Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

राजहंस हा गुणवत्तेचा आणि विश्वासाचा अस्सल ब्रँड: माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

17/09/2026

१८ व्या संगमनेर फेस्टिवलचे दिमाखदार उद्घाटन; समीर चौगुलेंच्या ‘सम्या-सम्या मैफिलीत माझ्या’ने संगमनेरकर मनमुराद हसले

17/09/2026

आमदार सत्यजीत तांबे यांच्या संकल्पनेतून ‘महावादन’चा जल्लोष; संगमनेर दुमदुमले!

17/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » गोवंश हत्या आणि वक्फ बोर्ड जमिनीचा मुद्दा विधानसभेत; आमदार अमोल खताळ यांनी सरकारचे लक्ष वेधले
राजकारण

गोवंश हत्या आणि वक्फ बोर्ड जमिनीचा मुद्दा विधानसभेत; आमदार अमोल खताळ यांनी सरकारचे लक्ष वेधले

संगमनेर मतदार संघामध्ये अनेक चुकीच्या घटना घडत आहेत. याबाबत सविस्तर माहिती घेऊन योग्य ती कारवाई केली जाईल, असे राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी सांगितले.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar20/03/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

मुंबई, दि. २० मार्च – विशेष प्रतिनिधी

संगमनेर शहरात सुरू असलेली गोवंश हत्या आणि शहरातील मोक्याच्या जागा तसेच तालुक्यातील सुकेवाडी, घुलेवाडी, पारेगाव येथील देवस्थान जमिनी वक्फ बोर्डाकडे बेकायदेशीरपणे नोंदणी झाल्याचा मुद्दा आमदार अमोल खताळ यांनी विधानसभेत मांडून राज्य सरकारचे या मूलभूत प्रश्नांकडे लक्ष वेधले.

संगमनेर शहरातील नगरपरिषदेच्या हद्दीतील नवीन नगररोडवरील सर्व्हे नंबर १४९ (जुना सर्व्हे नंबर ८०३), क्षेत्र ४ एकर १७ गुंठे या मिळकतीवर तसेच तालुक्यातील घुलेवाडी येथील सर्व्हे नंबर १६२ व १७९ येथील कानिफनाथ देवस्थान, सुकेवाडी येथील सर्व्हे नंबर १९४ मधील कान्होबा देवस्थान आणि पारेगाव येथील श्री अश्विनाथ महाराज मंदिर या देवस्थानांच्या हक्काच्या संपूर्ण जमिनीवर वक्फ बोर्ड चुकीच्या पद्धतीने दावा करत आहे.

यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे शासनाने या जमिनीबाबत योग्य ती कार्यवाही करून त्या देवस्थानांच्या नावावर परत कराव्यात. तसेच हिंदू धर्मियांच्या देवस्थानांवर होणारे हल्ले थांबले पाहिजेत, अशी लक्षवेधी विधानसभेत मांडून या मुद्याकडे राज्य शासनाचे लक्ष वेधले.

संगमनेर शहरात अनेक वर्षांपासून बेकायदेशीर कत्तलखाने सुरू आहेत. या कत्तलखान्याच्या चालक व मालकांवर वारंवार कारवाई करून गुन्हे दाखल केले जातात, मात्र प्रत्येक वेळी गोवंश कत्तल करणारा माणूस तोच असतो. गुन्हा दाखल झाल्यानंतर वेगळा माणूस उभा केला जातो. मुख्य आरोपीवर कारवाई केली जात नाही. त्यामुळे त्यांचे चांगलेच फावले जात आहे.

हिंदुत्ववादी संघटनांनी या कत्तलखान्याच्या विरोधात आंदोलन करूनही हे बेकायदेशीर कत्तलखाने बंद होत नाहीत. त्यामुळे शासनाने अनधिकृत कत्तलखान्यांवर योग्य ती कारवाई करून गोवंश हत्या बंदी करावी, अशी लक्षवेधी करत संगमनेरमध्ये सुरू असलेली गोहत्या थांबविण्यात यावी, अशी मागणी करत राज्य शासनाचे खताळ यांनी लक्ष वेधले.

पुणे जिल्ह्यात थेरगाव येथील हनुमान नगरमध्ये अनधिकृत मदरसा व मशिदीच्या बांधकामामुळे नागरी असुविधा आणि वाहतुकीच्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. या भागात अनेक बांगलादेशी वास्तव्य करत आहेत. त्यामुळे घरात घुसून स्त्रियांचे विनयभंग आणि अत्याचार यांसारखे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. त्यामुळे हे मदरसे आणि मशिदी जमीनदोस्त कराव्यात, अशी मागणी केली.

सविस्तर माहिती घेऊन योग्य ती कारवाई… पुणे जिल्ह्यात थेरगाव येथे अनधिकृत बांधकाम झाले आहे. त्यावर कारवाई करण्याचे अधिकार महापालिकेचे किंवा नगरपालिकेचे आहेत. तरी तुम्ही केलेल्या लक्षवेधीची राज्य शासनाने दखल घेतली आहे. संबंधित संस्थेला योग्य ती कारवाई करण्याचे आदेश देत आहोत. संगमनेर मतदार संघामध्ये अनेक चुकीच्या घटना घडत आहेत. याबाबत सविस्तर माहिती घेऊन योग्य ती कारवाई केली जाईल, असे राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी सांगितले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,032
अधिवेशन अमोल खताळ कत्तलखाने लक्षवेधी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर ग्रामीण भागात सायंकाळी वीज खंडित; गणेशोत्सवात नागरिक अंधारात, सरकारने घोषणांचा उत्सव थांबवून आधी ग्रामीण भागाला वीज द्यावी, काँग्रेसचे कार्याध्यक्ष शेलकर यांची मागणी

17/09/2026

संगमनेर तालुक्यात ३३ हजार ७९२ हेक्टरवरील खरीप पिकांची दैना; आमदार अमोल खताळ यांची मुख्यमंत्र्यांकडे तातडीने आर्थिक मदतीची मागणी

16/09/2026

भंडारदरा धरणातून खरीप पिकांसाठी सोमवारपासून पाणी सुटणार; गणेशोत्सवात दिलासा : आमदार खताळ

13/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शेती व सहकार

राजहंस हा गुणवत्तेचा आणि विश्वासाचा अस्सल ब्रँड: माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

By Annant Ppangarkar17/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- अवघ्या १५०० लिटर दुधापासून सुरू झालेला संगमनेर तालुका सहकारी…

१८ व्या संगमनेर फेस्टिवलचे दिमाखदार उद्घाटन; समीर चौगुलेंच्या ‘सम्या-सम्या मैफिलीत माझ्या’ने संगमनेरकर मनमुराद हसले

17/09/2026

आमदार सत्यजीत तांबे यांच्या संकल्पनेतून ‘महावादन’चा जल्लोष; संगमनेर दुमदुमले!

17/09/2026

काळाची गरज ओळखून धाडसी दूरदृष्टीचे आणि शेतकरी हिताचे निर्णय घेणे आपली सामूहिक जबाबदारी; बाळासाहेब थोरात यांचे प्रतिपादन

17/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.