Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यातील विविध रस्ते मजबुतीकरणासाठी ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर; आमदार सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्याला यश

10/10/2026

MPSC आंदोलनाला डॉ. जयश्रीताई थोरात यांचा पाठिंबा; समाज आणि आयोगातील ब्लड कॅन्सर ठीक करायचाय!

10/10/2026

आमदार अमोल खताळ यांनी वेधले ऊर्जा राज्यमंत्र्यांचे लक्ष; मेंढवन उपकेंद्राचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी

10/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » रविवार विशेष… देवेंद्रजी, आवरा या सनातन्यांना!
विश्लेषण

रविवार विशेष… देवेंद्रजी, आवरा या सनातन्यांना!

लेखक दैनिक आपलं महानगरचे माजी निवासी संपादक असून मुंबईतील जेष्ठ पत्रकार व राजकीय विश्लेषकआहेत.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar16/03/2025Updated:16/03/2025No Comments5 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp
गेल्या काही महिन्यांपासून राज्याच्या सामाजिक सलोख्याला गालबोट लावणार्‍या सनातन्यांचा धीर दररोज चेपला जातो आहे. आपल्यावर कारवाई होणार नाही, अशी खात्रीच त्यांना पटल्याने काहीही करायचा मार्ग त्यांनी अनुसरला आहे. यामुळे महाराष्ट्राची बदनामी होतेच आहे पण जे उत्तर प्रदेशमध्ये घडायचं ते महाराष्ट्रात घडू लागलंय याचं वैषम्य वाटू लागलं आहे. विशेष म्हणजे ज्यांच्याकडे विश्‍वासाने पाहिलं जात होतं ते देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री असताना आणि त्यातही सार्‍या गृह विभागाची जबाबदारी त्यांच्याकडे असताना सनातनी ज्या पध्दतीने मान वर काढत आहेत, ते पाहिलं की राज्याचं काही खरं नाही, अशी भीती वाटू लागते आहे.
देशभर सुरू असलेल्या होळीच्या पार्श्‍वभूमीवर राजापूरमध्ये घडलेल्या अघटीत घटनेने राज्याची मान शरमेने खाली गेली आहे. जगातली रहस्यमयी गंगा ज्या राजापूरला मिळाली, शंभू राजेंना सर्वात सुरक्षित वाटणारं ठिकाण म्हणजे राजापूर, शंभू राजांना संगमेश्‍वरला अटक होण्यापूर्वी सोबत असलेल्या ताराराणींना सुरक्षित ठेवण्यासाठी राजेंनी राजापूरची निवड केली होती. आरमाराने ताराराणींना राजापूरमार्गे सिंधुदुर्गला पाठवण्याच्या सूचना मावळ्यांना केल्या होत्या. जुवे बेटावर ताराराणी सुखरूप पोहोचल्याचं बक्षिस म्हणून हे बेट मालोजी खोत, शिंदे, कांबळींना इनाम म्हणून देण्यात आलं. मधू दंडवतेंचा मतदार संघ, नाणारच्या आंदोलनाचं केंद्र अशा असंख्य ओळखीचं गाव म्हणजे राजापूर. एव्हाना शांत आणि निर्गवी म्हणून ओळखल्या जाणार्‍या राजापूरमध्ये मिठाचा खडा पडावा अशा घटना घडत आहेत. गुरुवारच्या घटनेने सार्‍यांनाच हादरवून सोडलं. घडल्या घटनेने कोकण आणि कोकणी माणसाची कधी नव्हे इतकी बदनामी झाली. ज्या गतीने हे सारं घडलं, ते पाहाता महाराष्ट्र हाती ठेवण्यासाठी फडणवीस यांना प्रयत्नांची प्रचंड पराकाष्टा करावी लागेल हे सांगायला नको.
राजापूरची घटना ही एक निमित्तमात्र होती. अशा घटना राज्यात घडण्याची कारणं लक्षात घेतली तर एक गोष्ट स्पष्ट दिसते ती ही की, काहीजण राज्यातील सामाजिक सलोखा बिघडवण्याचा ठेका घेतल्यागत काम करत असल्याचं दिसून येईल. हे घडवण्यात आघाडीवर असलेल्यांची सर्वाधिक संख्या ही सत्ताधार्‍यांची आहे. हाती सत्ता असते तेव्हा सत्ताधारी पक्षाने अधिक जबाबदारीने आणि तितक्याच समजदारीने वागलं पाहिजे. मात्र गेल्या काही दिवसांपासून सत्तेतील काही मंडळी ज्या प्रकारे वर्तन करत आहेत ते पाहाता त्यांनी फडणवीस यांच्यापुढे आव्हानच उभी करण्याचा चंग बांधलाय असं दिसतं. स्वत:ला कोकणचा सुपूत्र समजणारे राज्याचे बंदरविकास मंत्री निलेश राणे हे यात आघाडीवर आहेत. त्यांची मंत्रिपदावर वर्णी लागल्यापासूनची भाषा पाहिली की ते राज्यात सलोखा बिघडवण्यासाठीच मंत्री झालेत की काय अशा शंकेला वाव आहे.
