Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

पोलिसांची गुटख्याविरोधात मोठी कारवाई; सिनेस्टाईल पाठलाग करून ५१ लाखांचा मुद्देमाल जप्त

25/08/2026

संगमनेरमध्ये सह्याद्री कॉलेज शेजारील ‘बर्गेज कॅफे’वर पोलिसांची धाड; अश्लील चाळ्यांसाठी जागा पुरवणाऱ्या चालकावर गुन्हा दाखल

25/08/2026

निमोण-सोनेवाडीतील तरुणांचा शिवसेनेत प्रवेश, आमदार खताळ यांच्या कामाच्या पद्धतीवर विश्वास

25/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » ‘मिशन ५० लिटर’ दुग्ध क्रांती! राजहंस दूध संघाचा ऐतिहासिक उपक्रम! १ एप्रिलपासून दूध उत्पादकांना प्रति लिटर ३४ रुपये भाव, माजी मंत्री बाळासाहेब थोरातांकडून राजहंस दूध संघाच्या कार्याचे कौतुक
शेती व सहकार

‘मिशन ५० लिटर’ दुग्ध क्रांती! राजहंस दूध संघाचा ऐतिहासिक उपक्रम! १ एप्रिलपासून दूध उत्पादकांना प्रति लिटर ३४ रुपये भाव, माजी मंत्री बाळासाहेब थोरातांकडून राजहंस दूध संघाच्या कार्याचे कौतुक

५० लिटर दूध उत्पादन करणाऱ्या गाईंसाठी १२५० गाईंची नोंदणी केली आहे. कालवडींचे संगोपन महत्त्वाचे आहे. त्यांना योग्य आहार देणे आवश्यक आहे. गाईंचे आरोग्य आणि स्वच्छता जपली तर दूध व्यवसाय शेतकऱ्यांना फायदेशीर ठरेल. - देशमुख
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar02/04/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, दि. २ एप्रिल – प्रतिनिधी

राजहंस दूध संघाच्या ‘मिशन ५० लिटर’ उपक्रमाअंतर्गत कालवड संगोपन कार्यशाळेत माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी संघाच्या कार्याचे कौतुक केले. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी दूध संघाची स्थापना केली, आज तालुक्यात ९ लाख लिटर दूध उत्पादन होत आहे. कमी गाईंमध्ये जास्त दूध उत्पादन होण्यासाठी राजहंस दूध संघाचा ५० लिटर दूध उत्पादन करणाऱ्या गाई निर्माण करण्याचा उपक्रम दिशादर्शक आहे, असे प्रतिपादन माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.

यावेळी ५० लिटर दूध निर्मिती करणाऱ्या नवीन कालवडी आणि गाईंचे प्रदर्शन झाले. मिशन ५० लिटर अंतर्गत कालवड संगोपन योजना कार्यशाळेत थोरात बोलत होते. अध्यक्षस्थानी चेअरमन रणजीतसिंह देशमुख होते.

बाळासाहेब थोरात म्हणाले की, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात, डॉ.अण्णासाहेब शिंदे, मनीभाई देसाई, आप्पासाहेब पवार यांच्यासह जुन्या पिढीने दूध वाढीबाबत मेळावे घेऊन दिशा दाखविली. १९८० नंतर तालुक्यात दूध वाढीसाठी प्रयत्न केले गेले. मुरघास, एमडीफ गोठा योजना यशस्वी ठरल्या. गुणवत्ता आणि शुद्ध दूध हे वैशिष्ट्य जपले पाहिजे. ५० लिटर दूध उत्पादन करणाऱ्या गाई निर्माण करण्याचा उपक्रम महाराष्ट्राला दिशादर्शक ठरेल.

१ एप्रिलपासून प्रति लिटर ३४ रुपये भाव देण्यात येणार असल्याचे रणजितसिंह देशमुख यांनी जाहीर करत देशमुख म्हणाले की, बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली दूध संघाची वाटचाल सुरू आहे. एमडीएफ गोठा आणि मुरघास पद्धत आता राज्यात पोहोचली आहे. दुधाला यापुढे उद्योग म्हणून पाहिले पाहिजे. ५० लिटर दूध उत्पादन करणाऱ्या गाईंसाठी १२५० गाईंची नोंदणी केली आहे. कालवडींचे संगोपन महत्त्वाचे आहे. त्यांना योग्य आहार देणे आवश्यक आहे. गाईंचे आरोग्य आणि स्वच्छता जपली तर दूध व्यवसाय शेतकऱ्यांना फायदेशीर ठरेल.

कार्यक्रमात मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. अब्दुल समद, उदय तिवारी, डॉ. परीक्षित देशमुख, विक्रम भंडारी, विजय विश्वकर्मा यांनी मार्गदर्शन केले. स्वागत डॉ. प्रमोद पावसे यांनी केले. तर प्रास्ताविक कार्यकारी संचालक डॉ. सुजित खिलारी यांनी केले. ॲड. जोंधळे यांनी सूत्रसंचालन केले तर विलास कवडे यांनी आभार मानले. दूध उत्पादक शेतकरी आणि विविध दूध सोसायटीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,533
कार्यशाळा बाळासाहेब थोरात रणजीतसिंह देशमुख
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन; माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले…

04/08/2026

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे संगमनेर शहरात अद्यावत स्मारक उभारणार : माजी आमदार डॉ. सुधीर तांबे

01/08/2026

संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा धक्का; आमदारकी टांगणीला

30/07/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

पोलिसांची गुटख्याविरोधात मोठी कारवाई; सिनेस्टाईल पाठलाग करून ५१ लाखांचा मुद्देमाल जप्त

By Annant Ppangarkar25/08/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  अहिल्यानगर: अहिल्यानगर जिल्ह्यातील खर्डा पोलिसांनी प्रतिबंधित गुटखा आणि तंबाखूजन्य…

संगमनेरमध्ये सह्याद्री कॉलेज शेजारील ‘बर्गेज कॅफे’वर पोलिसांची धाड; अश्लील चाळ्यांसाठी जागा पुरवणाऱ्या चालकावर गुन्हा दाखल

25/08/2026

निमोण-सोनेवाडीतील तरुणांचा शिवसेनेत प्रवेश, आमदार खताळ यांच्या कामाच्या पद्धतीवर विश्वास

25/08/2026

आज मंगळवार, २५ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

25/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.