Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरमध्ये सह्याद्री कॉलेज शेजारील ‘बर्गेज कॅफे’वर पोलिसांची धाड; अश्लील चाळ्यांसाठी जागा पुरवणाऱ्या चालकावर गुन्हा दाखल

25/08/2026

निमोण-सोनेवाडीतील तरुणांचा शिवसेनेत प्रवेश, आमदार खताळ यांच्या कामाच्या पद्धतीवर विश्वास

25/08/2026

आज मंगळवार, २५ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

25/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » रविवारी थोरात कारखान्याच्या विस्तारित डिस्टिलरी व इथेनॉल प्रकल्पाचा शुभारंभ, ८ लाख ७७७ साखर पोत्यांचे पूजन
शेती व सहकार

रविवारी थोरात कारखान्याच्या विस्तारित डिस्टिलरी व इथेनॉल प्रकल्पाचा शुभारंभ, ८ लाख ७७७ साखर पोत्यांचे पूजन

विस्तारित डिस्टिलरी व इथेनॉल प्रकल्पातून दररोज ८० हजार लिटर इथेनॉल निर्मिती होणार आहे. यामुळे राष्ट्रीय कार्यास हातभार लागणार असून या प्रकल्पातून बाहेर पडणारे सांडपाणी वाफेद्वारे घट्ट केले जाईल.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar05/03/2025Updated:05/03/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, दि. ५ मार्च – प्रतिनिधी 

सहकारातील दिशादर्शक आणि आदर्श ठरलेल्या तसेच संगमनेर तालुक्याच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या विस्तारित डिस्टिलरी व इथेनॉल प्रकल्पाचा शुभारंभ, कारखान्यात उत्पादित झालेल्या ८ लाख ७७७ साखर पोत्यांचे पूजन माजी मंत्री, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते रविवारी (९ मार्च) होणार असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ यांनी दिली.

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याने उभारलेल्या साडेपाच हजार मेट्रिक टन क्षमतेचा कारखान्यातून गेल्या तीन वर्षापासून दहा लाख मेट्रिक टना पेक्षा अधिक ऊस गाळप झाले आहे. यावर्षी देखील मोठ्या प्रमाणात गाळप होणार आहे. तालुक्याच्या विकासात योगदान देणाऱ्या थोरात कारखान्याला देश पातळीवरील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना म्हणून दोनदा गौरविण्यात आले आहे.

तांत्रिक कार्यक्षमता आणि उत्पादनाबाबत १६ राष्ट्रीय पुरस्काराने कारखान्याचा सन्मान झाला आहे. याशिवाय तब्बल ११ वेळा राज्यस्तरीय, महाराष्ट्र शासनाचा सहकार भूषण पुरस्कार, राष्ट्रीय उद्योजकता पुरस्कार आणि कार्यकारी संचालक व व्यवस्थापनासाठी दोन वेळा सन्मान झाला आहे.

कारखान्याने आता विस्तारित डिस्टिलरी व इथेनॉल प्रकल्पाच्या बरोबरच यावर्षीच्या गळीत हंगामात उत्पादित झालेल्या ८ लाख ७७७ साखर व त्याचे पूजन माजी मंत्री थोरात, पत्नी कांचनताई यांच्या हस्ते व जयहिंद लोक चळवळीचे संस्थापक माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी आयोजित केले आहे. नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार सत्यजित तांबे यांच्यासह जिल्ह्यातील विविध मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत.

इथेनॉल निर्मितीमुळे राष्ट्रीय कार्यास हातभार… माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली विस्तारित डिस्टिलरी व इथेनॉल प्रकल्पातून दररोज ८० हजार लिटर इथेनॉल निर्मिती होणार आहे. यामुळे राष्ट्रीय कार्यास हातभार लागणार असून या प्रकल्पातून बाहेर पडणारे सांडपाणी वाफेद्वारे घट्ट केले जाईल. आधुनिक इन्सिनरेशन बॉयलर मध्ये ते जाळले जाऊन त्यातून पोटॅशियम उत्तराख निर्मिती होणार असून ही राख अमृत शक्ती दाणेदार खतांमध्ये वापरली जाऊन अधिक गुणवत्तापूर्ण खत निर्मिती केली जाणार आहे. – जगन्नाथ घुगरकर, कार्यकारी संचालक, थोरात कारखाना.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,167
डिस्टिलरी व इथेनॉल थोरात कारखाना बाळासाहेब थोरात सुधीर तांबे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन; माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले…

04/08/2026

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे संगमनेर शहरात अद्यावत स्मारक उभारणार : माजी आमदार डॉ. सुधीर तांबे

01/08/2026

संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा धक्का; आमदारकी टांगणीला

30/07/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

संगमनेरमध्ये सह्याद्री कॉलेज शेजारील ‘बर्गेज कॅफे’वर पोलिसांची धाड; अश्लील चाळ्यांसाठी जागा पुरवणाऱ्या चालकावर गुन्हा दाखल

By Annant Ppangarkar25/08/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर : संगमनेर शहरातील सह्याद्री कॉलेज शेजारी, ऑरेंज कॉर्नर…

निमोण-सोनेवाडीतील तरुणांचा शिवसेनेत प्रवेश, आमदार खताळ यांच्या कामाच्या पद्धतीवर विश्वास

25/08/2026

आज मंगळवार, २५ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

25/08/2026

यशोधन कार्यालयाच्या पाठपुराव्यामुळे तालुक्यातील ८,६०० बांधकाम व असंघटित कामगारांच्या खात्यावर १० कोटी १६ लाख रुपये जमा

24/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.