Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यातील विविध रस्ते मजबुतीकरणासाठी ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर; आमदार सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्याला यश

10/10/2026

MPSC आंदोलनाला डॉ. जयश्रीताई थोरात यांचा पाठिंबा; समाज आणि आयोगातील ब्लड कॅन्सर ठीक करायचाय!

10/10/2026

आमदार अमोल खताळ यांनी वेधले ऊर्जा राज्यमंत्र्यांचे लक्ष; मेंढवन उपकेंद्राचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी

10/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » कृषिमंत्र्यांसह सत्ताधारी चार आमदार, काँग्रेस खासदारांना नोटीस, काय आहे कारण…
महाराष्ट्र संवाद विशेष

कृषिमंत्र्यांसह सत्ताधारी चार आमदार, काँग्रेस खासदारांना नोटीस, काय आहे कारण…

आता या प्रकरणी संबंधितांच्या अपिल अर्जावर २ एप्रिल रोजी दुपारी २ वाजता सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्यासमोर सुनावणी होणार आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar22/03/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

नाशिक, दि. २२ मार्च

जिल्हा बँकेच्या कोट्यवधींच्या कर्जवाटपात अनियमितता झाल्यामुळे २५ माजी संचालक आणि त्यांच्या वारसांवर निश्चित केलेल्या आर्थिक जबाबदारीच्या प्रकरणात सहकार विभागाने संबंधितांना नोटीस बजावली आहे. यात राज्याचे कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांच्यासह सत्ताधारी पक्षांचे चार विद्यमान आमदार आणि काँग्रेसच्या खासदार डॉ. शोभा बच्छाव यांचा समावेश आहे.

एक काळ असा होता, जेव्हा नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा देशात नावलौकिक होता. परंतु, संचालकांच्या मनमानी कारभारामुळे ही बँक आर्थिक अडचणीत सापडली आहे. आज शेतकऱ्यांना कर्ज वाटप करणे आणि ठेवीदारांना पैसे परत करणेही बँकेला जड जात आहे. बँकेचा परवाना रद्द होण्याची शक्यता आहे. काही वर्षांपूर्वी तत्कालीन विभागीय सहनिबंधक गौतम बलसाने यांनी बँकेच्या कर्ज वितरणाची चौकशी केली होती.

या चौकशीत २९ आजी-माजी संचालक आणि १५ अधिकाऱ्यांवर ठपका ठेवण्यात आला होता. या ४४ जणांवर एकूण १८२ कोटींची आर्थिक जबाबदारी निश्चित करण्यात आली होती. वसुलीसाठी संबंधितांना नोटिसा पाठवण्यात आल्या होत्या. मात्र, अपिलात सहकार मंत्र्यांनी स्थगिती दिल्याने ही प्रक्रिया थांबली होती.

आता या प्रकरणी संबंधितांच्या अपिल अर्जावर २ एप्रिल रोजी दुपारी २ वाजता सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्यासमोर सुनावणी होणार आहे. आर्थिक जबाबदारी निश्चित झालेल्यांमध्ये सत्ताधारी आणि विरोधी पक्षांतील आजी-माजी लोकप्रतिनिधींचा समावेश आहे. यासंदर्भात लोकसत्ताने वृत्त दिले आहे.

यात कृषिमंत्री ॲड. कोकाटे (१.८७ कोटी), राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप बनकर (८.६५ कोटी), भाजपचे आमदार राहुल ढिकले (८.७६ कोटी) आणि डॉ. राहुल आहेर (०.४३ कोटी), काँग्रेसच्या खासदार डॉ. शोभा बच्छाव (२.११ कोटी) या विद्यमान लोकप्रतिनिधींसह माजी खासदार देविदास पिंगळे (८.६५ कोटी), माजी आमदार जे. पी. गावित (७.२१ कोटी), माजी आमदार नरेंद्र दराडे (८.८९ कोटी), शिरिषकुमार कोतवाल (१.९८ कोटी), वसंत गिते (१.८९ कोटी) यांसह माणिकराव शिंदे (०.६७ कोटी), राजेंद्र भोसले (८.७८ कोटी), राघो अहिरे (८.८९ कोटी), दत्ता गायकवाड (०.६७ कोटी), गणपतराव पाटील (८.८९ कोटी), संदीप गुळवे (७.५७ कोटी), राजेंद्र डोखळे (८.८९ कोटी), चंद्रकांत गोगड (१.३२ कोटी) यांचा समावेश आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,243
नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

MPSC आंदोलनाला डॉ. जयश्रीताई थोरात यांचा पाठिंबा; समाज आणि आयोगातील ब्लड कॅन्सर ठीक करायचाय!

10/10/2026

महात्मा गांधी हे भारतीय तत्त्वज्ञानाचे प्रतिबिंब: संदीप वाकचौरे

07/10/2026

फक्त गतिरोधक नव्हे, अवजड वाहतूक आणि अतिक्रमणावरही ठोस कारवाई करा : इरफानभाई मन्सुरी

06/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यातील विविध रस्ते मजबुतीकरणासाठी ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर; आमदार सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्याला यश

By Annant Ppangarkar10/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- भौगोलिकदृष्ट्या विस्ताराने मोठ्या असलेल्या संगमनेर तालुक्यातील ग्रामीण रस्त्यांचे जाळे अधिक भक्कम…

MPSC आंदोलनाला डॉ. जयश्रीताई थोरात यांचा पाठिंबा; समाज आणि आयोगातील ब्लड कॅन्सर ठीक करायचाय!

10/10/2026

आमदार अमोल खताळ यांनी वेधले ऊर्जा राज्यमंत्र्यांचे लक्ष; मेंढवन उपकेंद्राचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी

10/10/2026

शनिवार १० ऑक्टोंबर — जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा असेल

10/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.