Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर तालुक्यात ३३ हजार ७९२ हेक्टरवरील खरीप पिकांची दैना; आमदार अमोल खताळ यांची मुख्यमंत्र्यांकडे तातडीने आर्थिक मदतीची मागणी

16/09/2026

ओम ज्वेलर्स चोरी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेकडून पर्दाफाश; तिघांना अटक, मिरजगाव येथील गुन्ह्याचीही उकल

16/09/2026

दूषित पाणीपुरवठ्यामुळे राजापूरकरांचे आरोग्य धोक्यात; ग्रामपंचायतीच्या कारभारावर नागरिकांचा तीव्र संताप

16/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरमध्ये बहुचर्चित मोक्का खटल्यातील चारही आरोपींची निर्दोष मुक्तता
न्यायालय

संगमनेरमध्ये बहुचर्चित मोक्का खटल्यातील चारही आरोपींची निर्दोष मुक्तता

आरोपींच्यावतीने ॲड. अतुल आंधळे व ॲड. सीमा काळे-सातपुते यांनी काम पाहिले. त्यांना ॲड. मोहन फटांगरे, ॲड. ऋषिकेश होले, ॲड. अमृता गुंजाळ आणि ॲड. प्रमोद शिंदे यांनी सहकार्य केले.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar28/03/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, दि. २८ मार्च – प्रतिनिधी

संपूर्ण संगमनेर तालुक्याचे लक्ष लागलेल्या बहुचर्चित मोक्का खटल्याचा गुरुवारी (२७ मार्च) निकाल लागला. या खटल्यातील सर्व चारही आरोपींची जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. एस. घुमरे यांनी निर्दोष मुक्तता केली आहे.

संगमनेर तालुक्यातील घारगाव पोलिसांनी संतोष शिवाजी जाधव, चंदर दादाभाऊ गाडे, संजय दत्तू धांडे आणि शरद बन्सी निचित यांच्याविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यांच्या आधारे महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९ चे कलम ३(१),(२), ३(४) प्रमाणे या आरोपींविरोधात कारवाई केली होती.

याप्रकरणी तत्कालीन पोलीस उपअधीक्षक अशोक थोरात, तत्कालीन निरीक्षक निघोट यांनी या गुन्ह्याचा तपास केल्यानंतर संगमनेर येथील जिल्हा व सत्र न्यायालयात आरोपीविरुद्ध २०१७ मध्ये दोषारोपपत्र दाखल केले होते. या मोक्का केसाची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. एस. घुमरे यांच्यासमोर झाली. या बहुचर्चित खटल्याकडे संपूर्ण संगमनेर तालुक्याचे लक्ष लागले होते.

संगमनेर न्यायालयात मोक्का अंतर्गत दाखल झालेला हा पहिला एकमेव खटला होता. सदर खटल्यात सरकार पक्षाच्या वतीने ॲड. बी. जी. कोल्हे यांनी तर आरोपींच्यावतीने ॲड. अतुल आंधळे व ॲड. सीमा काळे-सातपुते यांनी काम पाहिले. त्यांना ॲड. मोहन फटांगरे, ॲड. ऋषिकेश होले, ॲड. अमृता गुंजाळ आणि ॲड. प्रमोद शिंदे यांनी सहकार्य केले.

मोक्कासारख्या या खटल्यामध्ये सरकार पक्षाच्यावतीने एकूण १५ ते २० साक्षीदार तपासण्यात आले. मात्र सरकार पक्षाला आरोपींवरील आरोप सिद्ध करण्यात यश आले नाही. उलट आरोपींच्या वकिलांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून सत्र न्यायाधीशांनी या खटल्यातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 3,525
जिल्हा व सत्र न्यायालय मोक्का
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

फायनान्सचा चेक बाऊन्स: अकोले तालुक्यातील कर्जदाराला ६ महिने कारावास आणि दुप्पट दंडाची शिक्षा

04/09/2026

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026

दारूच्या नशेत झालेल्या वादातून मारहाण करून हत्या करणाऱ्या आरोपीस जन्मठेप; संगमनेर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

01/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

संगमनेर तालुक्यात ३३ हजार ७९२ हेक्टरवरील खरीप पिकांची दैना; आमदार अमोल खताळ यांची मुख्यमंत्र्यांकडे तातडीने आर्थिक मदतीची मागणी

By Annant Ppangarkar16/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – संगमनेर तालुक्यात यंदाच्या खरीप हंगामात पावसाच्या पडलेल्या प्रदीर्घ…

ओम ज्वेलर्स चोरी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेकडून पर्दाफाश; तिघांना अटक, मिरजगाव येथील गुन्ह्याचीही उकल

16/09/2026

दूषित पाणीपुरवठ्यामुळे राजापूरकरांचे आरोग्य धोक्यात; ग्रामपंचायतीच्या कारभारावर नागरिकांचा तीव्र संताप

16/09/2026

प्रशासनाच्या नाकर्तेपणाचा बळी; अतिक्रमण आणि अवजड वाहनांविरोधात नागरिक रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत! सार्वजनिक बांधकाम विभागाला इशारा; रस्ता रुंदीकरण आणि वाहतूक नियंत्रणासाठी तीव्र आंदोलनाचा अल्टीमेटम

16/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.