Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आमदार अमोल खताळ यांनी वेधले ऊर्जा राज्यमंत्र्यांचे लक्ष; मेंढवन उपकेंद्राचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी

10/10/2026

शनिवार १० ऑक्टोंबर — जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा असेल

10/10/2026

३९ ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त, तरी आरोपीला जामीन! संगमनेर न्यायालयाच्या आदेशात नेमके काय?

09/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट राजकीय अड्डा बनत असल्याची मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची टीका
शेती व सहकार

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट राजकीय अड्डा बनत असल्याची मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची टीका

पद्मश्री डॉ. विखे पाटील कारखान्याचे आधुनिकीकरण आणि गाळप क्षमता वाढवण्याचे प्रयत्न सुरू असून, सभासदांना योग्य भाव देण्यात कारखाना प्रथम क्रमांकावर राहील, असे आश्वासन विखे यांनी दिले.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar03/04/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

राहाता, दि. ३ एप्रिल – 

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने खाजगी संस्थांनाही सदस्यत्व देण्यास सुरुवात केल्यामुळे, ही संस्था आता राजकीय अड्डा बनत असल्याचे राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे. या संस्थेने सहकारी संस्थांना बळकट करण्याचे धोरण अवलंबायला हवे होते, परंतु तसे झाले नाही. राज्यातील सहकारी चळवळीसमोर अनेक प्रश्न आहेत, परंतु ते सोडवण्यासाठी कोणीही पुढे आलेले नाही, असेही त्यांनी सांगितले.

शरद पवारांचे नाव न घेता, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी टीका केली की, ‘जाणते राजे’ देखील दिल्लीत केवळ शिष्टमंडळ घेऊन जातात. सहकारी संस्थांचे प्रश्न न सुटल्यामुळे अनेक संस्था बंद पडल्या आहेत. कारखान्यांचे खाजगीकरण झाले आणि ते कवडीमोल भावाने विकले गेले. सहकारी संस्थांना दडपून टाकून दहशत निर्माण करण्यात आली आणि राजकीय फायद्यासाठी संस्थांचा वापर केला गेला, असा आरोपही त्यांनी केला.

पद्मश्री विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचा अमृतमहोत्सवी गळीत हंगाम समारोप माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली झाला, त्यावेळी मंत्री विखे बोलत होते. ज्येष्ठ नेते अण्णासाहेब भोसले, अध्यक्ष कैलास तांबे, उपाध्यक्ष सतीश ससाणे, कार्यकारी संचालक महेश कोनापुरे आदी उपस्थित होते.

पद्मश्री डॉ. विखे पाटील कारखान्याचे आधुनिकीकरण आणि गाळप क्षमता वाढवण्याचे प्रयत्न सुरू असून, सभासदांना योग्य भाव देण्यात कारखाना प्रथम क्रमांकावर राहील, असे आश्वासन विखे यांनी दिले. आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष साजरे होत असताना कारखान्याने ७५ वर्षांचा प्रवास पूर्ण करणे ही सहकारी चळवळीसाठी अभिमानाची बाब आहे, असेही ते म्हणाले.

शेतकरी आणि सभासदांच्या हिताच्या निर्णयामुळेच हा कारखाना ७५ वर्षे अखंडपणे सुरू राहिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सहकार मंत्रालय स्थापन झाल्यानंतर सहकारी चळवळीला मोठी ताकद मिळाली आहे. अहिल्यानगर जिल्हा बँकेने चांगले काम केल्यामुळे जिल्ह्यातील सहकारी साखर कारखाने टिकून राहिले आहेत. योग्य नियोजनामुळे पाण्याची समस्या उद्भवणार नाही. पाण्याचे योग्य पद्धतीने नियोजन झाल्यामुळेच बंधारे आज भरलेले आहेत. येत्या ७ तारखेपासून भंडारदरा धरणातून पाणी सोडले जाईल आणि आणखी दोन वेळा पाणी सोडण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 592
गळीत हंगाम सांगता पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील साखर कारखाना राधाकृष्ण विखे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

सूचकांच्या एका निर्णयाने जिल्हा बँकेच्या निवडणुकीला नवा ट्विस्ट; संगमनेर-राहात्यातील समीकरणे घडली, विखे-देशमुखांच्या गुलालाचा मार्ग मोकळा?

06/10/2026

मी पक्ष सोडलेला नाही माझ्या विजयाचं श्रेय कोणीही उकळू नये; स्वीडनच्या खासदार नीला विखेंच्या स्पष्टीकरणाने विखेंचं हसं

25/09/2026

संगमनेर तालुक्यात १०२ कोटींच्या विकासकामांचा धडाका; उद्या पालकमंत्री विखे पाटील आणि आमदार खताळ यांच्या हस्ते भूमिपूजन व लोकार्पण

22/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

आमदार अमोल खताळ यांनी वेधले ऊर्जा राज्यमंत्र्यांचे लक्ष; मेंढवन उपकेंद्राचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी

By Annant Ppangarkar10/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- मतदारसंघातील वीजपुरवठ्याशी संबंधित गंभीर समस्या तातडीने सोडवण्यासाठी आमदार अमोल खताळ पाटील…

शनिवार १० ऑक्टोंबर — जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा असेल

10/10/2026

३९ ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त, तरी आरोपीला जामीन! संगमनेर न्यायालयाच्या आदेशात नेमके काय?

09/10/2026

सायखिंडी फाटा गांजा तस्करीत आरोपींना पुन्हा १२ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कस्टडी; बँक खात्यांचे आर्थिक व्यवहार पोलिसांच्या रडारवर

09/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.