Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

पोलिसांची गुटख्याविरोधात मोठी कारवाई; सिनेस्टाईल पाठलाग करून ५१ लाखांचा मुद्देमाल जप्त

25/08/2026

संगमनेरमध्ये सह्याद्री कॉलेज शेजारील ‘बर्गेज कॅफे’वर पोलिसांची धाड; अश्लील चाळ्यांसाठी जागा पुरवणाऱ्या चालकावर गुन्हा दाखल

25/08/2026

निमोण-सोनेवाडीतील तरुणांचा शिवसेनेत प्रवेश, आमदार खताळ यांच्या कामाच्या पद्धतीवर विश्वास

25/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » महिलांनी ओढला हनुमान रथ, मिरवणुकीत झालेल्या वादामुळे परंपरेला गालबोट!
धार्मिक

महिलांनी ओढला हनुमान रथ, मिरवणुकीत झालेल्या वादामुळे परंपरेला गालबोट!

चंद्रशेखर चौकातून निघालेला रथ शहराच्या विविध मार्गावरून पुन्हा दुपारी चंद्रशेखर चौकात आल्यानंतर मिरवणुकीची सांगता झाली.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar12/04/2025Updated:12/04/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, दि.१२ एप्रिल – प्रतिनिधी

संगमनेर शहरात हनुमान जयंतीनिमित्त आयोजित रथाच्या मिरवणुकीत एक ब्रिटिशकालीन अनोखी परंपरा पाहायला मिळाली. परंपरेनुसार, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आणलेला मानाचा ध्वज रथावर लावण्यात आला. त्यानंतर महिलांनी मोठ्या उत्साहात आणि आनंदात हनुमान रथाचा दोर धरून ओढण्यास सुरुवात केली.

या मिरवणुकीत संगमनेरचे नवनिर्वाचित आमदार अमोल खताळ आणि त्यांच्या पत्नी नीलम खताळ यांनीही सहभाग घेतला होता. महिलांनी रथ ओढल्यानंतर काही वेळातच मिरवणुकीत सहभागी असलेल्या ढोल पथकाला रथापुढे ढोल वाजविण्यापासून रोखत रथ पुढे नेण्याचा प्रयत्न झाल्याने निर्माण झालेल्या वादामुळे वातावरण काहीसे तणावपूर्ण झाले. हिंदू राजा प्रतिष्ठानच्या ढोल पथकातील कार्यकर्ते आणि मिरवणूक आयोजक कार्यकर्त्यांमध्ये जोरदार वाद झाला. यात एकमेकाला धक्काबुक्की देखील करण्यापर्यंत मजल गेली.

महिलांच्या अनेक वर्षांच्या रथ ओढण्याच्या परंपरेला या वादामुळे गालबोट लागले. काही काळ या गोंधळामुळे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही निर्माण झाला होता. कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली आणि त्याचे पर्यवसान आमदार अमोल खताळ यांच्यासमोरच फ्री स्टाईल धक्काबुक्की करण्यात झाले. पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत दोन्ही गटातील कार्यकर्त्यांना बाजूला केले आणि त्यानंतर मिरवणूक पुन्हा मार्गस्थ झाली.

कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या या हाणामारीमुळे काही काळ मानापमान नाट्य रंगले होते. रथ मिरवणूक सुरू झाल्यानंतर नेमके कोणामध्ये वाद झाला, याचे नेमके कारण मात्र समजू शकले नाही.

दरम्यान, संगमनेरच्या माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे आणि युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ. जयश्री थोरात यांनीही मिरवणुकीत सहभाग घेतला होता. शेकडो संगमनेरकर महिला या गावाच्या उत्साहात सहभागी झाल्या होत्या. मात्र, कार्यकर्त्यांच्या वादाच्या या घटनेमुळे मिरवणुकीच्या उत्साहावर काही प्रमाणात विरजण पडले होते.

चंद्रशेखर चौकातून निघालेला रथ शहराच्या विविध मार्गावरून पुन्हा दुपारी चंद्रशेखर चौकात आल्यानंतर मिरवणुकीची सांगता झाली.

हनुमान रथ मिरवणुकीतील विविध छायाचित्रे छायाचित्रकार राजेंद्र सुतार यांच्या कॅमेऱ्यातून ‘महाराष्ट्र संवाद’च्या वाचकांसाठी…

पोलिसांनी मानाचा ध्वज मिरवणुकीने आणला.
पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख आणि आमदार अमोल खताळ यांनी हा ध्वज रथावर चढविला.
परंपरेनुसार रथ ओढत महिलांनी मिरवणुकीला सुरुवात केली.
मिरवणुकीला प्रारंभ.
anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 2,941
वादावादी हनुमान जयंती रथोत्सव
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरमध्ये ‘बाजारपेठ व्यापारी मित्र मंडळा’चा ऐतिहासिक निर्णय; यंदा गणपती वर्गणीसाठी वापरणार ‘डिजिटल पावती ॲप’

12/08/2026

श्री सोमेश्वर रंगारगल्ली मित्र मंडळ गणेशोत्सवाची नूतन कार्यकारी कार्यकारिणी जाहीर; नव्या पदाधिकाऱ्यांमध्ये यांचा आहे समावेश

10/08/2026

संगमनेर एसटी आगाराला बा विठ्ठल पावला… तब्बल इतक्या लाखांची कमाई

03/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

पोलिसांची गुटख्याविरोधात मोठी कारवाई; सिनेस्टाईल पाठलाग करून ५१ लाखांचा मुद्देमाल जप्त

By Annant Ppangarkar25/08/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  अहिल्यानगर: अहिल्यानगर जिल्ह्यातील खर्डा पोलिसांनी प्रतिबंधित गुटखा आणि तंबाखूजन्य…

संगमनेरमध्ये सह्याद्री कॉलेज शेजारील ‘बर्गेज कॅफे’वर पोलिसांची धाड; अश्लील चाळ्यांसाठी जागा पुरवणाऱ्या चालकावर गुन्हा दाखल

25/08/2026

निमोण-सोनेवाडीतील तरुणांचा शिवसेनेत प्रवेश, आमदार खताळ यांच्या कामाच्या पद्धतीवर विश्वास

25/08/2026

आज मंगळवार, २५ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

25/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.