Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरमध्ये युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांसाठी विशेष आपत्कालीन वैद्यकीय प्रशिक्षण शिबिर; आपत्कालीन प्रसंगात रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा: डॉ. जयश्रीताई थोरात

16/09/2026

संगमनेर तालुक्यात ३३ हजार ७९२ हेक्टरवरील खरीप पिकांची दैना; आमदार अमोल खताळ यांची मुख्यमंत्र्यांकडे तातडीने आर्थिक मदतीची मागणी

16/09/2026

ओम ज्वेलर्स चोरी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेकडून पर्दाफाश; तिघांना अटक, मिरजगाव येथील गुन्ह्याचीही उकल

16/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेर व पारनेर तालुक्यात मोठी एमआयडीसी करा – आमदार सत्यजित तांबे यांची विधानपरिषदेत मागणी
राजकारण

संगमनेर व पारनेर तालुक्यात मोठी एमआयडीसी करा – आमदार सत्यजित तांबे यांची विधानपरिषदेत मागणी

राज्यामध्ये शिक्षण घेणाऱ्या ओबीसी विद्यार्थ्यांना इयत्ता पहिली ते दहावीसाठी शिष्यवृत्ती दिली जाते मात्र २०१७- १८ पासून विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली नाही. तरी सर्व विद्यार्थ्यांचा विचार करून राज्य सरकारने तातडीने सर्व ओबीसी विद्यार्थ्यांच्या खात्यावर त्यांची शिष्यवृत्ती जमा करावी
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar07/03/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, दि. ७ मार्च – प्रतिनिधी

सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेला संगमनेर व पारनेर तालुका हा पर्जन्य छायेतील तालुका आहे. तालुक्यात माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली अनेक दिवसांच्या कामांमधून तालुक्यात विकास साधला आहे. मुंबई–नाशिक-पुणे या गोल्डन ट्रँगलवर असलेल्या संगमनेर व पारनेर तालुक्यामध्ये नव्याने मोठी एमआयडीसी उभारावी, अशी मागणी नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी विधान परिषदेत केली आहे.

मुंबईत सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात बोलताना आमदार तांबे म्हणाले, अहिल्यानगर जिल्हा हा विस्ताराने मोठा आहे. संगमनेर व पारनेर तालुके हे दुष्काळी तालुके आहेत. बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुक्यात मागील ३५-४० वर्षांमध्ये सततच्या विकास कामांमधून मोठे परिवर्तन झाले आहे. गावोगावी विकासाच्या योजना राबवल्या आहेत. याचबरोबर निळवंडे धरण व कालव्यांबरोबर सिंचनाची सुविधा निर्माण केली आहे. सहकार, शिक्षण, ग्रामीण विकास, कृषी या क्षेत्रांमध्ये संगमनेर तालुका हा राज्याला दिशादर्शक ठरणारा आहे.

राज्य सरकारने डावोस येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय उद्योग परिषदेमध्ये १५ लाख ७० हजार कोटींचा विविध उद्योजकांबरोबर करार केला आहे. त्यामुळे अनेक नवीन उद्योग महाराष्ट्रात येणार आहेत. संगमनेर व पारनेर तालुका हे दुष्काळी तालुके आहेत. याचबरोबर नाशिक पुणे महामार्ग, नव्याने प्रस्तावित झालेल्या सुरत महामार्ग, नाशिक पुणे रेल्वे, काकडी विमानतळ या सर्व जमेच्या बाजू आहेत. पारनेरमधील टाकळी ढोकेश्वर व संगमनेर तालुक्याच्या साकुर पठारातील दुष्काळी भागामध्ये हजारो जमीन एमआयडीसीसाठी उपलब्ध होऊ शकते. यामुळे या परिसरातील तरुणांना रोजगाराची मोठी संधी मिळू शकते.

डावोस येथे झालेल्या करारानुसार संगमनेर व पारनेर तालुक्याच्या सरहद्दीवर साकुर व टाकळी ढोकेश्वर परिसरातील पठारावर भव्य व मोठी एमआयडीसी निर्माण करावी अशी मागणी तांबे यांनी केली आहे

ओबीसी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती जमा करावी… राज्यामध्ये शिक्षण घेणाऱ्या ओबीसी विद्यार्थ्यांना इयत्ता पहिली ते दहावीसाठी शिष्यवृत्ती दिली जाते मात्र २०१७- १८ पासून विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली नाही. तरी सर्व विद्यार्थ्यांचा विचार करून राज्य सरकारने तातडीने सर्व ओबीसी विद्यार्थ्यांच्या खात्यावर त्यांची शिष्यवृत्ती जमा करावी, अशी मागणीही आमदार तांबे यांनी विधान परिषदेत केल्याने राज्यभरातील लाखो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 964
पारनेर एमआयडीसी संगमनेर एमआयडीसी सत्यजित तांबे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर तालुक्यात ३३ हजार ७९२ हेक्टरवरील खरीप पिकांची दैना; आमदार अमोल खताळ यांची मुख्यमंत्र्यांकडे तातडीने आर्थिक मदतीची मागणी

16/09/2026

संगमनेरमध्ये बुधवारी रंगणार ७५० कलावंतांचे भव्य महावादन; ‘आय लव्ह संगमनेर’ चळवळीचा उपक्रम

15/09/2026

आंदोलनाची हवा काढण्यासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट? : अमोल शेलकर यांचा घणाघात, पालकमंत्री व लोकप्रतिनिधींवर संगमनेरच्या हक्काची रेल्वे हिरावल्याचा थेट आरोप; कागदपत्रे सार्वजनिक करण्याचे आव्हान

09/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शिबिर

संगमनेरमध्ये युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांसाठी विशेष आपत्कालीन वैद्यकीय प्रशिक्षण शिबिर; आपत्कालीन प्रसंगात रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा: डॉ. जयश्रीताई थोरात

By Annant Ppangarkar16/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – धावपळीच्या आधुनिक जीवनशैलीत अचानक निर्माण होणाऱ्या वैद्यकीय आणीबाणीच्या…

संगमनेर तालुक्यात ३३ हजार ७९२ हेक्टरवरील खरीप पिकांची दैना; आमदार अमोल खताळ यांची मुख्यमंत्र्यांकडे तातडीने आर्थिक मदतीची मागणी

16/09/2026

ओम ज्वेलर्स चोरी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेकडून पर्दाफाश; तिघांना अटक, मिरजगाव येथील गुन्ह्याचीही उकल

16/09/2026

दूषित पाणीपुरवठ्यामुळे राजापूरकरांचे आरोग्य धोक्यात; ग्रामपंचायतीच्या कारभारावर नागरिकांचा तीव्र संताप

16/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.