या मंत्र्याची याआधीची वक्तव्यं धुंडाळली तेव्हा त्यांनी आजच्या मुख्यमंत्र्यांविषयी केलेल्या टिपण्ण्या किती वाईट आणि जात्यंध होत्या की त्याची तुलनाच करता येणार नाही. मराठा आंदोलनाच्या निमित्ताने त्यांनी फडणवीस यांच्या विरोधात आग ओकणारी केलेली भाषणं इतकी विखारी होती की हे राणे फडणवीसांच्या मांडीला मांडी लावून बसतील, असं सुतराम वाटलं नव्हतं. सत्तेत सहभागी झाल्यावर त्यांनी आपली टोपी बदलली आणि फडणवीसांचे गोडवे गाण्याच्या स्पर्धेचे ते भोई झाले. फडणवीसांच्या मंत्रिमंडळात स्थान मिळाल्यापासून त्यांच्या जिभेला हाड राहिलेलं नाही. विरोधी पक्षांवर अश्‍लाघ्य टीका करताना आपण राज्याचे मंत्री आहोत याचं भान त्यांना नाही. संविधान, गोपनीयता आणि सामाजिक सलोखा राखण्याच्या शपथेचाही त्यांना विसर पडला आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांनी मुस्लिमांविषयी केलेल्या वक्तव्यांची चाचपणी केली तर मंत्री म्हणून राहण्याचा अधिकार नितेश यांना राहिलेला नाही, असंच चित्र आहे. मुस्लिमांवर टीका करण्यासाठी त्यांनी गाठलेली पातळी पाहिली की आजवर कोणालाही जमलं नाही इतक्या खालच्या थराची भाषा त्यांच्या तोंडी येत असते. ज्या भाषेचं कोणीही समर्थन करू शकत नाही.
एक मंत्री अशी भाषा उघडपणे बोलत असताना त्याचं काहीही बिघडत नाही. मुख्यमंत्री म्हणून त्यावर कोणाचाच अंकुश नाही, त्याच्यावर कोणतीच कारवाई होत नाही, असं लक्षात आल्यावर त्याला मानणार्‍या सनातन्यांचा चेव वाढला आणि त्यांनी राजापूरसारखा अतिरेक केला. तेव्हा घडलेल्या घटनेला नैतिक जबाबदार ठरवून या मंत्र्याला मंत्रिपदावरून तात्काळ निष्कासित करून त्याच्यावर नियमानुसार कारवाई व्हायला हवी. हे न झालं तर या मंत्र्याप्रमाणेच इतरही शक्ती डोकं वर काढतील आणि उदाहरणादाखल मंत्र्याचा उद्दामपणा पुढे करतील. राज्यात प्रचंड ताकदीची सत्ता प्राप्त झाल्यावर मंत्र्यांकडून अधिक जबाबदारीच्या वर्तनाची अपेक्षा जनतेला होती. सत्ता प्राप्तीच्या चर्चेकडे दुर्लक्ष करून जनतेला आपलंसं करण्याची संधी देवेंद्र पडणवीस यांच्या नेतृत्वातील सत्तेला होती. मात्र सरकार आल्यापासून सुरू असलेल्या सत्ता स्पर्धा लक्षात घेतल्या तर सत्तेवरील फडणवीसांचा प्रभाव कमी करण्याच्या मागे अनेकजण लागल्याचं चित्र आहे.
त्यात या कोकणातल्या मंत्र्याचा समावेश ठळकपणे दिसू लागला आहे. मुख्यमंत्र्यांच्या मागे नको त्या घोषणा करणं, मंत्रिमंडळातील बातम्या बाहेर फोडणं, दुसर्‍या मंत्र्यांविषयी माध्यमांना गैर माहित्या पोचवणं असल्या गोष्टी अनेकजण मुख्यमंत्र्यांच्या मागे करत आहेत. होळी आणि रंगपंचमीच्या मुहूर्तावर धार्मिक तेढीचं केंद्र बनलेल्या उत्तर प्रदेशात मशिदी झाकून ठेवण्याचा फतवा तिथल्या गृहविभागाने काढला तेव्हा प्रचंड टीका झाली. आज मशिद झाकली उद्या मुस्लिम बहुल परिसरातील मंदिर बंद करणार का, असा प्रश्‍न तिथल्या पोलीस प्रमुखांना विचारला जात आहे, जो अत्यंत रास्त आहे. मशिदींना टार्गेट करणार्‍यांची उत्तर प्रदेशात सध्या चलती आहे. हे संकट इतर ठिकाणीही येऊ शकते, याचा अंदाज राज्याच्या पोलीस प्रमुखांना आणि रत्नागिरीच्या पोलीस अधीक्षकांना आला नाही? महाराष्ट्रात अशा घटना याआधी घडल्या नाहीत असं नाही. अशा अप्रिय घटना घडू नयेत, म्हणून संबंधितांवर कठोर कारवायाही झाल्या. कोर्ट कचेर्‍यांच्या फेर्‍या घडवून त्यांना जेरीसही आणलं गेलं.
