Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; सुमारे चार कोटी रुपयांचे संशयास्पद बटर जप्त

11/09/2026

गणेशोत्सवानिमित्त थोरात कारखान्यावर १४ ते २५ सप्टेंबर दरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

11/09/2026

स्थानिक पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह!, संगमनेरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेचा छापा; कत्तलीसाठी डांबलेली १४ गोवंशीय जनावरे मुक्त, १ लाखांचा मुद्देमाल जप्त

11/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » राहुरी शहरातील शांतता राखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे – पालकमंत्री राधाकृष्ण विखे
राजकारण

राहुरी शहरातील शांतता राखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे – पालकमंत्री राधाकृष्ण विखे

बैठकीनंतर मंत्री विखे पाटील यांनी राहुरी तालुक्यातील विविध संघटना आणि कार्यकर्त्यांसमवेत बैठक घेऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेतले.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar28/03/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

अहिल्यानगर, दि. २८ मार्च – 

राहुरी येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर विविध संघटना आणि नागरिकांनी शांतता राखण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. मंदिराचे पावित्र्य राखण्यासाठी सभोवती असलेल्या अतिक्रमणाबाबत आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

राहुरी येथे दोन दिवसांपूर्वीच्या घटनेनंतर मंत्री विखे यांनी राहुरी तहसील कार्यालयात अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी आमदार शिवाजीराव कर्डीले, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्गी, पोलीस उपअधीक्षक बसवराज शिवपुंजे, प्रांताधिकारी किरण सावंत पाटील, तहसीलदार नामदेव पाटील आदी उपस्थित होते.

बैठकीनंतर मंत्री विखे पाटील यांनी राहुरी तालुक्यातील विविध संघटना आणि कार्यकर्त्यांसमवेत बैठक घेऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेतले.

मंत्री विखे पाटील म्हणाले, राहुरी येथील घटनेचा तपास पोलीस योग्य दिशेने करीत आहेत. त्यांना थोडा कालावधी अजून द्यावा लागेल. घडलेली घटना अतिशय निंदनीय असून त्याचा आपणही तीव्र शब्दांत निषेध करतो. अशा घटना घडविणारे कोण आहेत याचा शोध पोलीस यंत्रणा घेत आहेत. तपासातील नेमकी माहिती त्यांच्यापर्यंत आली असली तरी त्यांना अधिक वेळ देणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

या मंदिराचे पावित्र्य राखण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे. सामाजिक एकोपा कायम राखून या शहराचा नावलौकिक उंचावण्याची जबाबदारी सर्वांनी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

घटनेनंतर आपण जिल्हाधिकारी तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या संपर्कात राहून सातत्याने माहिती घेत होतो. प्रशासनाने योग्य भूमिका घेऊन परिस्थिती नियंत्रणात ठेवली. दोन दिवस राहुरी तालुक्यातील जनता, कार्यकर्ते यांनी दाखवलेला संयम खूप महत्त्वपूर्ण असल्याचा उल्लेख करून शिवाजीराव कर्डिले यांनी दोन दिवसांत चांगल्या पद्धतीने परिस्थिती हाताळली, असेही पालकमंत्री म्हणाले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 836
राधाकृष्ण विखे राहुरी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आंदोलनाची हवा काढण्यासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट? : अमोल शेलकर यांचा घणाघात, पालकमंत्री व लोकप्रतिनिधींवर संगमनेरच्या हक्काची रेल्वे हिरावल्याचा थेट आरोप; कागदपत्रे सार्वजनिक करण्याचे आव्हान

09/09/2026

विशेष वृत्त राजकीय दबावातून पोलिसांची संगमनेरच्या सुरक्षेकडे पाठ; २०० कॅमेऱ्यांच्या लोकार्पण सोहळ्यावर बहिष्कारातून नागरिकांमध्ये संताप… नगरपालिकेची सुरक्षेसाठी धडपड, तर पोलीस प्रशासनाची उघड-उघड उदासीनता

08/09/2026

कौठे मलकापूरच्या औद्योगिक प्रकल्पावरून जनतेची दिशाभूल? ‘MIDC’ की केवळ औद्योगिक वसाहत; सत्तेतील दोन्ही आमदारांनी भूमिका स्पष्ट करावी : अमोल शेलकर

08/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
प्रशासन

अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; सुमारे चार कोटी रुपयांचे संशयास्पद बटर जप्त

By Annant Ppangarkar11/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासन विभागाने…

गणेशोत्सवानिमित्त थोरात कारखान्यावर १४ ते २५ सप्टेंबर दरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

11/09/2026

स्थानिक पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह!, संगमनेरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेचा छापा; कत्तलीसाठी डांबलेली १४ गोवंशीय जनावरे मुक्त, १ लाखांचा मुद्देमाल जप्त

11/09/2026

संगमनेरमध्ये २६,५८७ रद्द मतदारांची गावनिहाय यादी जाहीर करण्याची अमोल शेलकर यांची मागणी; प्रशासनाकडे पारदर्शकता आणण्याचा आग्रह

11/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.