Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

३९ ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त, तरी आरोपीला जामीन! संगमनेर न्यायालयाच्या आदेशात नेमके काय?

09/10/2026

सायखिंडी फाटा गांजा तस्करीत आरोपींना पुन्हा १२ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कस्टडी; बँक खात्यांचे आर्थिक व्यवहार पोलिसांच्या रडारवर

09/10/2026

झाडपाल्याचे औषध देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीस मिठी मारली, संगमनेरच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीला दिली शिक्षा; काय आहे प्रकार….

09/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » सहकारमहर्षी थोरात यांच्यामुळे तालुक्याच्या जीवनात समृद्धी – माजी मंत्री बाळासाहेब थोरात
महाराष्ट्र संवाद विशेष

सहकारमहर्षी थोरात यांच्यामुळे तालुक्याच्या जीवनात समृद्धी – माजी मंत्री बाळासाहेब थोरात

१५ व्या स्मृतीदिनानिमित्त अमृत उद्योग समूहात अभिवादन
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar14/03/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp
संगमनेर – प्रतिनिधी
थोर स्वातंत्र्यसेनानी भाऊसाहेब थोरात यांनी स्वातंत्र्यलढ्यातील सहभागानंतर संगमनेर तालुका हा आपले कुटुंब मानले. गोरगरीब सर्वसामान्य माणसाच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी त्यांनी आयुष्यभर काम केले. संगमनेर तालुक्याची विकासकामांमधून झालेली वाटचाल ही कौतुकास्पद आहे. हे वातावरण चांगले राहावे यासाठी आपल्याला काम करायचे आहे. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्यामुळे तालुक्याच्या जीवनात समृद्धी निर्माण झाली असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.
अमृत उद्योग समूहाच्या वतीने सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात कारखाना कार्यस्थळावर आयोजित १५ व्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, माधवराव कानवडे, दुर्गाताई तांबे, बाबा ओहोळ, रणजितसिंह देशमुख, शंकरराव खेमनर, इंद्रजीत थोरात, डॉ. जयश्री थोरात, संपतराव डोंगरे, सुधाकर जोशी, रामहरी कातोरे, टाटा कॅन्सर हॉस्पिटलचे विभाग प्रमुख डॉ. हसमुख जैन, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, अनिल शिंदे आदिसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना थोरात म्हणाले, तीर्थरूप भाऊसाहेब थोरात यांनी अगदी तरुण वयात स्वातंत्र्य संग्रामात उडी घेतली. संगमनेर अकोले तालुक्यातील सहकाऱ्यांसह ब्रिटिशाविरुद्ध लढा दिला. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर तालुक्यातील गोरगरीब आणि सर्वसामान्य माणसाच्या विकासाकरता सहकाराचा मार्ग निवडला. तालुका हे आपले कुटुंब म्हणून आयुष्यभर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी योगदान दिले. त्यांनी केलेल्या विकासाच्या पायाभरणीतून आज संगमनेर तालुका उभा राहिला आहे.
येथील सहकार शिक्षण, सामाजिक सलोखा, बंधुभावाचे वातावरण भरलेली बाजारपेठ ही अनेक दिवसांच्या कामातून निर्माण झाली आहे. त्यांच्या विचारांचा आदर्श घेऊन हे चांगले वातावरण ठेवून तालुक्याचा विकास व समाज जीवन अधिक समृद्ध करण्यासाठी आपण काम करत आहोत.
वारकरी संप्रदायाने सर्व जाती धर्म यांना मानवतेचा धर्म शिकवला असून सहज सोप्या पद्धतीने अध्यात्माचा मार्ग शिकवला आहे. हरिनामाचा जप अंतकरणापासून केल्याने प्रार्थना पूर्ण होते. संतांचे विचार घेऊन मानवतेच्या विकासासाठी प्रत्येकाने चांगले आचरण करावे असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी विनोद राऊत यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे रघुपती राघव राजाराम, या विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला, संत गाडगेबाबांचे आदत बुरी सुधारलो बस होगा भजन, संत नामदेवांचे तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल हे विविध भजन सादर केले. ज्या भजन संगीत कार्यक्रमाचे निवेदन संत साहित्याचे अभ्यासक प्रा. विठ्ठल शेवाळे यांनी केले.यावेळी अमृत उद्योग समूहातील सर्व संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अमृतमंथन मधील प्रसंगाने सर्व मंत्रमुग्ध… सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांचे आत्मचरित्र अमृत मंथन व अमृत गाथा या पुस्तकांचे ऑडिओ बुक तयार केले आहे. स्टोरी टेल ॲप व youtube वर उपलब्ध असलेल्या गिरीश कुलकर्णी यांच्या आवाजातील काही प्रसंग आज या कार्यक्रमात ऐकवल्याने उपस्थित सर्व कार्यकर्ते मंत्रमुग्ध झाले.
anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 633
बाळासाहेब थोरात
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

एक सशक्त आणि अष्टपैलू अभिनेता काळाच्या पडद्याआड गेला; संगमनेरमधून या नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली

08/10/2026

महात्मा गांधी हे भारतीय तत्त्वज्ञानाचे प्रतिबिंब: संदीप वाकचौरे

07/10/2026

तत्कालीन मंत्री बाळासाहेब थोरात यांचा एक फोन आणि सोयाबीनला ४ हजार रुपयांची मदत; दुष्काळात शेतकऱ्यांना जाणवू लागली अनुभवी नेतृत्वाची उणीव

07/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
न्यायालय

३९ ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त, तरी आरोपीला जामीन! संगमनेर न्यायालयाच्या आदेशात नेमके काय?

By Annant Ppangarkar09/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने एमडी ड्रग्ज बाळगल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात…

सायखिंडी फाटा गांजा तस्करीत आरोपींना पुन्हा १२ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कस्टडी; बँक खात्यांचे आर्थिक व्यवहार पोलिसांच्या रडारवर

09/10/2026

झाडपाल्याचे औषध देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीस मिठी मारली, संगमनेरच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीला दिली शिक्षा; काय आहे प्रकार….

09/10/2026

शुक्रवार ०९ ऑक्टोंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

09/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.