Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा उद्या शुभारंभ; जाणून घ्या कितवा आहे हा हंगाम!

13/10/2026

पंचनाम्यात वेळ घालवू नका, सरसकट मदत करा! दिल्लीवरून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून बाळासाहेब थोरात आक्रमक!

13/10/2026

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

13/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » शांतता समिती बैठकीत वाद, कायदा हातात घ्याल तर तो वापरण्याचा आम्हाला पूर्ण अधिकार… पोलीस अधिकाऱ्यांनी बैठकीत सुनावले; नेमकं काय घडलं
प्रशासन

शांतता समिती बैठकीत वाद, कायदा हातात घ्याल तर तो वापरण्याचा आम्हाला पूर्ण अधिकार… पोलीस अधिकाऱ्यांनी बैठकीत सुनावले; नेमकं काय घडलं

यावर्षी शिवजयंती मिरवणुकीसाठी चार वाजता शिवसेना (शिंदे) तर सहा वाजता हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे गटाला परवानगी देण्यात आली आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar15/03/2025Updated:15/03/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, दि. १५ मार्च – प्रतिनिधी
आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने शनिवारी बोलावलेल्या शांतता समितीचीच्या बैठकीत मिरवणुकीच्या परवानगीवरून शिवसेनेच्या दोन्ही गटांनी दावा ठोकल्याने वाद निर्माण झाला. दोन्ही गटाचे उत्सव समितीचे कार्यकर्ते, शिवसैनिक, पदाधिकारी एकमेकांवर धावून गेले. निर्माण झालेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधिकाऱ्यांनी थेट “कायदा हातात घ्याल तर तो वापरण्याचा आम्हाला पूर्ण अधिकार आहे, तुमची इज्जत येथे घालवू नका” अशा शब्दात सर्वांना सुनावल्याने निर्माण झालेला वाद निवळला.
संगमनेरचे पोलीस उप अधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे, पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या उपस्थितीत शनिवारी (१५ मार्च) यशवंतराव चव्हाण प्रशासकीय भवनामध्ये मार्च एप्रिल मध्ये होणाऱ्या सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठक बोलवण्यात आली होती. शिवजयंती उत्सवाच्या दिवशी काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीवर दोन्ही शिवसेनेकडून दावा ठोकण्यात आला. यात तोडगा निघण्याऐवजी वाद वाढत गेल्याने कार्यकर्ते पदाधिकारी थेट एकमेकांवर धावून गेले.
पोलीस उपअधीक्षक सोनवणे, पोलीस निरीक्षक देशमुख यांनी तुमची इज्जत येथे घालवू नका, कायदा हातात घालतात वापरण्याचा आम्हाला अधिकार आहे. किती वेळा आम्ही राजकीय लोकांचे मनधरणी करायची आमचीही काही जबाबदारी आहे यापुढे वाद घालणाऱ्या लोकांवर कारवाई करावी लागेल, अशा शब्दात दोन्ही पोलीस अधिकाऱ्यांनी सुनावल्यानंतर वात शांत झाला. त्यानंतर बैठकीत मिरवणूक मार्ग, रस्ते, वीज आदी संदर्भात चर्चा करण्यात आली.
पोलीस उपाधीक्षक सोनवणे म्हणाले, शांतता कमिटीला एक अर्थ असतो, तुमचे सगळ्यांचे वागणे त्याला धरून नाही. वाद निवाळण्याचे काम शांतता पदाधिकाऱ्यांच्या असते. कोणत्याही गुन्ह्याचे परिणाम गंभीर असतात. ज्यांनी परिणाम भोगले ते शांततेची भूमिका घेतात मात्र नवीन लोक वाद करतात. आपल्याला मिळालेल्या राजकीय पदाची एक जबाबदारी असते. आम्ही किती वेळा राजकीय लोकांची मनधरणी करायची. आमचीही काही जबाबदारी आहे यापुढे कारवाई करावी लागेल. मिरवणुकांसाठी सर्वांना परवानगी देण्याचा आमचा प्रयत्न असून ठरवून दिलेल्या वेळेत शांततेत मिरवणुका पार पाडा मिरवणूक संदर्भात आयोजकांना सूचना दिल्या जातील असे ते म्हणाले.

वाद मिटले…
यावर्षी शिवजयंती मिरवणुकीसाठी चार वाजता शिवसेना (शिंदे) तर सहा वाजता हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे गटाला परवानगी देण्यात आली आहे. तर पुढील वर्षी या उलट स्थिती असेल. चार वाजता ठाकरे गट तर सहा वाजता शिंदे गट असे नियोजन करण्यात आले असून वाद मिटल्याची माहिती शिवसेनेचे (ठाकरे) माजी शहरप्रमुख अमर कतारी यांनी दिली.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 2,175
कुणाल सोनवणे रवींद्र देशमुख वाद शांतता समिती बैठक
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

५० लाखांची कथित खंडणी अन् प्रशासकीय अनागोंदी: मुख्याधिकारी सक्तीच्या रजेवर, जिल्हाधिकाऱ्यांची कठोर कारवाई; नायब तहसीलदार मोहसीन शेख यांच्याकडे अतिरिक्त पदभार

24/09/2026

अन्न व औषध प्रशासनाची संगमनेरमध्ये कारवाई: २.६० लाखांचे संशयास्पद ‘काऊ घी’ जप्त, तर भेसळप्रकरणी दुग्ध केंद्राचा परवाना निलंबित

22/09/2026

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर संगमनेर उपविभागात पोलीस प्रशासनाची मोठी कारवाई; गुन्हेगारी पार्श्वभूमीचे सात जण जिल्ह्यातून हद्दपार

15/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शेती व सहकार

थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा उद्या शुभारंभ; जाणून घ्या कितवा आहे हा हंगाम!

By Annant Ppangarkar13/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ उद्या बुधवारी…

पंचनाम्यात वेळ घालवू नका, सरसकट मदत करा! दिल्लीवरून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून बाळासाहेब थोरात आक्रमक!

13/10/2026

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

13/10/2026

शिक्षण क्षेत्राची मान उंचावणारी बातमी! संगमनेरच्या या लेखकाच्या चार पुस्तकांचा शासनमान्य ग्रंथ निवडसुचित समावेश; वाचा सविस्तर

13/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.