Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यातील विविध रस्ते मजबुतीकरणासाठी ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर; आमदार सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्याला यश

10/10/2026

MPSC आंदोलनाला डॉ. जयश्रीताई थोरात यांचा पाठिंबा; समाज आणि आयोगातील ब्लड कॅन्सर ठीक करायचाय!

10/10/2026

आमदार अमोल खताळ यांनी वेधले ऊर्जा राज्यमंत्र्यांचे लक्ष; मेंढवन उपकेंद्राचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी

10/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेर खुर्द कचरा डेपोला भीषण आग, धुरामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात
महाराष्ट्र संवाद विशेष

संगमनेर खुर्द कचरा डेपोला भीषण आग, धुरामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

याबाबत संगमनेर नगरपालिकेचे मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी सांगितले की, उन्हाळ्यात कचरा आपोआप पेट घेतो, त्यामुळे कंपोस्ट डेपोला आग लागण्याची शक्यता आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar21/03/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, दि. २१ मार्च – प्रतिनिधी 

संगमनेर खुर्द येथील नगरपालिकेच्या कचरा डेपोला काल (गुरुवारी) सायंकाळी भीषण आग लागली. या आगीमुळे परिसरात धुराचे मोठे साम्राज्य पसरले होते. यामुळे नागरिकांना श्वास घेण्यास त्रास होत होता, तसेच वाहतुकीलाही अडथळा निर्माण झाला होता.

संगमनेर खुर्द येथे नगरपालिकेचा कंपोस्ट डेपो आहे. संगमनेर शहर व उपनगरातील सर्व कचरा या डेपोत आणून टाकला जातो. तेथे या कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते. गेल्या काही दिवसांपासून या डेपोत मोठ्या प्रमाणात कचरा साचला होता. या डेपोला काल सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण केले आणि धुराचे लोट परिसरात पसरले.

आगीची माहिती मिळताच संगमनेर नगरपालिकेच्या अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. दोन अग्निशमन गाड्यांच्या मदतीने रात्री उशिरा ही आग विझवण्यात आली. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

आग विझल्यानंतरही परिसरात धुराचे मोठे साम्राज्य पसरले होते. या परिसरात मोठी लोकवस्ती आहे. हा कंपोस्ट डेपो इतर ठिकाणी हलवावा, अशी मागणी संगमनेर खुर्द परिसरातील नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून करत आहेत. मात्र, अद्याप याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. हा वाद न्यायालयात प्रलंबित आहे.

या कंपोस्ट डेपोत मोठ्या प्रमाणात प्लास्टिक टाकले जाते, त्यामुळे आग लागल्यानंतर विषारी धूर तयार होतो. यामुळे परिसरातील वातावरण प्रदूषित झाले आहे, असे नागरिकांनी सांगितले. या कंपोस्ट डेपोत मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जातो. कचरा टाकण्यासाठी जागा शिल्लक नसल्याने जाणीवपूर्वक आग लावली जात असावी, अशी शंका नागरिकांनी व्यक्त केली आहे. या कंपोस्ट डेपोमुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. हा कंपोस्ट डेपो अन्य ठिकाणी हलवावा, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.

याबाबत संगमनेर नगरपालिकेचे मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी सांगितले की, उन्हाळ्यात कचरा आपोआप पेट घेतो, त्यामुळे कंपोस्ट डेपोला आग लागण्याची शक्यता आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,115
आग कचरा डेपो रामदास कोकरे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

MPSC आंदोलनाला डॉ. जयश्रीताई थोरात यांचा पाठिंबा; समाज आणि आयोगातील ब्लड कॅन्सर ठीक करायचाय!

10/10/2026

महात्मा गांधी हे भारतीय तत्त्वज्ञानाचे प्रतिबिंब: संदीप वाकचौरे

07/10/2026

फक्त गतिरोधक नव्हे, अवजड वाहतूक आणि अतिक्रमणावरही ठोस कारवाई करा : इरफानभाई मन्सुरी

06/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यातील विविध रस्ते मजबुतीकरणासाठी ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर; आमदार सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्याला यश

By Annant Ppangarkar10/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- भौगोलिकदृष्ट्या विस्ताराने मोठ्या असलेल्या संगमनेर तालुक्यातील ग्रामीण रस्त्यांचे जाळे अधिक भक्कम…

MPSC आंदोलनाला डॉ. जयश्रीताई थोरात यांचा पाठिंबा; समाज आणि आयोगातील ब्लड कॅन्सर ठीक करायचाय!

10/10/2026

आमदार अमोल खताळ यांनी वेधले ऊर्जा राज्यमंत्र्यांचे लक्ष; मेंढवन उपकेंद्राचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी

10/10/2026

शनिवार १० ऑक्टोंबर — जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा असेल

10/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.