Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यातील विविध रस्ते मजबुतीकरणासाठी ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर; आमदार सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्याला यश

10/10/2026

MPSC आंदोलनाला डॉ. जयश्रीताई थोरात यांचा पाठिंबा; समाज आणि आयोगातील ब्लड कॅन्सर ठीक करायचाय!

10/10/2026

आमदार अमोल खताळ यांनी वेधले ऊर्जा राज्यमंत्र्यांचे लक्ष; मेंढवन उपकेंद्राचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी

10/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी स्वतःवर गोळी झाडून केला आत्महत्येचा प्रयत्न, प्रकृती गंभीर
महाराष्ट्र संवाद विशेष

आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी स्वतःवर गोळी झाडून केला आत्महत्येचा प्रयत्न, प्रकृती गंभीर

घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनातील उच्च अधिकाऱ्यांनी तातडीने सह्याद्री रुग्णालयाकडे धाव घेतली. लातूर पोलिसांनी मनोहरे यांच्या निवासस्थानी जाऊन पंचनामा केला
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar06/04/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

रविवार, दि. ६ एप्रिल –
लातूर महानगरपालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे (वय ५०) यांनी शनिवारी रात्री शासकीय निवासस्थानी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. गोळी डोक्यातून आरपार गेल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक असून, त्यांच्यावर लातूरमधील सह्याद्री रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आयुक्‍त बाबासाहेब मनोहरे यांनी शनिवारी रात्री सुमारे सव्वा अकरा वाजता त्यांच्या शासकीय बंगल्यावरील एका खोलीत स्वतःच्या रिव्हॉल्व्हरमधून डोक्यात गोळी झाडून घेतली. गोळीचा आवाज ऐकून कुटुंबीयांनी तातडीने खोलीकडे धाव घेतली, तेव्हा ते रक्तबंबाळ अवस्थेत आढळले. त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.
सह्याद्री हॉस्पिटलचे संचालक डॉ. हनुमंत किनीकर यांनी सांगितले की, गोळी त्यांच्या डोक्याच्या उजव्या बाजूने घुसून आरपार निघाली आहे. या दुर्घटनेत त्यांच्या डोक्याची कवटी फुटली असून, मेंदूलाही गंभीर इजा झाली आहे. कवटीचे काही तुकडे मेंदूत पसरले आहेत. डॉक्टरांचे पथक त्यांची प्रकृती स्थिर ठेवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहे. त्यांच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली असून, सध्या ते अतिदक्षता विभागात आहेत. त्यांची प्रकृती अजूनही नाजूक आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री मनोहरे यांनी कुटुंबासोबत जेवण केले आणि नेहमीप्रमाणे गप्पा मारल्या. त्यानंतर ते त्यांच्या खोलीत गेले आणि काही वेळातच गोळी झाडल्याचा आवाज आला.
बाबासाहेब मनोहरे हे त्यांच्या कठोर शिस्त आणि स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. त्यांनी यापूर्वी धाराशिव आणि नांदेड जिल्ह्यांमध्ये महत्त्वाच्या पदांवर काम केले होते. लातूर महानगरपालिकेत त्यांनी सुरुवातीला अतिरिक्त आयुक्त म्हणून काम पाहिले आणि नंतर त्यांची आयुक्तपदी नियुक्ती झाली. त्यांनी आपल्या कार्यकाळात महानगरपालिकेचा कारभार उत्तम प्रकारे चालवला होता. त्यांच्यासारख्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनातील उच्च अधिकाऱ्यांनी तातडीने सह्याद्री रुग्णालयाकडे धाव घेतली. लातूर पोलिसांनी मनोहरे यांच्या निवासस्थानी जाऊन पंचनामा केला असून, या घटनेचा कसून तपास सुरू आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,206
आत्महत्येचा प्रयत्न बाबासाहेब मनोहरे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

MPSC आंदोलनाला डॉ. जयश्रीताई थोरात यांचा पाठिंबा; समाज आणि आयोगातील ब्लड कॅन्सर ठीक करायचाय!

10/10/2026

महात्मा गांधी हे भारतीय तत्त्वज्ञानाचे प्रतिबिंब: संदीप वाकचौरे

07/10/2026

फक्त गतिरोधक नव्हे, अवजड वाहतूक आणि अतिक्रमणावरही ठोस कारवाई करा : इरफानभाई मन्सुरी

06/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यातील विविध रस्ते मजबुतीकरणासाठी ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर; आमदार सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्याला यश

By Annant Ppangarkar10/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- भौगोलिकदृष्ट्या विस्ताराने मोठ्या असलेल्या संगमनेर तालुक्यातील ग्रामीण रस्त्यांचे जाळे अधिक भक्कम…

MPSC आंदोलनाला डॉ. जयश्रीताई थोरात यांचा पाठिंबा; समाज आणि आयोगातील ब्लड कॅन्सर ठीक करायचाय!

10/10/2026

आमदार अमोल खताळ यांनी वेधले ऊर्जा राज्यमंत्र्यांचे लक्ष; मेंढवन उपकेंद्राचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी

10/10/2026

शनिवार १० ऑक्टोंबर — जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा असेल

10/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.