Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरमध्ये युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांसाठी विशेष आपत्कालीन वैद्यकीय प्रशिक्षण शिबिर; आपत्कालीन प्रसंगात रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा: डॉ. जयश्रीताई थोरात

16/09/2026

संगमनेर तालुक्यात ३३ हजार ७९२ हेक्टरवरील खरीप पिकांची दैना; आमदार अमोल खताळ यांची मुख्यमंत्र्यांकडे तातडीने आर्थिक मदतीची मागणी

16/09/2026

ओम ज्वेलर्स चोरी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेकडून पर्दाफाश; तिघांना अटक, मिरजगाव येथील गुन्ह्याचीही उकल

16/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » वाळूच्या दोन्ही गाड्या सोडवून देतो, तहसीलदारांना द्यावे लागतील दोन लाख रुपये; अहिल्यानगरच्या लाच लुचपत पथकाच्या कारवाईत तहसीलदारासह तिघांवर गुन्हा
गुन्हेगारी

वाळूच्या दोन्ही गाड्या सोडवून देतो, तहसीलदारांना द्यावे लागतील दोन लाख रुपये; अहिल्यानगरच्या लाच लुचपत पथकाच्या कारवाईत तहसीलदारासह तिघांवर गुन्हा

पोलीस उपअधीक्षक अजित त्रिपुटे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक राजू आल्हाट, पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष शिंदे, पोलीस अंमलदार रविंद्र निमसे, बाबासाहेब कराड, चंद्रकांत काळे, गजानन गायकवाड, हारून शेख, दशरथ लाड यांच्या पथकाने ही कारवाई केली.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar07/03/2025No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

अहिल्यानगर, दि. ७ मार्च – महाराष्ट्र संवाद न्यूज 

महसूलच्या पथकाने पकडलेले वाळू वाहतुकीचे दोन वाहने सोडवून देण्यासाठी दोन लाखाची लाच मागणाऱ्या पैठणच्या तहसीलदारासह महसूल सहाय्यक आणि एका खासगी व्यक्तीवर अहिल्यानगरच्या लाच लुचपत पथकाने कारवाई केली आहे. या तिघा लाचखोराविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खाजगी इसम सलील करीम शेख (वय- ३८ वर्षे, व्यवसाय शेती, रा. लक्ष्मीनगर, ता. पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर), हरिष शिंदे (महसूल सहाय्यक, वर्ग ३, तहसिल कार्यालय पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर) आणि तहसीलदार सारंग भिकूसिंग चव्हाण, वय ४८ वर्ष, रा. ए विंग, फ्लॅट नंबर ३०५, द प्राईड इग्निमा, सुतगिरणी चौक, गारखेडा परिसर छत्रपती संभाजीनगर) अशी तिघा आरोपींची नावे आहे.

अहिल्यानगरच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करणाऱ्या तक्रारदाराचा माती व वाळू वाहतुकीचा व्यवसाय आहे. त्याची वाळू वाहतुकीची दोन वाहने महसूल विभागाच्या पथकाने पकडली होती व दोन्ही वाहने पैठणच्या तहसील कार्यालयात जमा केली होती.

तहसिल कार्यालयातील काम करणारे खाजगी इसम सलील शेख यांनी तक्रारदाराची जप्त असलेली वाळू वाहतुकीची पकडलेली दोन्ही वाहने सोडून देण्याकरिता स्वतःसाठी व तहसिलदार चव्हाण यांच्याकरिता दोन लाख रुपयांची लाचेची मागणी केली होती. त्यावेळी वाहने सोडण्याच्या प्रस्तावावर तहसिलदार चव्हाण पैसे दिले शिवाय सही करणार नाही म्हणून नाईलाजास्तव तक्रारदार यांनी खाजगी इसम सलील शेख यांना फोन पे द्वारे ४०,०००/- रुपये व ५०,०००/- रुपये रोख स्वरूपात दिले होते.

तसेच महसूल सहाय्यक शिंदे यांनी तक्रारदाराकडे दंडाच्या रकमेचे चलन काढून देण्याकरिता ५०,०००/- रुपये लाचेची मागणी केली होती. त्यामुळे तक्रारदाराने त्यावेळी नाईलाजास्तव शिंदे यांना वीस हजार रुपये दिले होते.

