Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरमध्ये सह्याद्री कॉलेज शेजारील ‘बर्गेज कॅफे’वर पोलिसांची धाड; अश्लील चाळ्यांसाठी जागा पुरवणाऱ्या चालकावर गुन्हा दाखल

25/08/2026

निमोण-सोनेवाडीतील तरुणांचा शिवसेनेत प्रवेश, आमदार खताळ यांच्या कामाच्या पद्धतीवर विश्वास

25/08/2026

आज मंगळवार, २५ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

25/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » वन्य प्राण्यांपासून शेतकऱ्यांच्या जीविताला धोका झाल्यास जबाबदारी महावितरणची… विजेच्या मागणीसाठी शनिवारी कोल्हार घोटी मार्गावर कोकणगावला करणार रास्ता रोको आंदोलन
आंदोलन

वन्य प्राण्यांपासून शेतकऱ्यांच्या जीविताला धोका झाल्यास जबाबदारी महावितरणची… विजेच्या मागणीसाठी शनिवारी कोल्हार घोटी मार्गावर कोकणगावला करणार रास्ता रोको आंदोलन

तात्काळ या प्रश्नावर मार्ग निघाला नाही तर येत्या शनिवारी (८ मार्च) सकाळी साडेनऊ वाजता कोल्हार घोटी मार्गावर कोकणगाव येथे रास्ता रोको आंदोलन केले जाणार आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar04/03/2025Updated:04/03/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, दि. ४ मार्च

महावितरण कडून विजेचा सुरू असलेला खेळ खंडोबा शेतकऱ्यांच्या जीवावर बेतण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पूर्ण दाबाने वीज दिली जात नसल्याने शेतकऱ्यांसमोर शेतीचे प्रश्न निर्माण झाले आहे. त्यामुळे दिवसा सलग आठ तास वीज मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी शनिवारी (८ मार्च) महावितरण विरोधात रास्ता रोको आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.

कोकणगाव, शिवापूर, मेंढवन परिसरातील शेतकरी ग्रामस्थांनी महावितरण च्या कार्यकारी अभियंतांना आपल्या मागणीचे निवेदन दिले असून महावितरण कंपनीने विजेचा प्रश्न सोडविला नाही आणि शेतकऱ्यांच्या जीवितास वन्य प्राण्यापासून धोका निर्माण झाल्यास याला सर्वस्वी महावितरण कंपनी जबाबदार असेल असा इशारा दिला आहे.

निवेदनात ग्रामस्थांनी शेतीपंपासाठी दोन हप्ते दिवसा, एक हप्ता रात्री तसेच शक्य नसेल तर दिवसा सलग आठ तास वीज दिली जावी, अशी मागणी केली आहे. दिवसाच्या नियोजनामध्ये चार तास वीज दिली जाते त्यात जर काही फॉल्ट निर्माण झाला तर शेतकऱ्यांना तीनच तास शेतीपंपासाठी वीज मिळत असते.

तसेच रात्रीच्या वेळी सात ते आठ तास वीज दिली जात असली तरी या कालावधीत शेतकऱ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. रात्रीच्या वेळी शेती काम करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. बहुतांश शेतकऱ्यांची शेती ही घरापासून लांब अंतरावर आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कायमच वाघ, बिबट्या, तरस, साप अशा हिंस्र प्राण्यांचे सातत्याने दर्शन होत असते. अशा स्थितीत त्याला नाईलाजाने शेतीला पाणी द्यावे लागते.

अशा स्थितीत दिवसा शेती काम करणे शक्य असले तरी वीजपुरवठा होत नसल्याने शेतकऱ्यांना काम करणे अशक्य बनले आहे. अखंडित वीजपुरवठा यामुळे पाणी असूनही शेती पिकाला पाणी देणे शक्य होत नसल्याने पिके करपू लागले आहे. शेतकऱ्यांनी शेतीपंपाच्या विजेचे नियोजन करण्याचे लेखी पत्राद्वारे निवेदन देऊन देखील अभियंता शेतीपंपाच्या विजेचा प्रश्न तसाच ठेवणार असतील आणि वन्य प्राण्यांपासून शेतकऱ्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला तर याला महावितरण पूर्णतः जबाबदार असेल असा इशारा निवेदनाद्वारे देत तात्काळ या प्रश्नावर मार्ग निघाला नाही तर येत्या शनिवारी (८ मार्च) सकाळी साडेनऊ वाजता कोल्हार घोटी मार्गावर कोकणगाव येथे रास्ता रोको आंदोलन केले जाणार आहे.

कोकणगाव, शिवापुर, मेंढवन या परिसरातील शेतकरी ग्रामस्थांनी यासंबंधीचे निवेदन महावितरणचे मुख्य कार्यकारी अभियंता, संगमनेरचे तहसीलदार धीरज मांजरे, आमदार अमोल खताळ, संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे यांना दिले आहे. निवेदनावर दीपक जोंधळे, रमेश शिंगोटे, अण्णासाहेब जोंधळे, हनुमंत जोंधळे, सोमनाथ जोंधळे, सतीश जोंधळे आदींच्या सह्या आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 807
आंदोलन महावितरण वीज
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

एमआयडीसीच्या जागेवर सौर प्रकल्प चालणार नाही! कौठे मलकापूर येथे भाजपचे आक्रमक आंदोलन; भोसले यांच्यासह पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

19/08/2026

संगमनेर येथे आदिवासी विद्यार्थ्यांचे अर्धनग्न धरणे आंदोलन सुरुच; जयश्री थोरात यांची आंदोलनस्थळी भेट

17/08/2026

बिरेवाडीत पोल्ट्री शेडवर कारवाईसाठी ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण सुरु; मांडवे-बिरेवाडी हद्दीतील तीन पोल्ट्रीचा वाद पेटला

14/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

संगमनेरमध्ये सह्याद्री कॉलेज शेजारील ‘बर्गेज कॅफे’वर पोलिसांची धाड; अश्लील चाळ्यांसाठी जागा पुरवणाऱ्या चालकावर गुन्हा दाखल

By Annant Ppangarkar25/08/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर : संगमनेर शहरातील सह्याद्री कॉलेज शेजारी, ऑरेंज कॉर्नर…

निमोण-सोनेवाडीतील तरुणांचा शिवसेनेत प्रवेश, आमदार खताळ यांच्या कामाच्या पद्धतीवर विश्वास

25/08/2026

आज मंगळवार, २५ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

25/08/2026

यशोधन कार्यालयाच्या पाठपुराव्यामुळे तालुक्यातील ८,६०० बांधकाम व असंघटित कामगारांच्या खात्यावर १० कोटी १६ लाख रुपये जमा

24/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.