Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

हरेगाव येथे १९ सप्टेंबरला ‘ख्रिस्ती हक्क संघर्ष परिषद’; सुजात आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती

15/09/2026

मंगळवार, १५ सप्टेंबर रोजीचे राशीभविष्य… जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल

15/09/2026

माजी मंत्री बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांच्या निवासस्थानी गणरायाचे आगमन; पर्यावरणपूरक व त्रासमुक्त गणेशोत्सवाचे आवाहन

14/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » विजेचा खेळखंडोबा करून संगमनेरचे पाणी पूर्वेला नेले जात असल्याच्या शेतकऱ्यांच्या व्यथा… माजी मंत्री थोरात म्हणाले, चुकीच्या कामांवर आता जनतेला दबाव ठेवावा लागेल!
राजकारण

विजेचा खेळखंडोबा करून संगमनेरचे पाणी पूर्वेला नेले जात असल्याच्या शेतकऱ्यांच्या व्यथा… माजी मंत्री थोरात म्हणाले, चुकीच्या कामांवर आता जनतेला दबाव ठेवावा लागेल!

संगमनेर तालुक्यातील वीज पुरवठा बंद ठेवून हे पाणी पूर्वेला देण्यासाठी सत्ताधारी काम करत आहे आणि येथील नवीन लोकप्रतिनिधी त्यांच्या तालावर नाचत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar01/03/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, दि. १ मार्च

मागील तीन महिन्यापासून प्रवरा नदीकाठी तसेच पठार भागामध्ये विजेचा पूर्ण खेळखंडोबा झाला आहे. पूर्ण दाबाने पूर्ण वेळ वीज मिळाली पाहिजे, मात्र असे न होता अगदी चार तास लाईट मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नदीचे पाणी उचलता येत नाही. संगमनेर तालुक्यातील वीज पुरवठा बंद ठेवून हे पाणी पूर्वेला देण्यासाठी सत्ताधारी काम करत आहे आणि येथील नवीन लोकप्रतिनिधी त्यांच्या तालावर नाचत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या विश्रामगृहावर तालुक्यातील विविध गावांमधील नागरिकांनी लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्यापुढे वीज व पाण्याबाबतच्या समस्या मांडल्या. यावेळी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, रणजितसिंह देशमुख, डॉ. जयश्री थोरात, सोमेश्वर दिवटे यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

थोरात म्हणाले की, आश्वी येथे अपर तहसील कार्यालय करून संगमनेर तालुक्याची मोडतोड करण्याचा त्यांचा डाव आहे. याबाबत नवीन लोकप्रतिनिधीला काही माहीत नाही. तहसीलदार असा निर्णय घेतोच कसा, त्याच्यावर कोणाचा दबाव आहे ते त्यांनी सांगितले पाहिजे. जनतेचा दबाव वाढला म्हणून आता महसूल मंडळाची फेररचना करणार असे सांगत आहे, परंतु मी सहा वर्ष महसूल मंत्री राहिलो आहे. ते चुकीची माहिती देत आहेत.

पुढील काळात संगमनेर तालुक्यावर अनेक संकटे येणार आहेत. तालुक्याची अर्थव्यवस्था मोडण्याचा त्यांचा डाव आहे. चुकीच्या कामा संदर्भात सर्वांनी जागृत राहिले पाहिजे. जनतेचा दबाव त्यांच्यावर राहिला पाहिजे. तालुक्यातील प्रत्येक गावाला पाणी देण्याच आपले नियोजन होते, त्यासाठी आपण काम केले. अडचणी येण्यापूर्वीच त्या सोडवल्या जायच्या त्यामुळे मागील चाळीस वर्षात जनतेला या गोष्टी कळाल्या नाही. आता संघर्ष करावा लागणार आहे. त्यासाठी सर्वांनी एकजूट होऊन दबाव ठेवला पाहिजे असे ते म्हणाले.

यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी आपल्या भावना मांडताना म्हटले की, काही गावांमध्ये सत्कार घेताना नवीन लोकप्रतिनिधीने जोरात जाहिरातबाजी केली, मात्र पाणी प्रश्न आणि मूळ समस्यांबाबत ते काही बोलायला तयार नाही. मूळ म्हणजे त्यांचे त्यांच्या नेत्यांसमोर काही चालत नाही. पूर्वेकडील नेत्यांच्या इशाऱ्यावर ते काम करत आहे हे दुर्दैव आहे, अशी भावना बुवाजीबाबा पुणेकर, आर. बी. राहणे, अरुण गुंजाळ, भास्कर बागुल, ज्ञानेश्वर सानप, ज्ञानेश्वर कडनर, सचिन काकड, गणेश भागवत, विलास वर्पे यांच्यासह जाखुरी, पिंपरने, जोर्वे, नान्नज दुमाला, जांबुत, खांडगाव, नीमज या गावातील शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडल्या.

यानंतर सर्व शेतकऱ्यांनी तीन तारखेला वीज अधिकाऱ्यांना याबाबत निवेदन देण्यात येणार असून जर आठ दिवसांमध्ये पूर्ण दाबाने पूर्ण वेळ वीज मिळाली नाही तर मोठे आंदोलन उभारले जाईल असा इशारा दिला.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 881
बाळासाहेब थोरात वीज
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरमध्ये १७ ते २० सप्टेंबरदरम्यान अमृत उद्योग समूहातील सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा; माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांची मुख्य उपस्थिती

14/09/2026

माजी मंत्री थोरात आणि डॉ. तांबे यांनी घेतली पद्मभूषण अण्णा हजारे यांची भेट; प्रकृतीची केली चौकशी

13/09/2026

आंदोलनाची हवा काढण्यासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट? : अमोल शेलकर यांचा घणाघात, पालकमंत्री व लोकप्रतिनिधींवर संगमनेरच्या हक्काची रेल्वे हिरावल्याचा थेट आरोप; कागदपत्रे सार्वजनिक करण्याचे आव्हान

09/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
सामाजिक

हरेगाव येथे १९ सप्टेंबरला ‘ख्रिस्ती हक्क संघर्ष परिषद’; सुजात आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती

By Annant Ppangarkar15/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  भारतीय संविधानाने दिलेल्या धर्मस्वातंत्र्य, समानता आणि न्यायाच्या अधिकारांचे संरक्षण…

मंगळवार, १५ सप्टेंबर रोजीचे राशीभविष्य… जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल

15/09/2026

माजी मंत्री बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांच्या निवासस्थानी गणरायाचे आगमन; पर्यावरणपूरक व त्रासमुक्त गणेशोत्सवाचे आवाहन

14/09/2026

मोठी कारवाई: तीन कुंटणखान्यांवर छापे, ८ महिलांची सुटका; तिघांवर गुन्हे दाखल

14/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.