प्राप्त लाच मागणी तक्रारीच्या अनुषंगाने १८ फेब्रुवारीला लाच लुचपत विभागाने पंचासमक्ष लाच मागणी पडताळणी केली असता खाजगी इसम सलील शेख यांनी तक्रारदार यांची जप्त असलेली वाळू वाहतुकीची दोन वाहने सोडण्याकरता स्वतःसह, तहसिलदार चव्हाण यांच्यासाठी १,१०,०००/- रुपयांची लाच मागणी केली व स्वीकारण्याचे मान्य केले. तसेच महसूल सहाय्यक शिंदे यांनी तक्रारदार यांचे जप्त केलेल्या वाहनातील वाळू त्यांचे घरी टाकण्याचे सांगितल्याने त्यांनी तक्रारदार यांच्याकडे वस्तूच्या स्वरूपात लाचेची मागणी केली.

२४ जानेवारीला तक्रारदाराकडे तीस हजार रुपयांची मागणी केली. त्यामुळे सोमवारी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा लावला असता खाजगी इसम सलील शेख याने तक्रारदार यांचेकडून पंचासमक्ष लाचेची १,१०,००० रुपयांची रक्कम स्वीकारली. लाचेची रक्कम स्वीकारल्यानंतर सलील शेख याच्या वाहनाची तपासणी केली असता सदर वाहनात तहसिल कार्यालयातील तहसिलदार यांच्या सह्या असलेल्या महत्त्वाच्या कागदपत्रांच्या फाईल मिळून आल्या.

सलील शेख याचे मोबाईलमधील व्हाट्सअप अधिकाऱ्यांनी चेक केले असता त्यामध्ये सलील याने कार्यालयीन पत्र व्यवहार तहसिलदार यांचे व्हाट्सअपवर पाठवून तो बरोबर आहे का ते चेक करण्यास सांगितले असता त्यांनी बरोबर असल्याचे सांगितले आहे. यावरून तहसिलदार चव्हाण यांनी खाजगी इसम सलील शेख यास तहसिल कार्यालयातील सुविधा पुरवून तक्रारदार यांच्याकडे लाचेची मागणी करण्यास व स्वीकारण्यास अपप्रेरणा व प्रोत्साहन दिले आहे. त्यामुळे तिन्ही आरोपींविरुद्ध पैठण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस उपअधीक्षक अजित त्रिपुटे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक राजू आल्हाट, पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष शिंदे, पोलीस अंमलदार रविंद्र निमसे, बाबासाहेब कराड, चंद्रकांत काळे, गजानन गायकवाड, हारून शेख, दशरथ लाड यांच्या पथकाने ही कारवाई केली.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,021
लाच लुचपत लाचखोरी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

ओम ज्वेलर्स चोरी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेकडून पर्दाफाश; तिघांना अटक, मिरजगाव येथील गुन्ह्याचीही उकल

16/09/2026

पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय, गणेशोत्सवादरम्यान ‘यांना’ संगमनेर व अकोले तालुक्यात प्रवेश बंदीचे आदेश जारी___वाचा यादी

15/09/2026

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर संगमनेर उपविभागात पोलीस प्रशासनाची मोठी कारवाई; गुन्हेगारी पार्श्वभूमीचे सात जण जिल्ह्यातून हद्दपार

15/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शिबिर

संगमनेरमध्ये युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांसाठी विशेष आपत्कालीन वैद्यकीय प्रशिक्षण शिबिर; आपत्कालीन प्रसंगात रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा: डॉ. जयश्रीताई थोरात

By Annant Ppangarkar16/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – धावपळीच्या आधुनिक जीवनशैलीत अचानक निर्माण होणाऱ्या वैद्यकीय आणीबाणीच्या…

संगमनेर तालुक्यात ३३ हजार ७९२ हेक्टरवरील खरीप पिकांची दैना; आमदार अमोल खताळ यांची मुख्यमंत्र्यांकडे तातडीने आर्थिक मदतीची मागणी

16/09/2026

ओम ज्वेलर्स चोरी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेकडून पर्दाफाश; तिघांना अटक, मिरजगाव येथील गुन्ह्याचीही उकल

16/09/2026

दूषित पाणीपुरवठ्यामुळे राजापूरकरांचे आरोग्य धोक्यात; ग्रामपंचायतीच्या कारभारावर नागरिकांचा तीव्र संताप

16/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.