Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

02/09/2026

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026

पोलिसांचा वाळू माफियांना मोठा धक्का; या दोन तालुक्यातून २० लाखांचा मुद्देमाल जप्त

02/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » खिशात नाही आणा आणि मला बाजीराव म्हणा… अशी राज्याची गत, महाराष्ट्र दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर – रोहित पवार
राजकारण

खिशात नाही आणा आणि मला बाजीराव म्हणा… अशी राज्याची गत, महाराष्ट्र दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर – रोहित पवार

सरकारकडे पैसा राहिलेला नाही आणि राज्य दिवाळखोरीकडे वाटचाल करत आहे. शिस्तप्रिय अर्थमंत्री अजित पवार आणि अभ्यासू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असूनही राज्याचे आर्थिक आरोग्य हाताबाहेर गेले आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar28/02/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

विशेष प्रतिनिधी / मुंबई

लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर महायुतीने लोकप्रिय योजनांच्या घोषणांचा पाऊस पाडून विधानसभा निवडणुकीत भरघोस यश मिळविले. त्यातही ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ गेमचेंजर ठरली. पण सत्तेत पुन्हा आल्यानंतर आर्थिक भाराची जाणीव झाल्याने महायुतीने थेट ३० टक्के खर्चकपात करण्याचा निर्णय घेतला. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे (NCP SP) आमदार रोहित पवार यांनी, सरकारी आकडेवारी शेअर करत महायुतीवर टीका केली आहे. राज्य दिवाळखोरीकडे वाटचाल करत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

सन २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी सुधारित अंदाजपत्रक निश्चित करताना, वित्त विभागाने प्रत्येक विभागाची खर्चमर्यादा ठरवून दिली आहे. त्यानुसार निवृत्ती वेतन, शिष्यवृत्ती, विद्यावेतन, सहाय्यक अनुदानित वेतन, कर्ज रक्कम कर्जाची परतफेड तसेच अंतर्लेखा हस्तांतरे या विभागांनाच १०० टक्के निधी खर्च करता येईल. याशिवाय, वेतनासाठी ९५ टक्के, पाणी, वीज, दूरध्वनी यासाठी ८० टक्के, कंत्राटी सेवांसाठी ९० टक्के, कार्यालयीन खर्च ८० टक्के, व्यावसायिक सेवांसाठी ८० टक्के खर्चमर्यादा निश्चित करण्यात आली आहे.

एनसीपीचे आमदार रोहित पवार यांनी ‘X’ या सोशल माडिया प्लॅटफॉर्मवर सरकारी आकडेवारी शेअर केली आहे. प्रकल्पाचा खर्च वाढवून राज्याच्या तिजोरीची लूट झाली असून आर्थिक बेशिस्तीने राज्याच्या तिजोरीची सरकारने वाट लावली आहे. वर्ष संपत आले तरी बजेटच्या ८.२३ लाख कोटी रुपयांपैकी केवळ ३.५६ लाख कोटी म्हणजे अर्थसंकल्पाच्या केवळ ४३ टक्के रक्कम खर्च झाली आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

तर, १.२४ लाख कोटी रुपयांच्या भांडवली खर्चापैकी केवळ ४८ हजार ९७४ कोटी म्हणजेच केवळ ४० टक्के खर्च झाला आहे. शालेय शिक्षण, महिला बालविकास, उच्च आणि तंत्रशिक्षण, दिव्यांग, अल्पसंख्याक, ओबीसी, आरोग्य या विभागांचा भांडवली खर्च शून्य टक्के तर मराठी भाषा, उद्योग-उर्जा-कामगार, शिक्षण या विभागांचा भांडवली खर्च अर्ध्या टक्क्याहूनही कमी आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.

याचा अर्थ सरकारकडे पैसा राहिलेला नाही आणि राज्य दिवाळखोरीकडे वाटचाल करत आहे. शिस्तप्रिय अर्थमंत्री अजित पवार आणि अभ्यासू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असूनही राज्याचे आर्थिक आरोग्य हाताबाहेर गेले आहे. हे सगळे बघता ‘खिशात नाही आणा आणि मला बाजीराव म्हणा’ अशीच या सरकारची स्थिती दिसत असल्याची खोचक टीकाही रोहित पवार यांनी केली आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,789
अजित पवार देवेंद्र फडणवीस रोहित पवार
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026

संगमनेर पालिकेचा अनोखा उपक्रम! १ ते २५ सप्टेंबरदरम्यान होणार प्रभागनिहाय बैठका; नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांच्या पुढाकाराने नागरिकांच्या प्रश्नांना थेट व्यासपीठ

29/08/2026

संगमनेरकरांच्या अभिप्रेत असलेलेच छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य-दिव्य स्मारक उभारणार! “दीड वर्षे खाती हातात असूनही वाढीव जागेचा प्रश्न सोडवला नाही; आता स्मारकाच्या कामात खोडा घालून संगमनेरकरांची दिशाभूल करू नका”

28/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
सांत्वन

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

By Annant Ppangarkar02/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: जवळेकडलग येथील अकरा वर्षीय बालक कृष्णा वसंत पवार याचा…

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026

पोलिसांचा वाळू माफियांना मोठा धक्का; या दोन तालुक्यातून २० लाखांचा मुद्देमाल जप्त

02/09/2026

सत्याचा आवाज, लेखणीचा पहारेकरी – ज्येष्ठ पत्रकार अनंत पांगारकर यांचा आंबेडकरी चळवळीच्यावतीने हृद्य सत्कार

02/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.