Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

माहिती अधिकाराचे प्रणेते अण्णा हजारे यांची मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी घेतली सदिच्छा भेट; प्रकृतीची केली विचारपूस

03/09/2026

अहिल्यानगरमध्ये ४० नशेची इंजेक्शन्स जप्त; व्यायामपटूंकडून वापराचा संशय, तिघांना अटक

03/09/2026

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५.३० लाखांचा मुद्देमाल जप्त, ११ जणांवर गुन्हे दाखल

03/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » दोन सख्ख्या भावांची हत्या, ५ जणांना अटक
गुन्हेगारी

दोन सख्ख्या भावांची हत्या, ५ जणांना अटक

पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. पुढील कारवाईसाठी आरोपींना उपनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar20/03/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

नाशिक, दि. २० मार्च –

नाशिक-पुणे महामार्गावरील बोधले नगरजवळील आंबेडकर वाडी येथे बुधवारी (१९ मार्च २०२५) रात्री ९ ते १० च्या सुमारास दोन सख्ख्या भावांची हत्या करण्यात आली. उमेश उर्फ मन्ना जाधव आणि प्रशांत जाधव अशी मृतांची नावे आहेत. या प्रकरणी पोलिसांनी तत्परता दाखवत अवघ्या सहा तासांत पाच संशयित आरोपींना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परिसरात वर्चस्व राखण्याच्या उद्देशाने ही हत्या करण्यात आली. क्राईम ब्रांच युनिट १ च्या पथकाने तपास सुरू केला असता, पोलीस नाईक मिलिंदसिंग परदेशी आणि हवालदार विशाल काठे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, संशयित आरोपी सागर गरड आणि त्याचे साथीदार नाशिकच्या छत्रपती संभाजीनगर रोडवरील डाळिंब मार्केट येथे येणार असल्याची माहिती मिळाली.

त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून पाच जणांना अटक केली. सागर मधुकर गरड (वय ३२, रा. आंबेडकरवाडी, उपनगर, नाशिक), अनिल विष्णू रेडेकर (वय ४०, रा. उत्तरानगर, पोतदार शाळेजवळ, तपोवन रोड, नाशिक), सचिन विष्णू रेडेकर (वय ४४, रा. गायत्री नगर, पुणे रोड, नाशिक), अविनाश उर्फ सोनू नानाजी उशिरे (वय २६, रा. सर्वेश्वर चौक, नवीन सिडको, उत्तमनगर, नाशिक) व योगेश चंद्रकांत रोकडे (वय ३०, रा. आंबेडकरवाडी, उपनगर, नाशिक) अशी पोलिसांनी पकडलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. पुढील कारवाईसाठी आरोपींना उपनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त (गुन्हे) प्रशांत बच्छाव, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा युनिट १ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, रवींद्र बागुल, सुदाम सांगळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केली. तसेच, पंचवटी पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी आणि तांत्रिक विश्लेषण विभागातील कर्मचाऱ्यांनीही या कारवाईत मदत केली. या घटनेमुळे नाशिक शहरात खळबळ उडाली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 2,613
क्राईम नाशिक पोलीस कारवाई हत्या
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

अहिल्यानगरमध्ये ४० नशेची इंजेक्शन्स जप्त; व्यायामपटूंकडून वापराचा संशय, तिघांना अटक

03/09/2026

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५.३० लाखांचा मुद्देमाल जप्त, ११ जणांवर गुन्हे दाखल

03/09/2026

अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा जप्त, २५.६० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

03/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

माहिती अधिकाराचे प्रणेते अण्णा हजारे यांची मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी घेतली सदिच्छा भेट; प्रकृतीची केली विचारपूस

By Annant Ppangarkar03/09/20260

Annant Ppangarkar मुंबई: माहिती अधिकाराचे प्रणेते आणि ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे सध्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे…

अहिल्यानगरमध्ये ४० नशेची इंजेक्शन्स जप्त; व्यायामपटूंकडून वापराचा संशय, तिघांना अटक

03/09/2026

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५.३० लाखांचा मुद्देमाल जप्त, ११ जणांवर गुन्हे दाखल

03/09/2026

अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा जप्त, २५.६० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

03/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.