Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

पंचनाम्यात वेळ घालवू नका, सरसकट मदत करा! दिल्लीवरून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून बाळासाहेब थोरात आक्रमक!

13/10/2026

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

13/10/2026

शिक्षण क्षेत्राची मान उंचावणारी बातमी! संगमनेरच्या या लेखकाच्या चार पुस्तकांचा शासनमान्य ग्रंथ निवडसुचित समावेश; वाचा सविस्तर

13/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » शिवजयंती उत्सवावरून काँग्रेस-शिवसेनेत वादाची ठिणगी, काँग्रेसकडून मंदिर तर शिवसेनेकडून किल्ला उभारण्याच्या तयारीवरून संगमनेरात वाद… ठाकरेंची शिवसेना वादापासून अलिप्त
राजकारण

शिवजयंती उत्सवावरून काँग्रेस-शिवसेनेत वादाची ठिणगी, काँग्रेसकडून मंदिर तर शिवसेनेकडून किल्ला उभारण्याच्या तयारीवरून संगमनेरात वाद… ठाकरेंची शिवसेना वादापासून अलिप्त

वाद वाढणार ही सामोपचाराने मार्ग निघणार...
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar09/03/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, दि. ९ मार्च – प्रतिनिधी

शिवजयंती उत्सव आठवडाभरावर येऊन ठेपला असताना या उत्सवाच्या तयारीवरून संगमनेरात मोठे वादंग निर्माण झाल्याचे दिसत आहे. काँग्रेस आणि शिवसेना कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांमध्ये यावेळी वाद निर्माण झाला. दरम्यान या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलिस यंत्रणेकडून कोणतीही ठोस भूमिका घेण्यात आलेली नव्हती.

घटनास्थळी संगमनेरचे पोलीस उपअधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे, तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक देविदास ढुमणे, संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास भान्सी यांच्यासह पोलीस दल तसेच संगमनेर नगर परिषदेचे मुख्याधिकारी रामदास कोकरे पोहोचले होते. पोलिसांसमोरच काँग्रेस आणि शिवसेनेच्या दोन्ही गटात उत्सवावरून वाद सुरू होते. पोलिसांसह दोन्ही गट ठाण मांडून बसले आहेत.

रविवारी पोलिसांनी प्रवेशद्वाराजवळ पोलीस व्हॅन उभी करून बंदोबस्ताची तयारी केली होती. दरम्यान बस स्थानकाच्या प्रवेशद्वारा शेजारी काँग्रेसकडून भव्य शिवमंदिर उभारण्याची तयारी सुरू करण्यात आली. त्यामुळे तेथे आलेल्या शिवसेनेच्या पदाधिकारी, शिवसैनिकांनी तेथेच किल्ला बांधणीची तयारी सुरू केली. काँग्रेस व शिवसेनेकडून पोलिसांसमोर एकमेकांच्या कृतीला विरोध करण्यात आल्याने दोन्ही गटात वाद वाढत चालला होता.

शिवसेनेकडून काही दिवसांपूर्वीच शिवजयंती उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला होता. त्यानंतर यावर्षी शिवजयंती उत्सवात प्रथमच काँग्रेसने सहभाग घेत भव्य शिवमंदिर उभारण्याची तयारी सुरू केली होती. या सर्व वादात शिवजयंती उत्सवातील प्रमुख दावेदार असलेली शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) अलिप्त दिसून आली. ठाकरेंच्या शिवसेनेकडून पारंपारिक मिरवणूक काढली जात असते.

संगमनेरमध्ये शिवजयंती उत्सवाला प्रथमतःच राजकीय वळण लागले असून छत्रपती शिवाजी महाराज राजकारण्यांच्या कोंडीत सापडले आहे. दरम्यान काँग्रेस आणि शिवसेना आपापल्या भूमिकांवर ठाम असल्याने संगमनेरचे पोलीस दल याप्रकरणी काय भूमिका घेते याकडे देखील लक्ष लागले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 2,206
काँग्रेस वाद शिवजयंती उत्सव शिवसेना शिंदे गट
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत कधी मिळणार? आमदार अमोल खताळांनी दिली ही माहिती

13/10/2026

संगमनेर आगारात आणखी पाच इलेक्ट्रिक शिवाई बसेस; जिल्ह्यांतर्गत मार्गांवर धावणार

12/10/2026

दिल्लीतील भव्य आंदोलनात बाळासाहेब थोरात यांचा सहभाग: लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांचा राजीनामा आवश्यक

12/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
नैसर्गिक आपत्ती

पंचनाम्यात वेळ घालवू नका, सरसकट मदत करा! दिल्लीवरून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून बाळासाहेब थोरात आक्रमक!

By Annant Ppangarkar13/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात सध्या दुष्काळाची अत्यंत भयानक परिस्थिती निर्माण झाली असून…

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

13/10/2026

शिक्षण क्षेत्राची मान उंचावणारी बातमी! संगमनेरच्या या लेखकाच्या चार पुस्तकांचा शासनमान्य ग्रंथ निवडसुचित समावेश; वाचा सविस्तर

13/10/2026

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत कधी मिळणार? आमदार अमोल खताळांनी दिली ही माहिती

13/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.