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गळ्यातील दोन तोळे वजनाचे मंगळसूत्र चोरून नेल्याचा गुन्हा रजिस्टर नंबर १४५/२५ भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास महिला पोलीस कर्मचारी सविता वायकर करत आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,799
दागिने चोरी संगमनेर बस स्थानक
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

अवैध मावा तयार करणाऱ्या कारखान्यावर एलसीबीचा छापा; १९ वर्षांच्या तरुणासह १ लाख ५ हजारांचा मुद्देमाल जप्त

10/09/2026

धांदरफळ येथे महावितरण कर्मचाऱ्याला मारहाण; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

08/09/2026

कोपरगाव आणि संगमनेरमधील चैन स्नॅचिंगचे गुन्हे उघडकीस; दोन सराईत चोरट्यांकडून ५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत, अहिल्यानगर एलसीबीची कामगिरी

08/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
निवडणूक

संगमनेरमध्ये २६,५८७ रद्द मतदारांची गावनिहाय यादी जाहीर करण्याची अमोल शेलकर यांची मागणी; प्रशासनाकडे पारदर्शकता आणण्याचा आग्रह

By Annant Ppangarkar11/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – संगमनेर विधानसभा मतदारसंघातील विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (SIR) प्रक्रियेनंतर…

संगमनेर नगरपरिषदेच्या पथ विक्रेता तक्रार निवारण समितीवर श्रीनिवास पगडाल आणि कृष्णा वालझाडे यांची निवड

11/09/2026

आज शुक्रवार ११सप्टेंबर — असे आहे आजच्या दिवसाचे राशिभविष्य

11/09/2026

तरुणांच्या प्रश्नांवर उत्तरदायित्व मागण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचा उपक्रम; ‘जय भीम Gen-Z’ टाउनहॉल मालिकेचा टीझर प्रदर्शित

10/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.