Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026

कृष्णाच्या कुटुंबीयांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार: आमदार अमोल खताळ यांनी घेतली पवार कुटुंबीयांची भेट

30/08/2026

जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर एलसीबीचा सर्जिकल स्ट्राईक; एकाच दिवशी ६ छापे, सुमारे ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

30/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » अपर तहसील कार्यालय वाद सुरूच… घारगाव पाठोपाठ आता तळेगावकरांची अपर तहसील कार्यालयाची मागणी, प्रांत अधिकाऱ्यांना दिले निवेदन
राजकारण

अपर तहसील कार्यालय वाद सुरूच… घारगाव पाठोपाठ आता तळेगावकरांची अपर तहसील कार्यालयाची मागणी, प्रांत अधिकाऱ्यांना दिले निवेदन

संगमनेर तालुक्यात प्रस्तावित करण्यात आलेल्या आश्वी बुद्रुक येथील अपर तहसील कार्यालयाचा वाद सुरूच असून आता घारगाव पाठोपाठ तळेगाव येथे अपर तहसील कार्यालय करण्याची मागणी करण्यात आली आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar06/03/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, दि. ६ मार्च – प्रतिनिधी 

संगमनेर तालुक्यात प्रस्तावित करण्यात आलेल्या आश्वी बुद्रुक येथील अपर तहसील कार्यालयाचा वाद सुरूच असून आता घारगाव पाठोपाठ तळेगाव येथे अपर तहसील कार्यालय करण्याची मागणी करण्यात आली आहे. अपर तहसिल कार्यालयाची निर्मिती होणार असेल तर नेहमीच वंचित राहीलेल्या तळेगाव येथे हे कार्यालय सुरू करून न्याय देण्याची मागणी आज तळेगाव आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी प्रांताधिकारी शैलेंद्र हिंगे यांच्याकडे केली आहे.

यासंदर्भात लाडकी बहीण योजनेचे तालुका अध्यक्ष शरद गोर्डे, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष रावसाहेब दिघे, सरपंच घनशाम भारस्कर, महेश उदमले, गोविंद कांदळकर, कोंडाजी खेमनर, मच्छिंद्र घुले, निखिल सानप यांच्या शिष्टमंडळांने प्रांताधिकार्‍यांना निवेदन दिले आहे.

तळेगाव आणि पंचक्रोशीत मोठ्या प्रमाणात गाव आणि वाड्या वस्त्यांची संख्या आहे. ही सर्व गाव शहरापासून लांब अंतरावर असल्याने तहसिल कार्यालयात काम घेवून येणे अडचणीचे होते. वेळेत काम न झाल्यास ग्रामीण भागातील नागरीकांचा वेळ आणि पैसाही वाया जातो. तळेगाव परीसर जिरायती भाग म्हणून ओळखला जातो. विविध कारणाने नेहमीच वंचित राहीलेल्या गावांना न्याय देण्याच्या उद्देशाने कधीही विचार झाला नाही. आता अप्पर तहसिल कार्यालय सुरू करण्याचा विचार महसूल विभागाने केला असेल तर प्राधान्याने तळेगावचा विचार होणे गरजेचे असल्याचे शिष्टमंडळांने प्रांताधिकारी यांना पटवून दिले.

जिरायती भागातील ग्रामस्थ, विद्यार्थी, विद्यार्थीनी, महीला यांना शासकीय कागदपत्रांकरीता थेट संगमनेरात यावे लागते. कागदपत्र वेळेत मिळत नसल्याने अनेक शासकीय योजनापासून लाभार्थीना वंचित राहावे लागते ही वस्तूस्थिती लक्षात घेवून अपर तहसिल कार्यालयाची सुविधा निर्माण झाली तर तळेगाव आणि पंचक्रोशीतील गावांना खरा न्याय मिळेल, आशी भूमिका निवेदनाद्वारे मांडण्यात आली आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 784
आश्वी बुद्रुक अपर तहसील कार्यालय घारगाव अपर तहसील कार्यालय तळेगाव अपर तहसील कार्यालय वाद
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026

संगमनेर पालिकेचा अनोखा उपक्रम! १ ते २५ सप्टेंबरदरम्यान होणार प्रभागनिहाय बैठका; नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांच्या पुढाकाराने नागरिकांच्या प्रश्नांना थेट व्यासपीठ

29/08/2026

संगमनेरकरांच्या अभिप्रेत असलेलेच छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य-दिव्य स्मारक उभारणार! “दीड वर्षे खाती हातात असूनही वाढीव जागेचा प्रश्न सोडवला नाही; आता स्मारकाच्या कामात खोडा घालून संगमनेरकरांची दिशाभूल करू नका”

28/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

By Annant Ppangarkar30/08/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  संगमनेर : खरीप हंगामातील पिकांची वाढती गरज आणि पिण्याच्या…

कृष्णाच्या कुटुंबीयांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार: आमदार अमोल खताळ यांनी घेतली पवार कुटुंबीयांची भेट

30/08/2026

जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर एलसीबीचा सर्जिकल स्ट्राईक; एकाच दिवशी ६ छापे, सुमारे ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

30/08/2026

वाळू तस्करांवर कारवाई, ट्रॅक्टरसह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांना अटक तर तिघे फरार

30/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.