Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026

कृष्णाच्या कुटुंबीयांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार: आमदार अमोल खताळ यांनी घेतली पवार कुटुंबीयांची भेट

30/08/2026

जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर एलसीबीचा सर्जिकल स्ट्राईक; एकाच दिवशी ६ छापे, सुमारे ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

30/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » थकबाकीदारांनो सावध राहा! संगमनेरात जप्तीची कारवाई सुरू
प्रशासन

थकबाकीदारांनो सावध राहा! संगमनेरात जप्तीची कारवाई सुरू

थकबाकीदारांची नावे चौका-चौकात फ्लेक्स बोर्डवर प्रसिद्ध करण्यात येणार असून अशा थकबाकीदारांवर कारवाईचे स्वरूप तीव्र करण्यात येणार आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar24/03/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर दि. २४ मार्च – प्रतिनिधी

संगमनेर नगरपरिषदेने मालमत्ता आणि पाणीपट्टी थकबाकीदारांवर जप्तीची कारवाई सुरू केली आहे. शहरातील पाच मालमत्ताधारकांची एकूण ९ लाख ८ हजार ९७१ रुपयांची थकबाकी वसूल करण्यासाठी त्यांच्या मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. या कारवाईत नऊ नळ कनेक्शन बंद करण्यात आले आहेत. अशी माहिती संगमनेर नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.

संगमनेर नगरपरिषदेच्या वतीने सन २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी मालमत्ता व पाणीपट्टी व गाळे भाडे कराच्या वसुलीसाठी विशेष वसुली मोहीम सुरू करण्यात आलेली आहे.

या मोहिमे अंतर्गत उप मुख्याधिकारी संजय पेखळे, प्रशासन अधिकारी प्रल्हाद देवरे, कर निरीक्षक दत्तू साळवे, सहाय्यक कार्यालय निरीक्षक राजेश गुंजाळ यांच्यासह नगरपरिषदेच्या विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी यांचा समावेश असलेले ६ वसुली पथके नियुक्त करण्यात आले आहे. या पथकाद्वारे मालमत्ता व पाणीपट्टी कराची थकबाकी असलेल्या थकबाकीदारांवर मालमत्ता जप्ती, नळ कनेक्शन बंद करणे यांसारख्या विविध कारवाई करण्यात येत आहे.

विशेष वसुली मोहिमे अंतर्गत नियुक्त केलेल्या पथकाद्वारे शहरातील विविध भागातील कारवाईमध्ये संजय पेखळे, प्रल्हाद देवरे, बाजीराव नवले, प्रणोती पवार, तुकाराम कानसकर, प्रदिप मावलकर, साजिद पटेल, वैष्णवी गडाख, ओंकार सहाणे, सुनील हामंद, जालिंदर हिरे, वसंत मेहेर, भीमाशंकर वर्पे, रमेश ताजणे, कुणाल चांगरे, मच्छिद्र काठे, अल्ताफ शेख, विजय अभंग आदी सहभागी होते.

मार्च महिना असल्याने मालमत्ता व पाणीपट्टी कराची वसुली अंतिम टप्प्यात असून जे थकबाकीदार कर भरणार नाही, अशा थकबाकीदारांची नावे लवकरच वृत्तपत्रात प्रसिद्ध करणार आहे. तसेच अशा थकबाकीदारांची नावे चौका-चौकात फ्लेक्स बोर्डवर प्रसिद्ध करण्यात येणार असून अशा थकबाकीदारांवर कारवाईचे स्वरूप तीव्र करण्यात येणार आहे. त्यामुळे शहरातील मालमत्ता व पाणीपट्टी थकबाकीदार यांनी आपल्या कराचा नगरपरिषदेत वेळेत भरणा करून नगरपरिषदेस सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकारी कोकरे यांनी केले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,967
कर रामदास कोकरे संगमनेर नगर परिषद
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर पालिकेचा अनोखा उपक्रम! १ ते २५ सप्टेंबरदरम्यान होणार प्रभागनिहाय बैठका; नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांच्या पुढाकाराने नागरिकांच्या प्रश्नांना थेट व्यासपीठ

29/08/2026

उसनवारीवरील कर्मचाऱ्यांना १० सप्टेंबरपर्यंत मूळ विभागात पाठवा; मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर मुख्य सचिवांचे कडक आदेश

25/08/2026

राज्यात खळबळ..! तहसीलदार निलंबित; ‘ते’ प्रकरण भोवलं

14/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

By Annant Ppangarkar30/08/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  संगमनेर : खरीप हंगामातील पिकांची वाढती गरज आणि पिण्याच्या…

कृष्णाच्या कुटुंबीयांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार: आमदार अमोल खताळ यांनी घेतली पवार कुटुंबीयांची भेट

30/08/2026

जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर एलसीबीचा सर्जिकल स्ट्राईक; एकाच दिवशी ६ छापे, सुमारे ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

30/08/2026

वाळू तस्करांवर कारवाई, ट्रॅक्टरसह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांना अटक तर तिघे फरार

30/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.