Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

दूध भेसळ प्रकरणी मुख्य आरोपीला सात दिवसांत अटकपूर्व जामीन मंजूर

11/10/2026

रविवार ११ ऑक्टोबर २०२६ — जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा असेल

11/10/2026

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यातील विविध रस्ते मजबुतीकरणासाठी ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर; आमदार सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्याला यश

10/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » केंद्र सरकारचा मोठा निर्णय : कांद्यावरील निर्यात शुल्क अखेर रद्द, शेतकऱ्यांना मोठा दिलासा
शेती व सहकार

केंद्र सरकारचा मोठा निर्णय : कांद्यावरील निर्यात शुल्क अखेर रद्द, शेतकऱ्यांना मोठा दिलासा

२०२४-२५ या हंगामात कांद्याचे उत्पादन १९ टक्क्यांनी वाढून २८८.७७ लाख टन होण्याची शक्यता आहे. मागील हंगामात २४२.६७ लाख टन उत्पादन झाले होते.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar23/03/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, दि. २३ मार्च – प्रतिनिधी

कांद्याच्या घसरलेल्या भावामुळे मेटाकुटीस आलेल्या शेतकऱ्यांना केंद्र सरकारने मोठा दिलासा दिला आहे. कांद्यावरील २० टक्के निर्यात शुल्क अखेर रद्द करण्यात आले आहे. १ एप्रिल २०२५ पासून याची अंमलबजावणी होणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या भावात मोठी घसरण होत असल्याने बळीराजा चिंतेत होता. केंद्र सरकारने आज शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेऊन कांद्यावरील २० टक्के निर्यात शुल्क रद्द करण्यात आल्याचे जाहीर केले. केंद्र सरकारच्या वित्त मंत्रालयाने परिपत्रक काढून कांद्यावर असलेले २० टक्के निर्यात शुल्क रद्द करून शून्य करण्यात आल्याचे जाहीर केले असून हा निर्णय १ एप्रिल २०२५ पासून लागू होणार आहे.

कांद्याचे वाढलेले भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी सुमारे दीड वर्षांपूर्वी केंद्र सरकारने कांद्यावर ४० टक्के शुल्क लावले होते. मात्र, शेतकऱ्यांनी दरवाढीविरोधात आवाज उठवल्यानंतर २० टक्के कपात करण्यात आली होती. मात्र, २० टक्के निर्यात शुल्कमुळे पाहिजे तेवढा कांदा निर्यात होत नव्हता. त्यामुळे कांद्याच्या भावात मोठी घसरण होत होती. पंधरा दिवसापूर्वी शेतकऱ्यांनी आंदोलनं देखील केली होती. अखेर आज निर्यात शुल्क रद्द करण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळून त्यांनी केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत करून पुढे कधीही निर्यात बंदी करण्यात येऊ नये, अशी मागणी केली आहे.

कांद्याचं उत्पादन वाढणार… दरम्यान, कृषी मंत्रालयाच्या अंदाजानुसार, २०२४-२५ या हंगामात कांद्याचे उत्पादन १९ टक्क्यांनी वाढून २८८.७७ लाख टन होण्याची शक्यता आहे. मागील हंगामात २४२.६७ लाख टन उत्पादन झाले होते. हा हंगाम जून २०२५ पर्यंत सुरू राहणार आहे.

मुख्यमंत्री फडणवीसांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार… ‘केंद्र सरकारने कांद्यावरील २० टक्के निर्यात शुल्क संपूर्णत: मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. १ एप्रिल २०२५ पासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. लासलगाव आणि पिंपळगाव येथून मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक होत असून, या निर्णयामुळे महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांना मोठा दिलासा मिळणार आहे, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तसंच, केंद्र सरकारने महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांना मोठा दिलासा दिल्याबद्दल फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे आभार मानले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,304
कांदा कांदा निर्यात बंदी केंद्र सरकार
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

सोशल मीडियावर खोटे पसरवणाऱ्यांचा बंदोबस्त करा: माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा इशारा; संगमनेरची आर्थिक समृद्धी टिकवण्यासाठी संघर्षाचे आवाहन

21/09/2026

राज्यात सरसकट दुष्काळ जाहीर करा; माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांची मागणी, रेल्वेप्रश्नी लोकप्रतिनिधीच्या बालिश वक्तव्यावरही केले भाष्य

19/09/2026

थोरात कारखान्याचे ११ लाख मेट्रिक टनाचे गाळप उद्दिष्ट; बॉयलर अग्नीप्रदीपन समारंभात बाळासाहेब थोरात यांचे आवाहन

19/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
न्यायालय

दूध भेसळ प्रकरणी मुख्य आरोपीला सात दिवसांत अटकपूर्व जामीन मंजूर

By Annant Ppangarkar11/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- जामखेड तालुक्यातील खर्डा पोलीस ठाण्यात नोंदविलेल्या दूध भेसळ प्रकरणी मुख्य आरोपी…

रविवार ११ ऑक्टोबर २०२६ — जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा असेल

11/10/2026

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यातील विविध रस्ते मजबुतीकरणासाठी ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर; आमदार सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्याला यश

10/10/2026

MPSC आंदोलनाला डॉ. जयश्रीताई थोरात यांचा पाठिंबा; समाज आणि आयोगातील ब्लड कॅन्सर ठीक करायचाय!

10/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.