Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यातील विविध रस्ते मजबुतीकरणासाठी ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर; आमदार सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्याला यश

10/10/2026

MPSC आंदोलनाला डॉ. जयश्रीताई थोरात यांचा पाठिंबा; समाज आणि आयोगातील ब्लड कॅन्सर ठीक करायचाय!

10/10/2026

आमदार अमोल खताळ यांनी वेधले ऊर्जा राज्यमंत्र्यांचे लक्ष; मेंढवन उपकेंद्राचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी

10/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » मालपाणी पॅलेसमध्ये लग्न समारंभासाठी तयार केलेल्या स्टेजला आग, एक जण गंभीर
महाराष्ट्र संवाद विशेष

मालपाणी पॅलेसमध्ये लग्न समारंभासाठी तयार केलेल्या स्टेजला आग, एक जण गंभीर

दरम्यान या आगीमध्ये एक जण गंभीरित्या भाजला असल्याची माहिती समोर येत आहे. तर एक जण बचावला आहे. जखमींना तात्काळ खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar19/03/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, दि. १९ मार्च – प्रतिनिधी 

कासारवाडी शिवारात असलेल्या मालपाणी हेल्थ क्लब येथील विवाह समारंभासाठी वापरल्या जाणाऱ्या मालपाणी पॅलेस मध्ये उभारण्यात आलेल्या स्टेजला बुधवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. लागलेल्या आगीमध्ये एक जण गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. तर एक जण बचावला असल्याची माहिती समोर येत आहे.

घटनास्थळी अग्निशामक दल, रुग्णवाहिका, नगरपरिषद आणि हजर झाले आहे. आगीचे निश्चित कारण समजू शकले नसले तरी स्टेज उभारण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या कटरच्या निर्माण झालेल्या ज्वालांमुळे थर्माकोलने पेट घेतल्याने ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

मालपाणी पॅलेसचा वापर विवाह समारंभासह अन्य काही कारणांसाठी केला जातो. बुधवारी दुपारी पॅलेसच्या या मैदानावर एका समारंभासाठी स्टेजची तयारी केली जात होती. ही तयारी अंतिम टप्प्यात असतानाच आगीची घटना घडल्याची माहिती समोर येत आहे. साडेतीन वाजण्याच्या सुमारास रखरखत्या उन्हात व्यासपीठावर तयार करण्यात आलेल्या डेकोरेशनने भेट घेतल्याने मोठा आगीचा भडका उडाला होता. क्षणातच आगीने मोठ्या प्रमाणात पेट घेतल्याने काही मिनिटातच समारंभासाठी उभे करण्यात आलेले व्यासपीठ जळून खाक झाले.

घटनास्थळी अग्निशामक दलाला प्राचारण करण्यात आले होते. संगमनेर नगर परिषदेचे उपमुख्य अधिकारी संजय पेखळे, बांधकाम अभियंता प्रशांत जुन्नरे, पाणीपुरवठा अभियंता अमृत काजवे, कार्यालयीन निरीक्षक राजेंद्र गुंजाळ, अमजद पठाण सतीश बुरुंगुले प्रवीण ताजने यांनी तात्काळ घटनास्थळी घाव घेतली. संगमनेर साखर कारखान्यासह काही अग्निशामकच्या मदतीने लागलेली आग विझविली जात होती.

https://maharashtrasanvadnews.com/wp-content/uploads/2025/03/VID-20250319-WA0032.mp4

आगीच्या ज्वाळा लांब वर पसरल्याने पॅलेसच्या कंपाउंड बाहेर असलेल्या उसाने देखील काही प्रमाणात पेट घेतला होता. आगी सोबतच ऊस वाचविण्याचे काम अग्निशामक दलाला करावे लागले.

दरम्यान या आगीमध्ये एक जण गंभीरित्या भाजला असल्याची माहिती समोर येत आहे. तर एक जण बचावला आहे. जखमींना तात्काळ खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. घटनास्थळी मालपाणी उद्योग समूहाचे प्रमुख राजेश मालपाणी, मनीष मालपाणी उपस्थित होते. पोलीस उपाधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे यांनीही घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली.

बंदी असलेल्या थर्माकोलचा वापर…

दरम्यान आगीच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात थर्माकोल आढळून आले असून या व्यासपीठासाठी थर्माकोलचा वापर करण्यात आल्याचे दिसून येत होते. बंदी असताना देखील मोठ्या प्रमाणात थर्माकोलचा वापर होत असल्याने संबंधितांवर काय कारवाई केली जाते याकडे लक्ष लागले आहे.

 

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 6,396
आग जखमी दुर्घटना मालपाणी पॅलेस
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

MPSC आंदोलनाला डॉ. जयश्रीताई थोरात यांचा पाठिंबा; समाज आणि आयोगातील ब्लड कॅन्सर ठीक करायचाय!

10/10/2026

महात्मा गांधी हे भारतीय तत्त्वज्ञानाचे प्रतिबिंब: संदीप वाकचौरे

07/10/2026

फक्त गतिरोधक नव्हे, अवजड वाहतूक आणि अतिक्रमणावरही ठोस कारवाई करा : इरफानभाई मन्सुरी

06/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यातील विविध रस्ते मजबुतीकरणासाठी ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर; आमदार सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्याला यश

By Annant Ppangarkar10/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- भौगोलिकदृष्ट्या विस्ताराने मोठ्या असलेल्या संगमनेर तालुक्यातील ग्रामीण रस्त्यांचे जाळे अधिक भक्कम…

MPSC आंदोलनाला डॉ. जयश्रीताई थोरात यांचा पाठिंबा; समाज आणि आयोगातील ब्लड कॅन्सर ठीक करायचाय!

10/10/2026

आमदार अमोल खताळ यांनी वेधले ऊर्जा राज्यमंत्र्यांचे लक्ष; मेंढवन उपकेंद्राचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी

10/10/2026

शनिवार १० ऑक्टोंबर — जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा असेल

10/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.