Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज बुधवार, २ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

02/09/2026

पोलिसांच्या ताब्यात असलेल्या तरुणाला आमदार खताळ यांच्या कार्यकर्त्याकडून मारहाण; संदेश देशमुख यांच्यावर एनसी दाखल

01/09/2026

दारूच्या नशेत झालेल्या वादातून मारहाण करून हत्या करणाऱ्या आरोपीस जन्मठेप; संगमनेर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

01/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » चोरीच्या उद्देशाने झालेल्या हत्याकांडातील जखमी महिलेचाही मृत्यू, एकाच कुटुंबातील तिघांचा बळी
गुन्हेगारी

चोरीच्या उद्देशाने झालेल्या हत्याकांडातील जखमी महिलेचाही मृत्यू, एकाच कुटुंबातील तिघांचा बळी

दुर्दैवी घटनेत ५ एप्रिल रोजी चोरट्यांनी साहेबराव पोपट भोसले (वय अंदाजे ६५) आणि त्यांचा मुलगा कृष्णा साहेबराव भोसले (वय अंदाजे ३०) यांची हत्या केली होती. त्यावेळी साहेबराव यांच्या पत्नी साखरबाई गंभीर जखमी झाल्या होत्या.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar14/04/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

शिर्डी –

शिर्डी विमानतळाजवळील काकडी शिवारात काही दिवसांपूर्वी झालेल्या दुहेरी हत्याकांडात गंभीर जखमी झालेल्या साखरबाई साहेबराव भोसले (वय अंदाजे ६०) यांचा रविवारी (दि. १३ एप्रिल) उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे एकाच कुटुंबातील तीन सदस्यांचा बळी गेला आहे.

या दुर्दैवी घटनेत ५ एप्रिल रोजी चोरट्यांनी साहेबराव पोपट भोसले (वय अंदाजे ६५) आणि त्यांचा मुलगा कृष्णा साहेबराव भोसले (वय अंदाजे ३०) यांची हत्या केली होती. त्यावेळी साहेबराव यांच्या पत्नी साखरबाई गंभीर जखमी झाल्या होत्या. आठवडाभर मृत्यूशी झुंज दिल्यानंतर अखेर रविवारी त्यांची प्राणज्योत मालवली.

चोरीच्या उद्देशाने घरात घुसलेल्या मारेकऱ्यांनी केलेल्या या क्रूर कृत्यामुळे भोसले कुटुंब पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे. वडील आणि मुलाचा दशक्रिया विधी होण्यापूर्वीच आईचाही मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.

या घटनेतील आरोपी संदीप दहाबाड (वय १८) आणि जगन काशिनाथ किरकिरे (वय २५) हे दोघे तरुण भोसले यांच्या नातेवाईकांनी त्यांच्या शेतात जनावरांसाठी मुरघास बनवण्यासाठी आणले होते. भोसले यांचा दुग्ध व्यवसाय असल्याने या दोघांनी त्यांना मुरघास बनवून दिला होता. याच ओळखीचा गैरफायदा घेत या दोघांनी घरात चोरी करण्याचा कट रचला.

मुरघासचे काम संपल्यानंतर ५ एप्रिलच्या रात्री दबा धरून बसलेल्या या दोघांनी पहाटे भोसले यांच्या घराचा दरवाजा ठोठावला. ओळखीच्या आवाजामुळे दरवाजा उघडताच त्यांनी धारदार हत्यार आणि फावड्याने हल्ला केला. यात कृष्णा आणि साहेबराव यांचा जागीच मृत्यू झाला, तर साखरबाई गंभीर जखमी झाल्या. आरोपींनी घरातून मोबाईल आणि सोन्याचे दागिने चोरून मोटारसायकलवरून पलायन केले होते.

पोलिसांनी तातडीने तपास करत बारा तासांच्या आत दोन्ही आरोपींना सिन्नरमधील पळसे टोलनाक्याजवळ अटक केली. त्यांनी चोरीच्या उद्देशानेच हे कृत्य केल्याची कबुली दिली असून, त्यांच्याकडून चोरी केलेले सोन्याचे दागिने पोलिसांनी जप्त केले आहेत. सध्या दोन्ही आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत. एकाच कुटुंबातील तिघांच्या निर्घृण हत्येमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे.

या गुन्ह्यातील तपासी अधिकारी तथा शिर्डीचे पोलीस उपअधीक्षक शिरिष वमने यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले की दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी ९० दिवसांचा कालावधी आहे. तसेच, इतर तपास सुरू असल्याने आरोपींकडून जप्त केलेल्या सोन्याच्या दागिन्यांची खातरजमा आणि मोजदाद अद्याप केलेली नाही. पोलिसांनी नऊ दिवस उलटूनही जप्त केलेल्या मुद्देमालाचा तपशील जाहीर न केल्याने नागरिकांकडून संशय व्यक्त केला जात आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,734
काकडी हत्याकांड मृत्यू
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

पोलिसांच्या ताब्यात असलेल्या तरुणाला आमदार खताळ यांच्या कार्यकर्त्याकडून मारहाण; संदेश देशमुख यांच्यावर एनसी दाखल

01/09/2026

जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर एलसीबीचा सर्जिकल स्ट्राईक; एकाच दिवशी ६ छापे, सुमारे ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

30/08/2026

वाळू तस्करांवर कारवाई, ट्रॅक्टरसह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांना अटक तर तिघे फरार

30/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज बुधवार, २ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

By Annant Ppangarkar02/09/20260

Annant Ppangarkar आजचे राशीभविष्य- मेष – आजचा दिवस आपल्यासाठी ऊर्जा आणि उत्साहाने भरलेला राहील. कामाच्या…

पोलिसांच्या ताब्यात असलेल्या तरुणाला आमदार खताळ यांच्या कार्यकर्त्याकडून मारहाण; संदेश देशमुख यांच्यावर एनसी दाखल

01/09/2026

दारूच्या नशेत झालेल्या वादातून मारहाण करून हत्या करणाऱ्या आरोपीस जन्मठेप; संगमनेर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

01/09/2026

महायुती सरकारचा मोठा निर्णय: भोजापूर पूरचारीचा नदीजोड प्रकल्पात समावेश; संगमनेर, सिन्नर तालुक्यातील दुष्काळी ३५ गावांना दिलासा!

01/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.