आज तशा कारवाया धुसर वाटू लागल्याचे परिणाम राजापूरच्या घटनेने दाखवून दिले आहेत. 1992 च्या मुंबईत झालेल्या दंगली असोत की त्यानंतरच्या बॉम्बस्फोटाच्या घटना असोत. हिंदू बहुल कोकणच्या किनारपट्टीने अशा गोष्टींना कधीच थारा दिला नाही. एकमेकांशी अत्यंत गोडीने आणि सलोख्याने वावरणार्‍या कोकणचं कोण कौतुक व्हायचं. हा आपलेपणा इतक्या जलद लोप पावेल, असं अजिबात नव्हतं. मात्र काही विघ्नसंतोषी व्यक्तींनी या गोष्टींचा गैरफायदा घेत कोकणी तरुणांची माथी भडकवण्याचे उद्योग सुरू केले आहेत. हातच्या कामापासून दूर असलेल्या तरुणांना मंदिर आणि मशिदीच्या वादात अडकवून काहींनी आपली पोळी भाजण्याचे उद्योग सुरू केले आहेत. राजापूरच्या होलिकोत्सवाला कोकणात अनन्यसाधारण महत्व आहे. धुतपापेश्‍वर आणि नवलादेवीच्या पालख्यांमधून वाजत गाजत आणलेला माडाचा शेवरा जवाहर चौकातील जामा मशिदीच्या पहिल्या पायरीवर ठेवून मान देण्याची परंपरा आहे. या परंपरेचा गैरफायदा घेत ठरवून आलेल्या काही हुल्लडांनी हा शेवरा पहिल्या पायरीवर ठेवण्याऐवजी थेट मशिद आवाराच्या गेटला धडकवला आणि वादाची ठिणगी पडली. साखळीला बांधलेला गेट शेवर्‍याच्या धडकेने तुटला. गेट तुटल्याच्या आवेशाने मग जय श्रीरामाच्या घोषणा सुरू झाल्या. गेटला धडक देऊन जणू तीर साधला अशा अविर्भावातील हुल्लडांचा व्हिडिओतील आवेश पाहिला की त्यांचा हेतू लक्षात येतो.
या घटनेनंतर तरावीहची नमाज पाडणारे तरुण बाहेर आले आणि वादाला तोंड फुटलं. ज्यांनी हे कृत्य केलं त्या तरुणांनी कोकणची बदनामी केलीच पण महाराष्ट्रालाही मान शरमेने खाली घालायला लावली आहे. गृहखात्याची, त्याचबरोबर राज्याच्या पोलिसांची बदनामी करणार्‍यांवर तात्काळ कारवाई करण्यासाठी कोणताही मुलाहिजा ठेवता नये. या प्रकरणाचे पडसाद विधिमंडळात उमटणे स्वाभाविक आहे. तेव्हा इतर राज्यात काय झालं? तुमच्या सत्तेवेळी काय झालं? असली उत्तरं देण्याऐवजी राज्याच्या बदनामीला कारण ठरलेल्यांचं काय करणार इतकंच उत्तर फडणवीसांकडून राज्यातल्या जनतेला अपेक्षित आहे.
(लेखकाशी संपर्क भ्रमणध्वनी – ९८६९१३५२५३)
anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 784
देवेंद्र फडणवीस प्रवीण पुरो
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

रविवार विशेष लेख — फुले-आंबेडकर साहित्याला विष संबोधणारे बौद्धिक दलाल

04/10/2026

पराभूत होऊनही लोकनेते बाळासाहेब थोरातांचे राजकीय वलय संपत का नाही? वाचा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याने केलेले विश्लेषण…

30/09/2026

रविवार विशेष लेख ज्ञानेशाच्या नावानं भाजपचं चांगभलं!

27/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यातील विविध रस्ते मजबुतीकरणासाठी ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर; आमदार सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्याला यश

By Annant Ppangarkar10/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- भौगोलिकदृष्ट्या विस्ताराने मोठ्या असलेल्या संगमनेर तालुक्यातील ग्रामीण रस्त्यांचे जाळे अधिक भक्कम…

MPSC आंदोलनाला डॉ. जयश्रीताई थोरात यांचा पाठिंबा; समाज आणि आयोगातील ब्लड कॅन्सर ठीक करायचाय!

10/10/2026

आमदार अमोल खताळ यांनी वेधले ऊर्जा राज्यमंत्र्यांचे लक्ष; मेंढवन उपकेंद्राचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी

10/10/2026

शनिवार १० ऑक्टोंबर — जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा असेल

10/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.