Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

शुक्रवार, १८ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे सर्व राशीचे राशी भविष्य

18/09/2026

राजहंस हा गुणवत्तेचा आणि विश्वासाचा अस्सल ब्रँड: माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

17/09/2026

१८ व्या संगमनेर फेस्टिवलचे दिमाखदार उद्घाटन; समीर चौगुलेंच्या ‘सम्या-सम्या मैफिलीत माझ्या’ने संगमनेरकर मनमुराद हसले

17/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » अकोलेत महिला बचत गटांसाठी ‘उमेद मॉल’ उभारण्याची आदिती तटकरे यांची घोषणा
राजकारण

अकोलेत महिला बचत गटांसाठी ‘उमेद मॉल’ उभारण्याची आदिती तटकरे यांची घोषणा

'लाडकी बहीण' योजनेमुळे राज्यातील लाखो महिलांना आर्थिक मदत मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar23/03/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

अकोले, दि. २३ मार्च – प्रतिनिधी 

महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंना योग्य बाजारपेठ मिळावी, यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. या अंतर्गत राज्यात ५० ‘उमेद मॉल’ उभारण्याची योजना आहे. अकोले येथे योग्य जागा उपलब्ध झाल्यास येथेही ‘उमेद मॉल’ उभारण्यात येईल, अशी घोषणा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केली.

‘कळसुबाई’ महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंच्या विक्री व प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमाला आमदार किरण लहामटे, पद्मश्री राहीबाई पोपेरे, अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सीताराम गायकर, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राहुल शेळके, जिल्हा कार्यक्रम अधिकारी मनोज ससे, उमेद जिल्हा अभियान व्यवस्थापक सोमनाथ जगताप, तहसीलदार सिद्धार्थ मोरे, गटविकास अधिकारी अमर माने आदी मान्यवर उपस्थित होते.

आदिती तटकरे यांनी महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी राज्य सरकार करत असलेल्या विविध योजनांची माहिती दिली. नागपूरमधील महिलांनी स्थापन केलेल्या यशस्वी पतसंस्थेचे उदाहरण देत त्यांनी राज्यातील इतर महिलांनाही अशा प्रकारे एकत्र येऊन आर्थिक विकास साधण्याचे आवाहन केले. ‘लाडकी बहीण’ योजनेमुळे राज्यातील लाखो महिलांना आर्थिक मदत मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

महिलांनी स्वतःच्या आरोग्याला प्राधान्य द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. बचत गट मेळाव्यांसोबतच आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या कुटुंबांसाठी मोफत आरोग्य तपासणी योजना सुरू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. ‘उमेद’चा फिरता निधी १५ हजारांवरून ३० हजार करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. ‘लखपती दीदी’ आणि ‘ड्रोन दीदी’ यांसारख्या उपक्रमांमुळे महिलांना मोठा लाभ होत असल्याचे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमात आमदार किरण लहामटे आणि इतर मान्यवरांनीही आपले विचार व्यक्त केले. ‘लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थ्यांनी आपले अनुभव सांगितले. काही महिलांना प्रातिनिधिक स्वरूपात कर्ज योजनेचे धनादेश वाटप करण्यात आले. आदिती तटकरे यांनी महिला बचत गटांच्या स्टॉलला भेट देऊन त्यांच्याशी संवाद साधला. या प्रदर्शनात विविध बचत गटांचे १०० स्टॉल लावण्यात आले होते.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 811
आदिती तटकरे उमेद मॉल महिला बचत गट
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर ग्रामीण भागात सायंकाळी वीज खंडित; गणेशोत्सवात नागरिक अंधारात, सरकारने घोषणांचा उत्सव थांबवून आधी ग्रामीण भागाला वीज द्यावी, काँग्रेसचे कार्याध्यक्ष शेलकर यांची मागणी

17/09/2026

संगमनेर तालुक्यात ३३ हजार ७९२ हेक्टरवरील खरीप पिकांची दैना; आमदार अमोल खताळ यांची मुख्यमंत्र्यांकडे तातडीने आर्थिक मदतीची मागणी

16/09/2026

आंदोलनाची हवा काढण्यासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट? : अमोल शेलकर यांचा घणाघात, पालकमंत्री व लोकप्रतिनिधींवर संगमनेरच्या हक्काची रेल्वे हिरावल्याचा थेट आरोप; कागदपत्रे सार्वजनिक करण्याचे आव्हान

09/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

शुक्रवार, १८ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे सर्व राशीचे राशी भविष्य

By Annant Ppangarkar18/09/20260

आजचे राशिभविष्य ​मेष आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहवर्धक राहील. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता…

राजहंस हा गुणवत्तेचा आणि विश्वासाचा अस्सल ब्रँड: माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

17/09/2026

१८ व्या संगमनेर फेस्टिवलचे दिमाखदार उद्घाटन; समीर चौगुलेंच्या ‘सम्या-सम्या मैफिलीत माझ्या’ने संगमनेरकर मनमुराद हसले

17/09/2026

आमदार सत्यजीत तांबे यांच्या संकल्पनेतून ‘महावादन’चा जल्लोष; संगमनेर दुमदुमले!

17/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.