Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

रविवार विशेष लेख — ज्ञानेशकुमारांचे समर्थक ढोंगी सत्यवान!

11/10/2026

दूध भेसळ प्रकरणी मुख्य आरोपीला सात दिवसांत अटकपूर्व जामीन मंजूर

11/10/2026

रविवार ११ ऑक्टोबर २०२६ — जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा असेल

11/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » भीषण अपघात… ट्रॅक्टर विहिरीत कोसळून आठ महिलांचा मृत्यू
अपघात

भीषण अपघात… ट्रॅक्टर विहिरीत कोसळून आठ महिलांचा मृत्यू

घटनेची माहिती मिळताच लिंबगाव पोलीस आणि नांदेड आपत्ती व्यवस्थापन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. हिंगोलीचे जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनीही तातडीने महसूल अधिकाऱ्यांना घटनास्थळी पाठवले.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar04/04/2025No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

नांदेड, दि. ४ एप्रिल – 

नांदेड जिल्ह्यातील आलेगाव शिवारात शुक्रवारी (दि. ४) पहाटे भीषण अपघात झाला. हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील गुंज गावातील महिलांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत कोसळला. या दुर्घटनेत आठ महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

मृतांमध्ये चित्राबाई माधव पारदे, सिमरन संतोष कांबळे, सपना राजू राऊत (२५), ज्योती इरबाजी सरोदे (३५), सरस्वती लखन बुरड (२५), ताराबाई सटवा जाधव (४०), धुरपता सटवा जाधव (१८) यांचा समावेश आहे. पार्वतीबाई बुरड (३५), पुरभाबाई कांबळे (४०) आणि सटवाजी जाधव (५५) यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.

गुंज येथील १० महिला व एक पुरुष आलेगाव शिवारात दगडू शिंदे यांच्या शेतात हळद काढण्यासाठी ट्रॅक्टरने निघाले होते. आलेगाव शिवारात दोन शेतांमध्ये असलेल्या चारीमधून ट्रॅक्टर घेताना चालकाचे नियंत्रण सुटले आणि ट्रॅक्टर विहिरीत कोसळला. यात आठ महिलांचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच लिंबगाव पोलीस आणि नांदेड आपत्ती व्यवस्थापन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. हिंगोलीचे जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनीही तातडीने महसूल अधिकाऱ्यांना घटनास्थळी पाठवले. वसमतच्या तहसीलदार शारदा दळवी, मंडळ अधिकारी प्रियंका खडसे आणि गुंजचे पोलीस पाटील अंकुश सूर्यवंशी यांच्यासह ग्रामस्थांनी मदतकार्यात सहभाग घेतला. ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन बोराटे यांच्या पथकानेही घटनास्थळी धाव घेतली. विहिरीत मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने बचावकार्यात अडथळे येत होते. ट्रॅक्टर कोण चालवत होते, याचा तपास पोलीस करत आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,671
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

पुणे-नाशिक महामार्गावरील चंदनापुरी घाटात आर्टिका इर्टिका कारचा भीषण अपघात; एका युवतीचा जागीच मृत्यू, चार प्रवासी गंभीर

08/10/2026

नाशिक-पुणे बायपासवर भीषण अपघात: बुलेटची कंटेनरला धडक, तरुणाचा मृत्यू

05/10/2026

दिल्ली नाक्यावर कंटेनरखाली चिरडून महिलेचा मृत्यू, संगमनेर शहरातील जड वाहतुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; नागरिकांचा संताप

15/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
रविवार विशेष

रविवार विशेष लेख — ज्ञानेशकुमारांचे समर्थक ढोंगी सत्यवान!

By Annant Ppangarkar11/10/20260

प्रवीण पुरो – देश एका वेगळ्या वळणावर असताना, या देशाचं सार्वभौमत्व संकटात आणणाऱ्या सरकारला आणि…

दूध भेसळ प्रकरणी मुख्य आरोपीला सात दिवसांत अटकपूर्व जामीन मंजूर

11/10/2026

रविवार ११ ऑक्टोबर २०२६ — जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा असेल

11/10/2026

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यातील विविध रस्ते मजबुतीकरणासाठी ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर; आमदार सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्याला यश

10/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.