Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरमध्ये युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांसाठी विशेष आपत्कालीन वैद्यकीय प्रशिक्षण शिबिर; आपत्कालीन प्रसंगात रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा: डॉ. जयश्रीताई थोरात

16/09/2026

संगमनेर तालुक्यात ३३ हजार ७९२ हेक्टरवरील खरीप पिकांची दैना; आमदार अमोल खताळ यांची मुख्यमंत्र्यांकडे तातडीने आर्थिक मदतीची मागणी

16/09/2026

ओम ज्वेलर्स चोरी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेकडून पर्दाफाश; तिघांना अटक, मिरजगाव येथील गुन्ह्याचीही उकल

16/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरण: दोषी पोलिसांवर कारवाई कधी? – हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल
राजकारण

सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरण: दोषी पोलिसांवर कारवाई कधी? – हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल

परभणीतील लाठीचार्ज आणि कोंबिंग ऑपरेशनचे आदेश कोणी दिले? गृहमंत्री फडणवीस कोणाला पाठीशी घालत आहेत? सूर्यवंशी कुटुंबीयांना न्याय मिळेपर्यंत काँग्रेसचा लढा सुरू राहील.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar21/03/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

मुंबई, दि. २० मार्च २०२५:

परभणीतील आंबेडकरी चळवळीतील तरुण सोमनाथ सूर्यवंशी यांच्या संशयास्पद मृत्यूमुळे राज्यात खळबळ उडाली आहे. पोलिसांच्या मारहाणीमुळे त्यांचा मृत्यू झाला, असा आरोप असतानाही, पोलिसांनी ‘आकस्मिक मृत्यू’ असा अहवाल देऊन प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. आता न्यायदंडाधिकाऱ्यांच्या अहवालातही मारहाणीमुळेच मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यावरून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.

“पोलिसांच्या मारहाणीमुळे सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला, हे न्यायदंडाधिकाऱ्यांच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. तरीही फडणवीस सरकार दोषी पोलिसांवर हत्येचा गुन्हा दाखल करून त्यांना बडतर्फ करत नाही, हे दुर्दैवी आहे. परभणीतील घटना अत्यंत गंभीर आणि माणुसकीला काळिमा फासणारी आहे. संविधानाच्या प्रतिकृतीच्या विटंबनेनंतर शांततापूर्ण आंदोलन सुरू असताना पोलिसांनी अमानुष लाठीचार्ज केला. अनेकांना जबर मारहाण झाली आणि तुरुंगात टाकण्यात आले. सोमनाथ सूर्यवंशी यांनाही मारहाण करण्यात आली, ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. मात्र, सरकारने हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला,” असे सपकाळ म्हणाले.

“परभणीत कोंबिंग ऑपरेशन आणि लाठीचार्जचे आदेश कोणी दिले? मंत्रालयातून की पोलीस महासंचालक कार्यालयातून? याची चौकशी झाली पाहिजे. गृहमंत्री आणि मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस परभणीचे प्रकरण हाताळण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. एका दलित तरुणाचा पोलीस मारहाणीत मृत्यू होतो, पण सरकार त्याकडे गांभीर्याने पाहत नाही. यावरून भाजप-युती सरकार दलितविरोधी असल्याचे स्पष्ट होते,” असा आरोप सपकाळ यांनी केला.

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी या घटनेचे गांभीर्य ओळखून परभणीला भेट देऊन सूर्यवंशी कुटुंबीयांचे सांत्वन केले आणि त्यांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे. काँग्रेस पक्ष सूर्यवंशी कुटुंबीयांना न्याय मिळेपर्यंत या प्रकरणाचा पाठपुरावा करेल, असेही सपकाळ यांनी सांगितले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 565
काँग्रेस हर्षवर्धन सपकाळ
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर तालुक्यात ३३ हजार ७९२ हेक्टरवरील खरीप पिकांची दैना; आमदार अमोल खताळ यांची मुख्यमंत्र्यांकडे तातडीने आर्थिक मदतीची मागणी

16/09/2026

आंदोलनाची हवा काढण्यासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट? : अमोल शेलकर यांचा घणाघात, पालकमंत्री व लोकप्रतिनिधींवर संगमनेरच्या हक्काची रेल्वे हिरावल्याचा थेट आरोप; कागदपत्रे सार्वजनिक करण्याचे आव्हान

09/09/2026

विशेष वृत्त राजकीय दबावातून पोलिसांची संगमनेरच्या सुरक्षेकडे पाठ; २०० कॅमेऱ्यांच्या लोकार्पण सोहळ्यावर बहिष्कारातून नागरिकांमध्ये संताप… नगरपालिकेची सुरक्षेसाठी धडपड, तर पोलीस प्रशासनाची उघड-उघड उदासीनता

08/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शिबिर

संगमनेरमध्ये युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांसाठी विशेष आपत्कालीन वैद्यकीय प्रशिक्षण शिबिर; आपत्कालीन प्रसंगात रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा: डॉ. जयश्रीताई थोरात

By Annant Ppangarkar16/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – धावपळीच्या आधुनिक जीवनशैलीत अचानक निर्माण होणाऱ्या वैद्यकीय आणीबाणीच्या…

संगमनेर तालुक्यात ३३ हजार ७९२ हेक्टरवरील खरीप पिकांची दैना; आमदार अमोल खताळ यांची मुख्यमंत्र्यांकडे तातडीने आर्थिक मदतीची मागणी

16/09/2026

ओम ज्वेलर्स चोरी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेकडून पर्दाफाश; तिघांना अटक, मिरजगाव येथील गुन्ह्याचीही उकल

16/09/2026

दूषित पाणीपुरवठ्यामुळे राजापूरकरांचे आरोग्य धोक्यात; ग्रामपंचायतीच्या कारभारावर नागरिकांचा तीव्र संताप

16/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.