Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

माजी मंत्री थोरात आणि डॉ. तांबे यांनी घेतली पद्मभूषण अण्णा हजारे यांची भेट; प्रकृतीची केली चौकशी

13/09/2026

गणेश मूर्ती आगमन मिरवणुकीत कर्णकर्कश साऊंड सिस्टीम वाजवल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल; सिस्टीम जप्त करून १५ हजारांचा दंड

13/09/2026

रविवार विशेष लेख — अमृता वहिनींची मात्रा कारणी लागो!

13/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » अहिल्यानगर जिल्ह्यात ‘लाडक्या बहिणीं’ची कसून पडताळणी; १५०० महिलांच्या नावावर चारचाकी वाहने; अपात्र लाभार्थ्यांवर सरकारची करडी नजर
राजकारण

अहिल्यानगर जिल्ह्यात ‘लाडक्या बहिणीं’ची कसून पडताळणी; १५०० महिलांच्या नावावर चारचाकी वाहने; अपात्र लाभार्थ्यांवर सरकारची करडी नजर

विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने राज्यातील महिलांना आर्थिक हातभार लावण्यासाठी ‘लाडकी बहीण योजना’ सुरू केली. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये आर्थिक मदत देण्यात येत आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात १२ लाखांहून अधिक महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar31/03/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

अहिल्यानगर, दि. ३१ मार्च – 

‘लाडकी बहीण योजने’च्या पात्रतेचे निकष डावलून लाभ घेणाऱ्या महिलांवर राज्य सरकारने कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात तब्बल १५०० हून अधिक महिलांच्या नावावर चारचाकी वाहने असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या अपात्र लाभार्थ्यांची नावे महिला व बालकल्याण विभागाकडे पाठवण्यात आली असून, त्यांचा ‘लाडकी बहीण योजने’चा लाभ बंद होण्याची शक्यता आहे.

राज्य सरकारच्या या कठोर भूमिकेमुळे ‘लाडकी बहीण योजने’तील अपात्र लाभार्थ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने राज्यातील महिलांना आर्थिक हातभार लावण्यासाठी ‘लाडकी बहीण योजना’ सुरू केली. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये आर्थिक मदत देण्यात येत आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात १२ लाखांहून अधिक महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.

मात्र, निवडणुकीनंतर या योजनेच्या पात्रतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहेत. अनेक अपात्र महिलांनीही या योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर, राज्य सरकारने आता अपात्र लाभार्थ्यांवर कारवाईचा निर्णय घेतला आहे.

यासाठी सरकारने सुरू केलेल्या पडताळणीत धक्कादायक माहिती उघड उघड झाली आहे. राज्य सरकारने परिवहन विभागाकडे नोंदणी असलेल्या महिलांची यादी महिला व बालकल्याण विभागाकडे पाठवली आहे. या यादीनुसार, अहिल्यानगर जिल्ह्यात १५०० हून अधिक महिलांच्या नावावर चारचाकी वाहने असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे या महिलांनी योजनेच्या पात्रतेचे निकष डावलून लाभ घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.

अपात्र लाभार्थ्यांवर कारवाई अटळ… आता राज्य सरकार या अपात्र लाभार्थ्यांची नावे योजनेतून वगळण्याची शक्यता आहे. या महिलांना आतापर्यंत मिळालेली आर्थिक मदतही परत घेतली जाण्याची शक्यता असून या अपात्र लाभार्थ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल होण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.

काय आहे ‘लाडकी बहीण योजने’चे निकष..

 * लाभार्थी महिलेचे वय २१ ते ६० वर्षांच्या दरम्यान असावे.

 * लाभार्थी महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २.५ लाख रुपयांपेक्षा कमी असावे.

 * लाभार्थी महिलेच्या नावावर चारचाकी वाहन नसावे.

 * लाभार्थी महिलेच्या कुटुंबातील सदस्य सरकारी नोकरीत नसावा.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,033
कारवाई चार चाकी धक्कादायक माहिती निकष पडताळणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

गणेश मूर्ती आगमन मिरवणुकीत कर्णकर्कश साऊंड सिस्टीम वाजवल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल; सिस्टीम जप्त करून १५ हजारांचा दंड

13/09/2026

अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; सुमारे चार कोटी रुपयांचे संशयास्पद बटर जप्त

11/09/2026

आंदोलनाची हवा काढण्यासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट? : अमोल शेलकर यांचा घणाघात, पालकमंत्री व लोकप्रतिनिधींवर संगमनेरच्या हक्काची रेल्वे हिरावल्याचा थेट आरोप; कागदपत्रे सार्वजनिक करण्याचे आव्हान

09/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

माजी मंत्री थोरात आणि डॉ. तांबे यांनी घेतली पद्मभूषण अण्णा हजारे यांची भेट; प्रकृतीची केली चौकशी

By Annant Ppangarkar13/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत पद्मभूषण अण्णा हजारे यांची काँग्रेस पक्षाचे…

गणेश मूर्ती आगमन मिरवणुकीत कर्णकर्कश साऊंड सिस्टीम वाजवल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल; सिस्टीम जप्त करून १५ हजारांचा दंड

13/09/2026

रविवार विशेष लेख — अमृता वहिनींची मात्रा कारणी लागो!

13/09/2026

आज रविवार, १३ सप्टेंबर— जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल

13/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.