Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर संगमनेर उपविभागात पोलीस प्रशासनाची मोठी कारवाई; गुन्हेगारी पार्श्वभूमीचे सात जण जिल्ह्यातून हद्दपार

15/09/2026

दिल्ली नाक्यावर कंटेनरखाली चिरडून महिलेचा मृत्यू, संगमनेर शहरातील जड वाहतुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; नागरिकांचा संताप

15/09/2026

हरेगाव येथे १९ सप्टेंबरला ‘ख्रिस्ती हक्क संघर्ष परिषद’; सुजात आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती

15/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » विधान परिषद सभापती आणि विधानसभा अध्यक्षांविरुद्ध विरोधी पक्षांची राज्यपालांकडे गंभीर तक्रार
राजकारण

विधान परिषद सभापती आणि विधानसभा अध्यक्षांविरुद्ध विरोधी पक्षांची राज्यपालांकडे गंभीर तक्रार

विधानसभेच्या दोन्ही सभागृहांच्या कामकाजात संसदीय परंपरांचे पालन व्हावे, नियमबाह्य कामकाज होऊ नये, अशी मागणी विरोधी पक्षांनी राज्यपालांकडे केली आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar21/03/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

मुंबई दि. २१ मार्च – विशेष प्रतिनिधी

महाराष्ट्राच्या विधान परिषद आणि विधानसभा सभागृहांमध्ये सभापती आणि विधानसभा अध्यक्ष पक्षपाती आणि एकांगी भूमिका घेत असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. गुरुवारी विरोधी पक्षाच्या सदस्यांनी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेऊन त्यांना यासंदर्भात निवेदन दिले.

विधानसभेच्या दोन्ही सभागृहांच्या कामकाजात संसदीय परंपरांचे पालन व्हावे, नियमबाह्य कामकाज होऊ नये, अशी मागणी विरोधी पक्षांनी राज्यपालांकडे केली आहे. विरोधी पक्षाच्या शिष्टमंडळाने सभापती आणि अध्यक्षांच्या मनमानी आणि एकांगी कामकाजाची तक्रार राज्यपालांकडे केली.

विरोधी पक्ष हा संसदीय प्रणालीतील महत्त्वाचा घटक असून, त्यांची भूमिका सरकारविरोधी नसून सरकारचे निर्णय आणि धोरणांवर अंकुश ठेवणारी आहे. आवश्यक तेथे टीका करणे आणि पर्यायी धोरणे सुचवणे हे त्यांचे काम आहे, याकडे राज्यपालांचे लक्ष वेधण्यात आले.

विरोधी पक्षाच्या सदस्यांना आपले मत मांडण्यास मर्यादा घातल्या जात असून, महत्त्वाच्या चर्चांमध्ये नियमबाह्य पद्धतीने त्यांची अडवणूक केली जाते, असा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. विधानसभेत विरोधी पक्षाच्या सदस्यांना कपात सूचना मांडण्याचा अधिकार असताना त्यांच्या सूचनांना सरकारकडून उत्तर दिले जात नाही.

पुरवणी मागण्यांच्या चर्चेच्या वेळी संबंधित खात्याचे मंत्री आणि राज्यमंत्री सभागृहात उपस्थित राहणे अनिवार्य असतानाही ते उपस्थित राहत नाहीत. तसेच, सभागृहाच्या गॅलरीत संबंधित खात्याचे सचिवही उपस्थित नसतात. संबंधित खात्याचे राज्यमंत्री उपस्थित असताना खात्याशी संबंधित नसलेल्या मंत्र्यांना चर्चेला उत्तर देण्याचा अधिकार दिला जातो, असेही विरोधी पक्षांनी निवेदनात म्हटले आहे.

विधान परिषदेचे सभापती आणि विधानसभेचे अध्यक्ष सभागृह चालवताना निष्पक्षता दाखवत नाहीत आणि त्यांनी सभागृहाचा विश्वास गमावला आहे, असे पत्र विरोधी पक्षांनी राज्यपालांना दिले आहे. राज्यपालांनी यात लक्ष घालून विरोधी पक्षाला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी विरोधी पक्षांनी केली आहे.

राज्यपालांना भेटलेल्या शिष्टमंडळात काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते आमदार विजय वडेट्टीवार, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विधिमंडळ गटनेते आमदार आदित्य ठाकरे, अंबादास दानवे, नाना पटोले, शशिकांत शिंदे, जितेंद्र आव्हाड, अनिल परब, ज. मो. अभ्यंकर, मनोज जामसुतकर, सचिन अहिर, भाई जगताप, भास्कर जाधव, सुनील राऊत, प्रवीण स्वामी, वरुण सरदेसाई, अभिजित वंजारी, अजय चौधरी, सुनील शिंदे, सिद्धार्थ खरात, कैलास पाटील यांचा समावेश होता.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 839
तक्रारी राज्यपाल विरोधी पक्ष
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आंदोलनाची हवा काढण्यासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट? : अमोल शेलकर यांचा घणाघात, पालकमंत्री व लोकप्रतिनिधींवर संगमनेरच्या हक्काची रेल्वे हिरावल्याचा थेट आरोप; कागदपत्रे सार्वजनिक करण्याचे आव्हान

09/09/2026

विशेष वृत्त राजकीय दबावातून पोलिसांची संगमनेरच्या सुरक्षेकडे पाठ; २०० कॅमेऱ्यांच्या लोकार्पण सोहळ्यावर बहिष्कारातून नागरिकांमध्ये संताप… नगरपालिकेची सुरक्षेसाठी धडपड, तर पोलीस प्रशासनाची उघड-उघड उदासीनता

08/09/2026

कौठे मलकापूरच्या औद्योगिक प्रकल्पावरून जनतेची दिशाभूल? ‘MIDC’ की केवळ औद्योगिक वसाहत; सत्तेतील दोन्ही आमदारांनी भूमिका स्पष्ट करावी : अमोल शेलकर

08/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर संगमनेर उपविभागात पोलीस प्रशासनाची मोठी कारवाई; गुन्हेगारी पार्श्वभूमीचे सात जण जिल्ह्यातून हद्दपार

By Annant Ppangarkar15/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – आगामी सण-उत्सवांच्या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी…

दिल्ली नाक्यावर कंटेनरखाली चिरडून महिलेचा मृत्यू, संगमनेर शहरातील जड वाहतुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; नागरिकांचा संताप

15/09/2026

हरेगाव येथे १९ सप्टेंबरला ‘ख्रिस्ती हक्क संघर्ष परिषद’; सुजात आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती

15/09/2026

मंगळवार, १५ सप्टेंबर रोजीचे राशीभविष्य… जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल

15/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.