Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय महोत्सवात संगमनेरी योगवैभव! अहमदाबादेत ध्रुव ग्लोबलच्या १० खेळाडूंनी घडवले योगपरंपरेचे दर्शन

15/10/2026

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेर साखर कारखाना निवडणूक न लढविण्याचा विरोधकांचा निर्णय, सहकार चळवळीतील मूल्यांची पायमल्ली झाल्याचा आरोप
निवडणूक

संगमनेर साखर कारखाना निवडणूक न लढविण्याचा विरोधकांचा निर्णय, सहकार चळवळीतील मूल्यांची पायमल्ली झाल्याचा आरोप

सभासद असलेल्या कार्यकर्त्यांना कोणताही वैयक्तिक त्रास होऊ नये आणि त्यांचे आर्थिक नुकसान टाळले जावे, ही प्रमुख भूमिका आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar09/04/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, दि. ९ एप्रिल – प्रतिनिधी

संगमनेर सहकारी साखर कारखान्याच्या आगामी संचालक मंडळाच्या निवडणुकीत सहभागी न होण्याचा निर्णय विरोधी गटातील प्रमुख नेत्यांनी सर्वानुमते घेतला आहे. आमदार अमोल खताळ, ज्येष्ठ नेते बापूसाहेब गुळवे, वसंतराव गुंजाळ आणि संतोष रोहोम यांनी आज एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे या निर्णयाची माहिती दिली.

उमेदवारी अर्ज दाखल करण्याची वेळ संपल्यानंतर विरोधी महायुतीकडून या संदर्भात माध्यमांना आमदार खताळ यांच्या कार्यालयाकडून तातडीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली आहे.

प्रसिद्धी पत्रकात कारखान्याने जाणीवपूर्वक सभासद मतदारांच्या शेअर्सची रक्कम भरून न घेणे, अनेक मृत सभासदांच्या वारसांची नोंद न करणे आणि अकोले तालुक्यातील सुमारे दोन हजार सभासदांना निवडणुकीत उभे राहण्याचा अधिकार नाकारणे यांसारख्या गंभीर तक्रारींमुळे सहकार चळवळीतील मूल्यांची पायमल्ली होत असल्याचा आरोप या नेत्यांनी केला आहे.

प्रसिद्धीपत्रकात नमूद केल्यानुसार, कार्यकर्त्यांनी निवडणूक लढवण्याचा आग्रह धरला होता आणि त्यासाठी प्राथमिक तयारी देखील सुरू होती. मात्र, मतदार यादीतील गंभीर त्रुटी आणि सहकारी संस्थेच्या नियमांचे उल्लंघन निदर्शनास आल्याने हा निर्णय घेण्यात आला.

विरोधी नेत्यांनी सांगितले की, कारखान्यातील सुमारे दोन हजार सभासद मृत आहेत आणि त्यांच्या वारसांची कोणतीही नोंदणी प्रशासनाने केलेली नाही. विशेष म्हणजे, या मृत सभासदांमध्ये त्यांच्या समर्थकांचा मोठा समावेश आहे. “सहकार चळवळीत राजकारण नको” ही त्यांची भूमिका असूनही, विद्यमान प्रशासनाने मतदार यादीबाबत सभासदांच्या मागणीचा विचार न करणे हे सहकार चळवळीच्या मूळ तत्वांच्या विरोधात आहे, असे त्यांनी नमूद करत सभासद मतदारांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरूच राहतील. तसेच, सभासद असलेल्या कार्यकर्त्यांना कोणताही वैयक्तिक त्रास होऊ नये आणि त्यांचे आर्थिक नुकसान टाळले जावे, ही प्रमुख भूमिका आहे.

निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक उमेदवारांची चांगली संख्या उपलब्ध असताना, उमेदवारांची नावे समोर येऊ लागताच दबावतंत्राचा वापर आणि प्रलोभने दाखवण्याचे प्रकार सुरू झाले, जे सहकार चळवळीला बदनाम करणारे असून केवळ निवडणुकीसाठी निवडणूक करणे योग्य नाही, असे नमूद करत, विधानसभा निवडणुकीत तालुक्यातील जनतेने विकासासाठी दिलेल्या कौलाचा आदर करून आपले कार्य सुरू ठेवले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पूर्ण ताकदीने लढवण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी केला असून, तालुक्याच्या विकासासाठी ते कटिबद्ध राहतील, असे पत्रकात शेवटी स्पष्ट करण्यात आले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 2,714
अमोल खताळ थोरात कारखाना निवडणूक
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

“गंभीर दुष्काळाने साखर कारखानदारी अडचणीत; सरकारने तातडीने मदत करावी” – बाळासाहेब थोरात यांची जोरदार मागणी

14/10/2026

थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा उद्या शुभारंभ; जाणून घ्या कितवा आहे हा हंगाम!

13/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
पुरस्कार

‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय महोत्सवात संगमनेरी योगवैभव! अहमदाबादेत ध्रुव ग्लोबलच्या १० खेळाडूंनी घडवले योगपरंपरेचे दर्शन

By Annant Ppangarkar15/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- केंद्रीय युवा व्यवहार व क्रीडा मंत्रालय आणि गुजरात सरकारच्या संयुक्त विद्यमाने…

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.