Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

‘सध्याच्या राजकीय स्थितीमुळे लोकशाहीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह’ : प्रा. डॉ. शरद बाविस्कर

10/09/2026

आज गुरुवार, १० सप्टेंबर जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

10/09/2026

आंदोलनाची हवा काढण्यासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट? : अमोल शेलकर यांचा घणाघात, पालकमंत्री व लोकप्रतिनिधींवर संगमनेरच्या हक्काची रेल्वे हिरावल्याचा थेट आरोप; कागदपत्रे सार्वजनिक करण्याचे आव्हान

09/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेर बिघडतंय… पान टपरीवर मिळतोय गांजा, पोलिसांच्या छाप्यात पाऊण किलो गांजा सापडला
गुन्हेगारी

संगमनेर बिघडतंय… पान टपरीवर मिळतोय गांजा, पोलिसांच्या छाप्यात पाऊण किलो गांजा सापडला

कारवाईत ६५७० रुपये किमतीचा ७५० ग्राम गांजा पकडण्यात आला आहे. शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख याप्रकरणी स्वतः तपास करत आहेत
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar05/03/2025Updated:05/03/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, दि. ५ मार्च – प्रतिनिधी 

संगमनेर शहरात सुरू असलेल्या अवैध धंद्यांकडे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याने आता संगमनेरात पान टपऱ्यांवर गांजा मिळू लागल्याचे पोलिसांच्या कारवाईत समोर आले आहे. या कारवाईत पोलिसांनी एका आरोपीला पकडले आहे.

गेल्या काही दिवसांपासून संगमनेरमध्ये अवैध धंद्यांनी उच्छाद मांडला आहे. या धंद्यांवर कारवाया होत नसल्याने तसेच संबंधितांचे आर्थिक लागेबांधे असल्याने आता हे धंदे चोरून लपून नव्हे तर उघड्यावर राजरोसपणे सुरू आहे.

पान टपरी मधून गांजा बाळगणाऱ्या आणि त्याची विक्री करणाऱ्या एकाला संगमनेर शहर पोलिसांनी पकडले असून या कारवाईमुळे अवैधरित्या अमली पदार्थ विक्रेत्यांनी पुन्हा डोके वर काढले असल्याचे दिसत आहे. यामुळे पोलिसांच्या कारवाई देखील फार्स ठरू लागल्या आहेत. जवळपास सर्वच प्रकारच्या अवैध धंद्यांमध्ये अहिल्यानगर जिल्ह्यात संगमनेर प्रथम स्थानावर आहे. गर्द, हेरॉईन, गांजासह जीवितास अपायकारक असणाऱ्या अनेक पदार्थांची विक्री होत असल्याचे संगमनेरात समोर आले होते. या प्रकरणांमध्ये पोलिसांचा तपास केवळ कागदावरच राहिल्याचे दिसते. जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून स्थानिक अधिकाऱ्यांपर्यंत सर्वच अधिकारी संगमनेरमधील अवैध व्यवसायाला छुपे संरक्षण देत असल्याचे बोलले जाते.

शहरातील मालदाड रोड परिसरात स्थानिक पोलिसांनी मंगळवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या दरम्यान शिवशंभो पान सेंटर अँड कटलरी सेंटर या दुकानात केलेल्या कारवाईत पान टपरी मधून गांजाची विक्री होत असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी गांजा बाळगणाऱ्या आणि विक्री करणाऱ्या शिवाजीनगर येथील अंबादास शांताराम शिंदे याला पकडले हसून त्याच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबल हरिश्चंद्र बांडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा रजिस्टर नंबर १५९/२०२५ अमली औषधे द्रव्य मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या कारवाईत ६५७० रुपये किमतीचा ७५० ग्राम गांजा पकडण्यात आला आहे. शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख याप्रकरणी स्वतः तपास करत असून पकडलेल्या गांजाच्या माध्यमातून पोलीस मूळ गांजा विक्रेत्यापर्यंत पोहोचण्यात यशस्वी होतात का हे या पुढील काही काळात समोर येणार आहे.

वारंवार तक्रारी, ओरड होऊनही अवैध धंद्यांना संरक्षण… संगमनेर मधील अवैध धंद्याच्या संदर्भात सातत्याने तक्रारी होत असतात ओरड केली जाते, मात्र याकडे कारवाई करणारे अधिकारी सर्रासपणे दुर्लक्ष करत असतात. विशेषत: हे सर्व धंदे अहिल्यानगरच्या जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या नेतृत्वाखालील एलसीबीच्या आशीर्वादाने सुरू असल्याचे बोलले जाते. एलसीबीसह अनेक अधिकाऱ्यांचे यात हात ओले केले जात असल्याने कारवाई होऊ शकत नसल्याचे बोलले जाते.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,852
कारवाई गांजा
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

धांदरफळ येथे महावितरण कर्मचाऱ्याला मारहाण; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

08/09/2026

कोपरगाव आणि संगमनेरमधील चैन स्नॅचिंगचे गुन्हे उघडकीस; दोन सराईत चोरट्यांकडून ५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत, अहिल्यानगर एलसीबीची कामगिरी

08/09/2026

संगमनेरमध्ये अवैध कत्तलखान्यावर एलसीबीची छापेमारी: १७०० किलो गोमांसासह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, चौघांना पकडले!

05/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
व्याख्यान

‘सध्याच्या राजकीय स्थितीमुळे लोकशाहीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह’ : प्रा. डॉ. शरद बाविस्कर

By Annant Ppangarkar10/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: इतर कोणत्याही सत्ता पद्धतीमध्ये स्वातंत्र्याला स्थान नसून ते फक्त…

आज गुरुवार, १० सप्टेंबर जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

10/09/2026

आंदोलनाची हवा काढण्यासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट? : अमोल शेलकर यांचा घणाघात, पालकमंत्री व लोकप्रतिनिधींवर संगमनेरच्या हक्काची रेल्वे हिरावल्याचा थेट आरोप; कागदपत्रे सार्वजनिक करण्याचे आव्हान

09/09/2026

गणेश विसर्जनासाठी प्रवरा नदीपात्रात तातडीने पाणी सोडण्यासंदर्भात नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

09/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.