Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक अपडेट: विखे, राजळे, लहामटे अन् जगतापांच्या अर्जांवर हरकती; निकालाकडे जिल्ह्याचे लक्ष, छाननी दरम्यान काय घडले….

06/10/2026

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे एस.टी. पास शुल्क पूर्णपणे माफ करा; आमदार अमोल खताळ यांची परिवहन मंत्र्यांकडे मागणी

06/10/2026

सूचकांच्या एका निर्णयाने जिल्हा बँकेच्या निवडणुकीला नवा ट्विस्ट; संगमनेर-राहात्यातील समीकरणे घडली, विखे-देशमुखांच्या गुलालाचा मार्ग मोकळा?

06/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना निवडणूक, दुसऱ्या दिवसाअखेर अशी आहे उमेदवारी अर्जाची स्थिती
निवडणूक

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना निवडणूक, दुसऱ्या दिवसाअखेर अशी आहे उमेदवारी अर्जाची स्थिती

थोरात यांनी काही दिवसांपूर्वी गणेश सहकारी साखर कारखान्यात विवेक कोल्हे यांना सोबत घेत गणेश कारखान्यावरील विखेंची सत्ता संपुष्टात आणली होती. त्यामुळे याची देखील भीती मंत्री विखे यांना आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar04/04/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, दि. ४ एप्रिल –

राज्याच्या आजी-माजी महसूलमंत्र्यांच्या अधिपत्याखाली असलेल्या साखर कारखान्यांची पंचवार्षिक निवडणूक पुढील महिन्यात होत आहे. कारखान्यावरील आपले वर्चस्व कायम राखण्यासाठी आजी माजी मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. संगमनेरच्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्यासाठी दुसऱ्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नसल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी शैलेश हिंगे यांनी दिले आहे.

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आतापर्यंतच्या दोन दिवसात केवळ माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा एकमेव उमेदवारी अर्ज साकुर, जोर्वे आणि सोसायटी मतदारसंघातून दाखल झाला आहे.

राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी आमदार अमोल खताळ यांच्या नेतृत्वाखाली जोरात कारखान्याची निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्याने विखे समर्थकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहे. मात्र आतापर्यंत विरोधी गटाकडून एकही उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेला नाही. गेल्या दोन दिवसात उमेदवारी अर्ज मिळणाऱ्या इच्छुकांची संख्या मोठी असली तरी प्रत्यक्षात निवडणुकीच्या मैदानात कोण लढते याची देखील उत्सुकता आहे. सहकार महर्षी थोरात कारखान्याच्या स्थापनेपासून या कारखान्यावर थोरात परिवाराचे वर्चस्व राहिले आहे.

दुसरीकडे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या अधिपत्याखालील पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याची निवडणूक देखील पुढील महिन्यात होत असून या निवडणुकीत माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची भूमिका काय राहते याकडे लक्ष लागले आहे. थोरात यांनी काही दिवसांपूर्वी गणेश सहकारी साखर कारखान्यात विवेक कोल्हे यांना सोबत घेत गणेश कारखान्यावरील विखेंची सत्ता संपुष्टात आणली होती. त्यामुळे याची देखील भीती मंत्री विखे यांना आहे.

अशा स्थितीत दोन्ही कारखान्यांच्या निवडणुका कशा पद्धतीने होतात याकडे सभासदांचे लक्ष लागले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 2,351
उमेदवारी अर्ज थोरात कारखाना निवडणूक
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक अपडेट: विखे, राजळे, लहामटे अन् जगतापांच्या अर्जांवर हरकती; निकालाकडे जिल्ह्याचे लक्ष, छाननी दरम्यान काय घडले….

06/10/2026

सूचकांच्या एका निर्णयाने जिल्हा बँकेच्या निवडणुकीला नवा ट्विस्ट; संगमनेर-राहात्यातील समीकरणे घडली, विखे-देशमुखांच्या गुलालाचा मार्ग मोकळा?

06/10/2026

अहिल्यानगर जिल्हा बँकेसाठी संगमनेर तालुक्यातून शिवसेनेचे तीन उमेदवार मैदानात — यांनी केले अर्ज दाखल

05/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
निवडणूक

अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक अपडेट: विखे, राजळे, लहामटे अन् जगतापांच्या अर्जांवर हरकती; निकालाकडे जिल्ह्याचे लक्ष, छाननी दरम्यान काय घडले….

By Annant Ppangarkar06/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी आता रंगात आली…

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे एस.टी. पास शुल्क पूर्णपणे माफ करा; आमदार अमोल खताळ यांची परिवहन मंत्र्यांकडे मागणी

06/10/2026

सूचकांच्या एका निर्णयाने जिल्हा बँकेच्या निवडणुकीला नवा ट्विस्ट; संगमनेर-राहात्यातील समीकरणे घडली, विखे-देशमुखांच्या गुलालाचा मार्ग मोकळा?

06/10/2026

संगमनेरमधील भावी पोलीस योद्ध्यांसाठी ‘मिशन खाकी’ ठरतेय आधार; प्रशिक्षण केंद्रांमध्ये जनजागृती मोहीम सुरू

06/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.