Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

३९ ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त, तरी आरोपीला जामीन! संगमनेर न्यायालयाच्या आदेशात नेमके काय?

09/10/2026

सायखिंडी फाटा गांजा तस्करीत आरोपींना पुन्हा १२ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कस्टडी; बँक खात्यांचे आर्थिक व्यवहार पोलिसांच्या रडारवर

09/10/2026

झाडपाल्याचे औषध देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीस मिठी मारली, संगमनेरच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीला दिली शिक्षा; काय आहे प्रकार….

09/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » शिर्डी विमानतळावर रात्रीची विमानसेवा सुरू, भाविकांच्या प्रवासाची सोय… विकासाला मिळणार नवी गती
महाराष्ट्र संवाद विशेष

शिर्डी विमानतळावर रात्रीची विमानसेवा सुरू, भाविकांच्या प्रवासाची सोय… विकासाला मिळणार नवी गती

पहिल्या नाईट लँडिंगसाठी विमानतळावर विशेष तयारी करण्यात आली होती. विमान उतरल्यावर प्रशासन आणि स्थानिक नागरिकांनी जल्लोषात स्वागत केले. यावेळी विमानतळावर विशेष रोषणाई आणि सजावटही करण्यात आली होती. नाईट लँडिंग सेवेच्या प्रारंभामुळे शिर्डीला येणाऱ्या भाविकांची संख्या वाढेल आणि पर्यटनाला मोठा चालना मिळेल, असे विमानतळ प्रशासनाने सांगितले आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar31/03/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

शिर्डी, दि. ३१ मार्च –

शिर्डी विमानतळावर बहुप्रतिक्षित ‘नाईट लँडिंग’ सेवेला अखेर सुरुवात झाली आहे. गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर रात्रीच्या वेळी पहिल्या विमानाचे यशस्वी लँडिंग झाले. या ऐतिहासिक घटनेमुळे शिर्डी आणि आसपासच्या भागातील विकासाला नवी गती मिळेल, अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून शिर्डी विमानतळावर रात्रीची विमानसेवा सुरू व्हावी, अशी मागणी भाविक आणि स्थानिक नागरिकांकडून होत होती. या मागणीची दखल घेत महायुती सरकारने याबाबत त्वरित निर्णय घेतला. त्यानुसार, गुढीपाडव्याला रात्रीच्या पहिल्या विमानाचे शिर्डी एअरपोर्टवर जल्लोषात स्वागत करण्यात आले. या प्रसंगी माजी खासदार सुजय विखे पाटील उपस्थित होते. त्यांनी प्रवाशांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

सुजय विखे पाटील यांनी सांगितले की, नाशिकमध्ये कुंभमेळा होणार असल्यामुळे शिर्डी विमानतळ संपूर्ण विमान उद्योगाचे केंद्र बनेल, असा आमचा प्रयत्न आहे. तसेच, नवीन विमानतळ लवकरात लवकर पूर्ण करण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. शिर्डी विमानतळ ५०० कोटी रुपये खर्चून बांधले जाणार असून ते आंतरराष्ट्रीय दर्जाचे असेल. या विमानतळावर किमान चार ते पाच एरो ब्रिजची सुविधा असेल. हे नवीन विमानतळ २०२७ पूर्वी पूर्ण होईल, ज्यामुळे कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या प्रवाशांना मोठा फायदा होईल.

या संदर्भात पुढील आठवड्यात मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेणार असून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली हे विमानतळ दोन वर्षांत पूर्ण करू, असा विश्वासही विखे पाटील यांनी व्यक्त केला.

पहिल्या नाईट लँडिंगसाठी विमानतळावर विशेष तयारी करण्यात आली होती. विमान उतरल्यावर प्रशासन आणि स्थानिक नागरिकांनी जल्लोषात स्वागत केले. यावेळी विमानतळावर विशेष रोषणाई आणि सजावटही करण्यात आली होती. नाईट लँडिंग सेवेच्या प्रारंभामुळे शिर्डीला येणाऱ्या भाविकांची संख्या वाढेल आणि पर्यटनाला मोठा चालना मिळेल, असे विमानतळ प्रशासनाने सांगितले आहे. यामुळे साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची सोय होईलच, शिवाय आर्थिक व व्यावसायिक विकासालाही चालना मिळेल. या सेवेच्या प्रारंभामुळे स्थानिक रहिवाशांनी आनंद व्यक्त केला असून सरकारचे आभार मानले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,133
शिर्डी एअरपोर्ट नाईट लँडिंग सुजय विखे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

महात्मा गांधी हे भारतीय तत्त्वज्ञानाचे प्रतिबिंब: संदीप वाकचौरे

07/10/2026

सूचकांच्या एका निर्णयाने जिल्हा बँकेच्या निवडणुकीला नवा ट्विस्ट; संगमनेर-राहात्यातील समीकरणे घडली, विखे-देशमुखांच्या गुलालाचा मार्ग मोकळा?

06/10/2026

फक्त गतिरोधक नव्हे, अवजड वाहतूक आणि अतिक्रमणावरही ठोस कारवाई करा : इरफानभाई मन्सुरी

06/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
न्यायालय

३९ ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त, तरी आरोपीला जामीन! संगमनेर न्यायालयाच्या आदेशात नेमके काय?

By Annant Ppangarkar09/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने एमडी ड्रग्ज बाळगल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात…

सायखिंडी फाटा गांजा तस्करीत आरोपींना पुन्हा १२ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कस्टडी; बँक खात्यांचे आर्थिक व्यवहार पोलिसांच्या रडारवर

09/10/2026

झाडपाल्याचे औषध देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीस मिठी मारली, संगमनेरच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीला दिली शिक्षा; काय आहे प्रकार….

09/10/2026

शुक्रवार ०९ ऑक्टोंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

09/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.