Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

एलसीबीची छापेमारी, २.९९ लाखांचा मुद्देमाल जप्त करत १४ आरोपींवर गुन्हा दाखल

29/08/2026

देशहितासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी..; संगमनेरच्या वकिलाचे जगातील सर्वात उंच पोस्ट ऑफिसमधून थेट पत्र!

29/08/2026

आज शनिवार, २९ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

29/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » वादाचे गालबोट लागलेल्या शिवजयंती उत्सवाला अखेर दोन्ही गटांना मिळाली अशी परवानगी… शिवसेना शिंदे गट आणि शिवजन्मोत्सव सोहळा समितीने सांगितला होता एकाच जागेवर दावा
महाराष्ट्र संवाद विशेष

वादाचे गालबोट लागलेल्या शिवजयंती उत्सवाला अखेर दोन्ही गटांना मिळाली अशी परवानगी… शिवसेना शिंदे गट आणि शिवजन्मोत्सव सोहळा समितीने सांगितला होता एकाच जागेवर दावा

विधानसभा निवडणुकानंतर नवीन आमदार मिळाल्याने आता शिवजयंती उत्सवात देखील गटबाजी आणि राजकारण सुद्धा मोठ्या प्रमाणावर सुरू झाले. देखावा सादर करण्यासाठी व शासनाची जागा मिळवण्यासाठी आजी-माजी आमदारांच्या कार्यकर्त्यांच्या समोरासमोर चकमकी घडत होत्या.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar12/03/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, दि. १२ मार्च – प्रतिनिधी

यावर्षी प्रथमत:च मोठ्या वादाची किनार लाभलेल्या संगमनेरमधील शिवजयंती उत्सवावर तोडगा काढण्यात प्रशासनाला अखेर यश आले आहे. वादग्रस्त ठरलेली जागा कोणालाही न देता शिवजन्मोत्सव सोहळा समितीला जोशी स्वीट होम जवळील सुप्रीम पावभाजी सेंटर समोरची जागा तर शिवसेना शिंदे गटाला चंदूकाका सराफ समोरील जागेवर उत्सव साजरा करण्यासाठी परवानगी देण्यात आली असल्याची माहिती समोर येत आहे.

सरकारी शिवजयंती मोठ्या जल्लोषात शिवसेना शिंदे गटाने साजरी केल्यानंतर देखील तिथीनुसार होणाऱ्या शिवजयंतीसाठी पुन्हा एकदा तयारी करण्यात आली होती. तर यावर्षी प्रथमच शिवजन्मोत्सव सोहळा समितीही जल्लोषात उत्सव साजरा करण्यासाठी तयारीला लागले होते. यासाठी त्यांनी प्रशासनाकडे रीतसर अर्ज करत बस स्थानकाच्या प्रवेशद्वाराशेजारी छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारण्याची परवानगी मागितली होती. तर याच जागेवर शिवसेना शिंदे गटाने ही आपला हक्क सांगत किल्ला बांधण्यासाठी तयारी केली. त्यामुळे दोन्ही गटांमध्ये वाद उफाळून आला होता.

गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या या वादामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या वादामध्ये प्रशासनाने मध्यस्थी करून देखील तोडगा निघत नसल्याने पोलिसांनी दोन्ही गटांनी लावलेल्या बॅरीगेटमध्ये दोन पोलीस व्हॅन उभ्या करून मोठा बंदोबस्त ठेवत या जागेवर कोणालाही काहीही करता येणार नाही यासाठी मज्जाव केला होता. त्यामुळे प्रशासनासोबत दोन्ही गटांचे बैठकांचे सत्र सुरू होते. कोणीही माघार घेण्यास तयार नसल्याने प्रशासनासमोर मोठा पेच निर्माण झाला होता. तसेच प्रशासन दबावाखाली देखील आल्याचे दिसत होते.

तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यासाठी संगमनेर बसस्थानक आवारातील मोकळी जागा वापरण्यास मिळावी या कळीच्या मुद्द्यावरून शिवसेना शिंदे गट आणि शिवजन्मोत्सव सोहळा समिती स्वाभिमानी संगमनेर शहर व तालुका यांच्यातील वाद विकोपाला गेला. दोन्ही गटात पोलिसांसमक्ष हमरीतुमरी, धराधरी झाल्यानंतर प्रशासन व पोलिसांनी बैठक घेतल्यानंतर सुद्धा तोडगा निघाला नसल्याने या दोन्ही गटांपैकी कोणाला परवानगी मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. याबाबत पोलीस, प्रशासनाने सायंकाळपर्यंत कुठलाही निर्णय घेतला नसल्याने सध्या हे प्रकरण आणखी चिघळण्याची शक्यता निर्माण झाली होती.

विधानसभा निवडणुकानंतर नवीन आमदार मिळाल्याने आता शिवजयंती उत्सवात देखील गटबाजी आणि राजकारण सुद्धा मोठ्या प्रमाणावर सुरू झाले. देखावा सादर करण्यासाठी व शासनाची जागा मिळवण्यासाठी आजी-माजी आमदारांच्या कार्यकर्त्यांच्या समोरासमोर चकमकी घडत होत्या. यावर सत्तेच्या प्रचंड दबावाखाली असलेले पोलीस, प्रशासन अक्षरशः हतबल झाले असून अधिकारी कोणाच्या बाजूने निर्णय घ्यावा या पेचात सापडले असल्याचे दिसत होते. दरम्यान उशिराने या संदर्भात तोडगा काढण्यात प्रशासनाला यश आले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 2,532
तोडगा वाद शिवजयंती उत्सव
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

देशहितासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी..; संगमनेरच्या वकिलाचे जगातील सर्वात उंच पोस्ट ऑफिसमधून थेट पत्र!

29/08/2026

नेपाळमधील महाप्रलयात संगमनेरचे ४५ पर्यटक सुखरूप; उंच ठिकाणावर असल्याने टळला मोठा अनर्थ, आज लुंबिनीतून निघून उद्या भारतात परतणार!

28/08/2026

५ लाख २५ हजार ५११ भाविकांनी एकाच वेळी “वंदे मातरम्”चे सामूहिक गायन करून नवा विश्वविक्रम

27/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

एलसीबीची छापेमारी, २.९९ लाखांचा मुद्देमाल जप्त करत १४ आरोपींवर गुन्हा दाखल

By Annant Ppangarkar29/08/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन अहिल्यानगर: अहिल्यानगर जिल्ह्यातील एमआयडीसी, जामखेड आणि बेलवंडी पोलीस ठाण्याच्या…

देशहितासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी..; संगमनेरच्या वकिलाचे जगातील सर्वात उंच पोस्ट ऑफिसमधून थेट पत्र!

29/08/2026

आज शनिवार, २९ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

29/08/2026

अहिल्यानगरमध्ये वकिलाच्या हत्येप्रकरणी ७ आरोपींना मरेपर्यंत जन्मठेप; जिल्हा न्यायालयाचा मोठा निकाल

28/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.