Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज सोमवार, ०७ सप्टेंबर — जाणून घ्या आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल

07/09/2026

संगमनेर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड यांना ‘डॉ. जे. पी. नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार’ प्रदान

06/09/2026

महात्मा फुले जन्मद्विशताब्दी निमित्त संगमनेरात उद्या प्रा. डॉ. शरद बाविस्कर यांचे ‘अस्वस्थ भारताचे अंतरंग’ विषयावर व्याख्यान

06/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » शास्ती, दंडाच्या वसुलीने संगमनेरकर बेजार, सत्ताधारी आणि विरोधकांचे मौन; राज्यकर्त्यांची बघ्याची भूमिका… आमदार अमोल खताळ यांच्या भूमिकेकडे लक्ष
राजकारण

शास्ती, दंडाच्या वसुलीने संगमनेरकर बेजार, सत्ताधारी आणि विरोधकांचे मौन; राज्यकर्त्यांची बघ्याची भूमिका… आमदार अमोल खताळ यांच्या भूमिकेकडे लक्ष

बँकांचे कर्ज घेऊन पालिकेच्या थकबाक्या भरण्याची वेळ संगमनेरकरांवर येऊन ठेपली आहे. अनेक बड्यांच्या बेकायदेशीर बांधकामांवर कारवाई न करता सामान्य नागरिकावर मात्र कारवाईचा बडगा उगारला जात आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar11/03/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, दि. ११ मार्च – प्रतिनिधी 

मार्च महिना असल्याने संगमनेर नगर परिषदेची वसुली मोहीम जोरात सुरू आहे. पालिकेने लावलेल्या जाचक शास्ती आणि दंडामुळे नागरिकांचे आर्थिक गणित कोलमडले असून पालिकेच्या तिजोरीत मात्र कोट्यावधी रुपयांची भर पडणार आहे. शास्ती आणि दंडाच्या पठाणी वसुलीमुळे संगमनेरकर नागरिक हैराण झाले असून सत्ताधारी आणि विरोधकांनी या प्रश्न मौन बाळगले आहे. सत्ता बदल होऊनही संगमनेरकरांच्या पदरी निराशाच आली आहे.

संगमनेर नगरपालिका हद्दीत मोठ्या प्रमाणात विनापरवाना बांधकामे करण्यात आली आहे. विनापरवाना करण्यात आलेल्या बांधकामांना संकलित कराच्या दोन पट शास्ती, दंड वसूल केला जात आहे. यामुळे छोटेसे घर बांधून राहणाऱ्या संगमनेरकरांना मात्र मोठा आर्थिक भुर्दंड बसत आहे. त्यातच पालिकेच्या वसुली मोहिमेमुळे नागरिक बेजार झाले आहे. एकीकडे वाढती महागाई आणि दुसरीकडे पालिकेचा जाच यामुळे मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे.

घरपट्टी, नळपट्टी थकल्यास त्यावर आणखी दोन टक्के मासिक व्याज आकारून पालिका प्रशासन पठाणी वसुली करत आहे. बँकांपेक्षाही अधिकचा हा व्याजदर असल्याने पालिका प्रशासन सामान्यांचे खिसे रिकामे करत मालामाल होत आहे. थकबाकीदारांविरुद्ध पालिका प्रशासनाने जप्तीची मोहीम उघडण्याचा इशारा दिल्याने सत्ताधारी आणि विरोधी दोघेही मौन बाळगून आहेत. सत्ताधाऱ्यांसोबत विरोधकही नागरिकांचे आर्थिक लूट उघड्या डोळ्यांनी बघत आहे.

अनेक नागरिकांनी आपली बांधकामे नियमित करण्यासाठी पालिकेकडे प्रस्ताव दाखल केलेले आहे. मात्र या प्रस्तावावर पालिका प्रशासनाने कोणतीही कार्यवाही केल्याचे दिसत नाही. २०११ पासून थकबाकीवर दंड आकारला जात आहे. मध्यंतरी तत्कालीन सरकारने ५०० चौरस फुटापर्यंतच्या बांधकामांना शासकीय दंडातून वगळले आहे मात्र त्या पुढील बांधकाम करणाऱ्यांकडून जास्ती आणि दंडाची रक्कम वसूल केली जात आहे. या विरोधात नागरिकांनी अनेकदा निवेदने दिली मात्र यावर कोणतीही उपाययोजना न करता या निवेदनांना केराची टोपली दाखविली गेली आहे.

विधानसभा निवडणुकीत संगमनेरमध्ये नवे आमदार निवडून आले आहे. विशेष म्हणजे निवडून आलेले आमदार सत्ताधारी महायुतीचे असून त्यांनी या प्रश्नावर मार्ग काढावा, यासाठी नागरिकांनी त्यांच्याकडेदेखील निवेदन दिले आहे. जायंट किलर ठरलेल्या आमदार अमोल खताळ यांनी किमान संगमनेरकरांचा एवढा प्रश्न तरी सरकार दरबारी आपले वजन वापरून मार्गी लावावा अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहे. विनापरवाना करण्यात आलेली बांधकामे नियमित करून नगरपालिका प्रशासनाने नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी होत आहे.

बँकांचे कर्ज घेऊन पालिकेच्या थकबाक्या भरण्याची वेळ संगमनेरकरांवर येऊन ठेपली आहे. अनेक बड्यांच्या बेकायदेशीर बांधकामांवर कारवाई न करता सामान्य नागरिकावर मात्र कारवाईचा बडगा उगारला जात आहे.

बांधकाम करण्यासाठी पालिका प्रशासनाकडे परवानगी मागितल्यास नगरपालिका प्रशासन अनेक अडचणी उपलब्ध करून नागरिकांना सहजासहजी बांधकाम परवानगी मिळू देत नाही. शिवाय या परवानग्या मिळविण्यासाठी नागरिकांना हजारो रुपये खर्च करणे शक्य नसल्याने नाईलाजाने विनापरवाना बांधकामे करावी लागत आहे. याचाच फायदा नगरपालिका प्रशासन उठवत असल्याचा प्रशासनावर आरोप आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,300
वसुली मोहीम शास्ती दंड संगमनेर नगरपरिषद
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

अधिकृत आदेश नसताना भारनियमन कोणाच्या दबावाखाली? महावितरणच्या कारभारावर काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकरांचा हल्लाबोल

05/09/2026

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026

संगमनेर पालिकेचा अनोखा उपक्रम! १ ते २५ सप्टेंबरदरम्यान होणार प्रभागनिहाय बैठका; नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांच्या पुढाकाराने नागरिकांच्या प्रश्नांना थेट व्यासपीठ

29/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज सोमवार, ०७ सप्टेंबर — जाणून घ्या आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल

By Annant Ppangarkar07/09/20260

Annant Ppangarkar आजचे राशीभविष्य- मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत ऊर्जा आणि उत्साहाने भरलेला राहील.…

संगमनेर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड यांना ‘डॉ. जे. पी. नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार’ प्रदान

06/09/2026

महात्मा फुले जन्मद्विशताब्दी निमित्त संगमनेरात उद्या प्रा. डॉ. शरद बाविस्कर यांचे ‘अस्वस्थ भारताचे अंतरंग’ विषयावर व्याख्यान

06/09/2026

आज रविवार, ०६ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

06/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.