Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरच्या कामगारांसाठी ESIS दवाखाना सुरू; ४० कोटींच्या निधीसह १०० खाटांच्या रुग्णालयाच्या मागणीला आरोग्यमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद

29/11/2026

नाट्यगृहाचा वाद | लोकप्रतिनिधींचा अपमान आणि शासनाच्या परिपत्रकाची पायमल्ली; संगमनेरच्या मुख्याधिकाऱ्यांवर कारवाईची माजी नगरसेवकांची आक्रमक मागणी! थेट मुख्यमंत्र्यांना निवेदन

29/11/2026

रविवार विशेष | सुप्रिया सुळेंना अजून हवं तरी काय?

29/11/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » ‘उडान’ उपक्रमातून घारगाव पोलिसांनी बालविवाह रोखला, सजग नागरिकांच्या माहितीमुळे पोलिसांना यश
गुन्हेगारी

‘उडान’ उपक्रमातून घारगाव पोलिसांनी बालविवाह रोखला, सजग नागरिकांच्या माहितीमुळे पोलिसांना यश

दरम्यान, कुठेही बालविवाह होत असेल तर 'उडान हेल्पलाईन १०९८' वर माहिती द्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. माहिती देणाऱ्याचे नाव पूर्णपणे गुप्त ठेवले जाते
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar12/04/2025Updated:12/04/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

घारगाव (संगमनेर) – 

संगमनेर तालुक्यातील घारगाव भागातील एका गावात शुक्रवारी (दि. ११) एका अल्पवयीन मुलीचा बालविवाह होणार असल्याची माहिती ‘उडान हेल्पलाईन’ आणि सजग नागरिकांकडून मिळाल्यानंतर घारगाव पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन हा बालविवाह रोखण्यात यश मिळवले.

पोलिस निरीक्षक विलास पुजारी यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळी रवाना झाले. त्यांना मिळालेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलगी आणि तिच्या कुटुंबियांना बालविवाह प्रतिबंधक कायद्याचे महत्त्व पटवून देण्यात आले.

‘स्नेहालय’च्या ‘उडान’ प्रकल्पाच्या कार्यकर्त्यांनी याबाबत स्थानिक प्रशासन, पंचायत समिती पदाधिकारी व बालविवाह प्रतिबंधक अधिकाऱ्यांशी संपर्क साधला होता. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचल्यावर कुटुंबीयांची ‘लग्नाची घाई नाही, मुलगी बालग्राममध्ये सुरक्षित आहे, त्यामुळे गैरसमज झाला आहे,’ अशी भूमिका घेत दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी कसून तपास केल्यावर बालविवाह होणार असल्याची माहिती समोर आली.

मुलगी अल्पवयीन असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आणि बालविवाह कायद्याचे उल्लंघन होत असल्याचे लक्षात आल्यानंतर, दोन्ही कुटुंबांना ताब्यात घेण्यात आले. दोन्ही कुटुंबांचे समुपदेशन करण्यात आले. अठरा वर्षे पूर्ण होईपर्यंत कोणतीही विवाहबाह्य कृती न करण्याचे त्यांना लेखी हमीपत्र देण्यास सांगण्यात आले. बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार जर यापुढे असा प्रयत्न केला गेला तर सर्वजण कारवाईस पात्र ठरतील व त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे नोटीसद्वारे पोलिसांनी संबंधितांना बजावले आहे.

दरम्यान, कुठेही बालविवाह होत असेल तर ‘उडान हेल्पलाईन १०९८’ वर माहिती द्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. माहिती देणाऱ्याचे नाव पूर्णपणे गुप्त ठेवले जाते, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 1,253
घारगाव पोलीस बालविवाह
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

वाळू वाहतुकीसाठी ४० हजारांचा हप्ता घेताना पोलिस हवालदार जाळ्यात; लाचलुचपत विभागाची कारवाई

26/11/2026

अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; एकाच दिवसात ३७ ठिकाणी छापे, १ लाख ८८ हजारांचा मुद्देमाल जप्त

26/11/2026

निवृत्त पोलिस अधिकाऱ्यावर विनयभंग, मारहाण आणि धमकीचा गुन्हा; केडगाव हत्याकांड व अहिल्यानगर-संगमनेर कारकिर्दीची पुन्हा चर्चा

25/11/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

संगमनेरच्या कामगारांसाठी ESIS दवाखाना सुरू; ४० कोटींच्या निधीसह १०० खाटांच्या रुग्णालयाच्या मागणीला आरोग्यमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद

By Annant Ppangarkar29/11/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर तालुक्यातील औद्योगिक कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांना दर्जेदार वैद्यकीय सुविधा मिळाव्यात,…

नाट्यगृहाचा वाद | लोकप्रतिनिधींचा अपमान आणि शासनाच्या परिपत्रकाची पायमल्ली; संगमनेरच्या मुख्याधिकाऱ्यांवर कारवाईची माजी नगरसेवकांची आक्रमक मागणी! थेट मुख्यमंत्र्यांना निवेदन

29/11/2026

रविवार विशेष | सुप्रिया सुळेंना अजून हवं तरी काय?

29/11/2026

आजचे राशीभविष्य – २९ नोव्हेंबर २०२६

29/11/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.