Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

नाशिक–पुणे सेमी हायस्पीड रेल्वेसाठी आमदार सत्यजीत तांबे यांच्या आवाहनाला युवकांचा वाढता प्रतिसाद, फ्रेंडशिप डेच्या संदेशातून ९ ऑगस्टच्या चक्काजाम आंदोलनाचे आवाहन

August 2, 2026

अवैध गांजा विक्रीचा प्रयत्न संगमनेर शहर पोलिसांकडून उधळला; २.३४ लाखांच्या मुद्देमालासह तिघे अटकेत

August 2, 2026

रविवार विशेष लेख – भगव्या देशा.. अनपढ देशा.. मोदींच्या देशा…

August 2, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » केंद्रीय मंत्र्याच्या मुलीची छेड काढणारा अनिकेत भोई शिंदे शिवसेनेतील नेत्याचा पुतण्या
गुन्हेगारी

केंद्रीय मंत्र्याच्या मुलीची छेड काढणारा अनिकेत भोई शिंदे शिवसेनेतील नेत्याचा पुतण्या

याप्रकरणी अनिकेत भोई, किरण माळी आणि अनुज पाटील यांच्यासह एक अल्पवयीन मुलाला पोलिसांनी अटक केली आहे.
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरMarch 4, 2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

विशेष प्रतिनिधी / मुंबई

केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीच्या छेडछाड प्रकरणी मुक्ताईनगर पोलिसांना यश आलं आहे. याप्रकरणी सात जणांविरोधात गुन्हा दाखल दाखल करण्यात आला असून चार जणांना अटक करण्यात आली आहे. तीन आरोपी अजून फरार आहेत. अटक करण्यात आलेल्यांमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुखांच्या पुतण्याचाही समावेश आहे.

केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसह तिच्या मैत्रिणींची मुक्ताईनगरमधील कोथळी गावातील संत मुक्ताई जत्रेत छेडछाड काढण्यात आली. रविवारी ही घटना समोर आल्यानंतर केंद्रीय मंत्री रक्षा खडसे आणि मुलीचे आजोबा माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते एकनाथ खडसे आक्रमक झाले. घटनेला दोन दिवस झाले तरी आरोपींवर साधी कारवाई देखील करण्यात आली नाही, यामुळे केंद्रीय मंत्री रक्षा खडसे संतप्त झाल्या. त्यांनी पोलिस ठाणे गाठत आरोपींवर कारवाईची मागणी केली.

केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीची छेडछाड होते तरीही आरोपी मोकाट फिरत असल्याचं समोर आल्यानंतर विरोधकांनीही राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला असल्याचा आरोप केला. महाराष्ट्रातील लाडकी बहीण सुरक्षित नसल्याचाही आरोप विरोधकांकडून करण्यात आला.

मुक्ताईनगरच्या या छेडछाडीच्या प्रकरणावर राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटायला लागल्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत सात जणांविरोधात दोन गुन्हे दाखल केले.

यातील चार आरोपींना सोमवारी अटक करण्यात आली आहे. त्यामध्ये मुख्य आरोपी अनिकेत भोई याचाही समावेश आहे. अनिकेत भोई हा मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांचा कट्टर समर्थक आहे. तसेच रावेर लोकसभा मतदार संघाचे शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख छोटूभाई यांचा पुतण्या आहे.

केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांची मुलगी तिच्या मैत्रिणींसह यात्रेत गेली होती. यावेळी त्यांच्यासोबत अंगरक्षक पोलीस देखील होते. यात्रेत केंद्रीय मंत्री खडसे यांच्या मुलीसोबत गैरवर्तन करण्यात आले. त्यावेळी अंगरक्षक पोलिसांनाही गुंडांनी धक्काबुक्की केली. मुली जिथे जातील तिथे त्यांच्यामागे जात टवाळखोर त्यांची छेड काढत होते. याप्रकरणी पोलिसांना झालेल्या धक्काबुक्की प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरा गुन्हा मुलींची छेडछाड केल्याचा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी अनिकेत भोई, किरण माळी आणि अनुज पाटील यांच्यासह एक अल्पवयीन मुलाला पोलिसांनी अटक केली आहे. किरण माळी हा देखील शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांचा नातेवाईक असल्याची माहिती आहे.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 788
गुन्हेगारी छेडछाड रक्षा खडसे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

अवैध गांजा विक्रीचा प्रयत्न संगमनेर शहर पोलिसांकडून उधळला; २.३४ लाखांच्या मुद्देमालासह तिघे अटकेत

August 2, 2026

संगमनेर तालुक्यात लपून-छपून उरकला बालविवाह; ५ जणांवर घारगाव पोलिसांत गुन्हा

July 30, 2026

कचरा वेचण्याच्या बहाण्याने ‘रेकी’; बंद घरे गाठून घरफोडी करणाऱ्या दोन महिला जेरबंद

July 25, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
सामाजिक

नाशिक–पुणे सेमी हायस्पीड रेल्वेसाठी आमदार सत्यजीत तांबे यांच्या आवाहनाला युवकांचा वाढता प्रतिसाद, फ्रेंडशिप डेच्या संदेशातून ९ ऑगस्टच्या चक्काजाम आंदोलनाचे आवाहन

By अनंत पांगारकरAugust 2, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  मुंबई:  फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने आमदार सत्यजीत तांबे यांनी सोशल मीडियावरून केलेल्या…

अवैध गांजा विक्रीचा प्रयत्न संगमनेर शहर पोलिसांकडून उधळला; २.३४ लाखांच्या मुद्देमालासह तिघे अटकेत

August 2, 2026

रविवार विशेष लेख – भगव्या देशा.. अनपढ देशा.. मोदींच्या देशा…

August 2, 2026

रविवार, ०२ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

August 2, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.