Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » पंतप्रधान मोदींच्या ‘सौगात ए मोदी’ उपक्रमाला मुस्लिम समाजाचे पत्र…
महाराष्ट्र संवाद विशेष

पंतप्रधान मोदींच्या ‘सौगात ए मोदी’ उपक्रमाला मुस्लिम समाजाचे पत्र…

शुक्रवारी (२८ मार्च) संगमनेरच्या प्रांत अधिकाऱ्यांमार्फत हे पत्र पंतप्रधान मोदींना पाठवण्यात आले आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar29/03/2025Updated:30/03/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, दि. २९ मार्च – प्रतिनिधी 

मुस्लिम समाजाच्या पवित्र रमजान ईदनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘सौगात ए मोदी’ या उपक्रमावरून देशात सध्या राजकीय वाद सुरू आहेत. मात्र, संगमनेरमधील मुस्लिम समाजाने या उपक्रमाचे स्वागत करत पंतप्रधान मोदींना पत्र पाठवले आहे. हे पत्र चर्चेचा विषय ठरले आहे.

‘सौगात ए मोदी’ उपक्रमांतर्गत मुस्लिम बांधवांना ईदनिमित्त भेटवस्तू देण्यात येत आहेत. यावरून विरोधी पक्षांनी आणि काही संघटनांनी टीका केली आहे. मात्र, संगमनेरमधील मुस्लिम समाजाने या उपक्रमाचे स्वागत केले आहे.

संगमनेरमधील मुस्लिम बांधवांनी पंतप्रधान मोदींना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे, “आपला भारत देश विविधतेने नटलेला असून सर्व जाती-धर्माचे लोक येथे गुण्यागोविंदाने राहतात. राम आणि रहीम यांची संस्कृती जपणारा हा देश आहे. आपण तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर कोणताही कटुतेचा भाव न ठेवता रमजान महिन्यात ‘सौगात ए ईद’ उपक्रमासाठी पुढाकार घेतला, याचे आम्हाला अभिनंदन करावेसे वाटते.”

मात्र, या पत्रात मुस्लिम समाजाने पंतप्रधान मोदींकडे एक मागणीही केली आहे. “आपण दिलेली भेट आम्ही स्वीकारणार आहोत, परंतु समाजात द्वेष पसरवणाऱ्या लोकांवर कडक कारवाई करावी, अशी आमची विनंती आहे. समाजात अशांतता निर्माण करणाऱ्या लोकांना कोणताही धर्म नसतो. त्यांच्यावर कारवाई केल्यास आम्हाला खरा आनंद होईल,” असे या पत्रात म्हटले आहे.

शुक्रवारी (२८ मार्च) संगमनेरच्या प्रांत अधिकाऱ्यांमार्फत हे पत्र पंतप्रधान मोदींना पाठवण्यात आले आहे. हे पत्र देताना संगमनेरचे मुस्लिम धर्मगुरू शहर काझी अब्दुल रकीब अब्दुल वाहब पिरजादे, पत्रकार शौकत पठाण, अझीज ओहोरा, साजिद शेख, शाहरुख शेख, इस्माईल शेख, जावेद शेख, जमीर शेख, आसिफ शेख, सालार मिर्झा, शोएब खान आदी उपस्थित होते.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 11,774
पंतप्रधान नरेंद्र मोदी पत्र
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

“राजा किती क्रूर आणि खोटारडा आहे…” आई-बाळाची आर्त हाक अन् पोलिसांचा पाशवी हात; संजय राऊतांनी शेअर केलेल्या ‘त्या’ एका छायाचित्राने हादरवला महाराष्ट्र!

12/10/2026

MPSC आंदोलनाला डॉ. जयश्रीताई थोरात यांचा पाठिंबा; समाज आणि आयोगातील ब्लड कॅन्सर ठीक करायचाय!

10/10/2026

महात्मा गांधी हे भारतीय तत्त्वज्ञानाचे प्रतिबिंब: संदीप वाकचौरे

07/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
बैठक

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

By Annant Ppangarkar15/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर तालुका विस्ताराने मोठा असून यंदा पावसात झालेल्या मोठ्या घटीमुळे तालुक्यात…

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.