Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर तालुका कोणाची जहागीरदारी नाही; जनतेने परिवर्तन घडविले: आमदार अमोल खताळ

01/11/2026

दोडक्याच्या पिकात गांजाची शेती; १५ लाखांचा मुद्देमाल जप्त, पोलिसांची धडक कारवाई

01/11/2026

संगमनेरात दिवाळीच्या तोंडावर उफाळला वाद! एका नगरसेवकामुळे ठाकरेंची शिवसेना आक्रमक; वसुली आणि आरक्षणाच्या मुद्द्यावर खळबळजनक आरोप! गोरगरिबांना त्रास देणारा तो नगरसेवक कोण?

01/11/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरात नामांकित डॉक्टर अमोल कर्पेवर अल्पवयीन मुलीवर अत्याचार व पोक्सोअंतर्गत गंभीर गुन्हा दाखल
गुन्हेगारी

संगमनेरात नामांकित डॉक्टर अमोल कर्पेवर अल्पवयीन मुलीवर अत्याचार व पोक्सोअंतर्गत गंभीर गुन्हा दाखल

दरम्यान या घटनेची माहिती मिळताच रुग्णालयात चौकशीसाठी गेलेल्या महिला पोलीस अधिकाऱ्यास रुग्णालयातील महिलेले धक्काबुक्की केल्याचा प्रकार समोर आला असून यासंदर्भात देखील धक्काबुक्की करणाऱ्या दवाखान्यातील महिलेवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar06/04/2025Updated:06/04/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, दि. ६ एप्रिल – प्रतिनिधी
शहरातील नामांकित डॉक्टर अमोल कर्पे यांनी एका सोळा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर दवाखान्याच्या टेरेसवर अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. दरम्यान फरार झालेल्या डॉक्टरला पोलिसांनी नाशिकमधून ताब्यात घेतल्याची माहिती समोर येत आहे. शहरात राम नवमी उत्सवाची धामधुम सुरू असतानाच समोर आलेल्या या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे.
पीडित मुलीच्या तक्रारीवरून डॉ. कर्पेवर शहर पोलीस ठाण्यात बलात्कार व पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान रुग्णालयात चौकशीसाठी गेलेल्या महिला पोलीस पोलीस अधिकाऱ्याला दवाखान्यातील महिला कर्मचाऱ्यांनी धक्काबुक्की केल्याचा प्रकार देखील घडला असल्याची माहिती समोर येत आहे.
संगमनेर शहरातील कर्पे याच्या दवाखान्यात संगमनेर तालुक्याचा ग्रामीण भागातील अल्पवयीन पीडित मुलगी रुग्ण म्हणून चार एप्रिल पासून उपचार घेत होती. रविवारी पहाटे चार-पाच वाजण्याच्या सुमारास दवाखान्यात आलेल्या डॉ. कर्पे याने पीडित रुग्ण मुलीच्या तब्येतीची विचारपूस करत ‘तू जरा बाहेर ये, असे सांगत तिला टेरेसवर घेऊन गेले’.
त्यानंतर बोलता बोलता तिला मिठी मारत कपड्यात हात घातले. पीडित मुलगी ओरडली असता ‘ओरडू नको नाहीतर तू काय केले हे मी तुझ्या आई-वडिलांना सांगेल, असे सांगून तू जर कोणाला काही सांगितले तर तुला जिवंत ठेवणार नाही असे म्हणत तिच्या मनाविरुद्ध लैंगिक अत्याचार केला’. व पुन्हा धमकी देऊन निघून गेले.
सकाळी नऊच्या सुमारास दवाखान्यात आलेला आपल्या चुलत्याला तीने आपल्यावर अत्याचार झाल्याची माहिती दिली, त्यानंतर चुलत्याने नातेवाईकांना या घटनेची माहिती दिल्यानंतर संतप्त झालेल्या नातेवाईकांनी डॉक्टरच्या दवाखान्यासमोर येऊन हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांना मारहाण केली.
या प्रकाराचा बोभाटा झाल्याने डॉ. कर्पे फरार झाला होता. या घटनेची माहिती मिळताच संगमनेर शहर पोलिसांचा मोठा फौजफाटा तातडीने घटनास्थळी दाखल झाला. त्याचबरोबर, घटनेची माहिती हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांना मिळताच त्यांनीही दवाखान्यासमोर धाव घेतली. कार्यकर्त्यांनी दवाखान्यात घडलेल्या या घटनेचा तीव्र निषेध करत संबंधित डॉक्टरविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे.
या घटनेची माहिती शहरात आणि परिसरात वेगाने पसरल्याने दवाखान्यासमोर बघणाऱ्यांची मोठी गर्दी जमा झाली होती. तर पीडित मुलीच्या तक्रारीवरून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात डॉ. अमोल कर्पे याच्या विरोधात रविवारी दुपारी गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला पोलिसांनी नाशिक येथून ताब्यात घेतल्याची माहिती समोर येत आहे. पुढील तपास संगमनेरचे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक फरहाना पटेल करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

दरम्यान या घटनेची माहिती मिळताच रुग्णालयात चौकशीसाठी गेलेल्या महिला पोलीस अधिकाऱ्यास रुग्णालयातील महिलेले धक्काबुक्की केल्याचा प्रकार समोर आला असून यासंदर्भात देखील धक्काबुक्की करणाऱ्या दवाखान्यातील महिलेवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 11,808
अमोल कर्पे अल्पवयीन मुलीवर अत्याचार संगमनेर पोलीस
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

दोडक्याच्या पिकात गांजाची शेती; १५ लाखांचा मुद्देमाल जप्त, पोलिसांची धडक कारवाई

01/11/2026

शेतकऱ्याकडे लाच मागणाऱ्या महावितरणच्या वरिष्ठ तंत्रज्ञावर गुन्हा दाखल

30/10/2026

संगमनेरात ५ लाखांच्या मुक्या जनावरांचा जीव वाचला; गोहत्या करणाऱ्यावर पोलिसांची कारवाई

29/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

संगमनेर तालुका कोणाची जहागीरदारी नाही; जनतेने परिवर्तन घडविले: आमदार अमोल खताळ

By Annant Ppangarkar01/11/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर तालुका म्हणजे काही जणांची जहागीरदारीच झाली होती. जमिनीचा सातबारा उतारा…

दोडक्याच्या पिकात गांजाची शेती; १५ लाखांचा मुद्देमाल जप्त, पोलिसांची धडक कारवाई

01/11/2026

संगमनेरात दिवाळीच्या तोंडावर उफाळला वाद! एका नगरसेवकामुळे ठाकरेंची शिवसेना आक्रमक; वसुली आणि आरक्षणाच्या मुद्द्यावर खळबळजनक आरोप! गोरगरिबांना त्रास देणारा तो नगरसेवक कोण?

01/11/2026

रविवार विशेष लेख— वृक्षदेवा अक्कल दे या सरकारा…!

01/11/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.