Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

विधान परिषद निवडणूक : १७ पैकी ५ जागांवर उमेदवार बिनविरोध, वाचा कोणाचा आहे समावेश

June 4, 2026

‘लग्न आणि धर्म परिवर्तना’साठी दबाव; पीडित महिला अधिकाऱ्याचा राजीनामा, ‘कॉर्पोरेट जिहाद’चा आरोप

June 4, 2026

शासकीय कामात अडथळा आणणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल; प्रशासकीय कारवाईदरम्यान राडा

June 4, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » अल्पवयीन मुलीवरील अत्याचारात तरुणाला २० वर्षे सक्तमजुरी
न्यायालय

अल्पवयीन मुलीवरील अत्याचारात तरुणाला २० वर्षे सक्तमजुरी

पोलीस उपनिरीक्षक चारुदत्त खोंडे यांनी या प्रकरणाचा बारकाईने तपास करून आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरMarch 21, 2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Close-up Of Male Judge In Front Of Mallet Holding Documents
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

अहिल्यानगर, दि. २१ मार्च –

अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार केल्याच्या घृणास्पद गुन्ह्यात, विशेष न्यायालयाने आरोपी अजय उर्फ विनायक राजेंद्र गर्जे (२०, खडांबे खुर्द, राहुरी, अहिल्यानगर) याला २० वर्षे सक्तमजुरीची कठोर शिक्षा ठोठावली आहे. याशिवाय, विविध कलमांनुसार त्याला दंडाची शिक्षाही सुनावण्यात आली आहे, अशी माहिती विशेष सरकारी वकील मनीषा केळगंद्रे-शिंदे यांनी दिली.

विशेष जिल्हा न्यायाधीश माधुरी मोरे यांनी या खटल्याचा निकाल दिला. सरकारच्यावतीने विशेष सरकारी वकील मनीषा केळगंद्रे यांनी प्रभावी युक्तिवाद केला. खटल्यात एकूण १० साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली. ही धक्कादायक घटना १७ डिसेंबर २०२२ रोजी घडली, त्यावेळी पीडित मुलगी १२ वर्षे २ महिन्यांची होती.

आरोपी अजय उर्फ विनायक गर्जे याने त्याचा साथीदार गणेश राजेंद्र चव्हाण याच्या मदतीने पीडित मुलीला चेंडूफळ (ता. वैजापूर, छत्रपती संभाजीनगर) येथे फूस लावून पळवून नेले. तेथे अजय गर्जे याने तिच्यावर पाशवी अत्याचार केले. मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार, राहुरी पोलिसांनी सुरुवातीला अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर पोलिसांनी पीडित मुलीचा शोध घेऊन तिला तिच्या आई-वडिलांच्या ताब्यात दिले. त्यानंतर पीडित मुलीचा जबाब नोंदवण्यात आला आणि आरोपीविरुद्ध पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलीस उपनिरीक्षक चारुदत्त खोंडे यांनी या प्रकरणाचा बारकाईने तपास करून आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

सरकारी वकील मनीषा केळगंद्रे यांनी युक्तिवाद करताना सांगितले की, “पीडित मुलगी घटनेच्या वेळी १२ वर्षे २ महिन्यांची होती. तिच्या बालमनावर या घटनेचा खोलवर परिणाम झाला आहे. या घटनेचे ओरखडे तिच्या मनावर आयुष्यभर राहतील. आरोपीला निर्दोष सोडल्यास समाजात चुकीचा संदेश जाईल आणि अशा घृणास्पद घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा देणे आवश्यक आहे,” असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला.

खटल्यात सरकारी वकील मनीषा केळगंद्रे यांना पैरवी अधिकारी योगेश वाघ आणि इफ्तेकार सय्यद यांनी महत्त्वपूर्ण सहाय्य केले.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 1,090
अल्पवयीन मुलीवर अत्याचार न्यायालय शिक्षा
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

राजेंद्र गडगे याला न्यायालयाचा दिलासा; गंभीर गुन्ह्यांत मिळाला नियमित जामीन

May 29, 2026

नसरापूर हत्याकांड: ६५ वर्षीय नराधमाभोवती कायद्याचा फास आवळला; कोर्टात रोज …

May 28, 2026

व्यावसायिक व्यवहाराचा संशय फिर्यादीला नडला; ‘चेक बाऊन्स’ प्रकरणात संगमनेरात आरोपी दोषमुक्त

May 17, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

विधान परिषद निवडणूक : १७ पैकी ५ जागांवर उमेदवार बिनविरोध, वाचा कोणाचा आहे समावेश

By अनंत पांगारकरJune 4, 20260

मुंबई : विशेष प्रतिनिधी राज्यातील विधान परिषद निवडणुकीत अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी मोठ्या राजकीय…

‘लग्न आणि धर्म परिवर्तना’साठी दबाव; पीडित महिला अधिकाऱ्याचा राजीनामा, ‘कॉर्पोरेट जिहाद’चा आरोप

June 4, 2026

शासकीय कामात अडथळा आणणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल; प्रशासकीय कारवाईदरम्यान राडा

June 4, 2026

सहा मटका अड्ड्यांवर पोलिसांचे छापे; दीड लाखांचा मुद्देमाल जप्त, १० जण ताब्यात

June 4, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.