Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आमदार अमोल खताळ यांनी वेधले ऊर्जा राज्यमंत्र्यांचे लक्ष; मेंढवन उपकेंद्राचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी

10/10/2026

शनिवार १० ऑक्टोंबर — जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा असेल

10/10/2026

३९ ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त, तरी आरोपीला जामीन! संगमनेर न्यायालयाच्या आदेशात नेमके काय?

09/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » भारताच्या संविधानाचा जगभरात गौरव, अभिमानास्पद: पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील
धार्मिक

भारताच्या संविधानाचा जगभरात गौरव, अभिमानास्पद: पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

केंद्र सरकारने संविधान दिन साजरा करण्‍याची घोषणा करून एकप्रकारे भारतरत्‍न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा उचीत गौरव केला असून केंद्र आणि राज्‍य सरकारच्‍या प्रत्‍येक योजनेमध्‍ये बाबासाहेबांच्‍या विचारांचे प्रतिबिंब पहायला मिळते.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar14/04/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर दि.१४ – प्रतिनिधी

भारतरत्‍न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्‍या माध्‍यमातून जनतेला हक्‍क आणि अधिकार मिळवून दिले. त्‍यामुळेच भारताच्‍या संविधानाचा संपूर्ण जगात होणारा गौरव सर्वांना अभिमानास्पद आहे. देशामध्‍ये संविधान दिन सुरू करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्‍यघटनेच्‍या पवित्र ग्रंथाचे महत्‍व अधोरेखित केले असल्‍याचे प्रतिपादन जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी केले.

महामानव भारतरत्‍न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या १३४ व्‍या जयंती दिनाचे औचित्‍य साधून लोणी खुर्द येथे समता युवा संघटनेच्‍यावतीने तसेच लोणी बुद्रुक येथे जनसेवा युवा प्रतिष्‍ठाणच्‍यावतीने आयोजीत करण्‍यात आलेल्‍या अभिवादन कार्यक्रमात मंत्री विखे पाटील यांनी डॉ. आंबेडकर यांच्‍या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले. संविधानाच्‍या उद्देशिकेचे सामूहीक वाचन करण्‍यात आले. संविधान ग्रंथाचे वितरणही याप्रसंगी करण्‍यात आले. लोणी बुद्रुक येथील कार्यक्रमात किराणा साहित्‍याचे वाटप करण्‍यात आले.

मंत्री विखे म्‍हणाले की, भारताच्‍या पावन भूमीत अनेक महापुरूषांनी जन्‍म घेतला. समाजातील शेवटच्‍या घटकाला न्‍याय मिळवून देण्‍यासाठी त्‍यांनी पराकोटीचा संघर्ष केला. अशा थोर महापुरूषांमध्‍ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव हे प्राधान्‍याने घ्‍यावे लागेल. त्‍यांचे व्‍यक्‍तीमत्‍व हे अष्‍टपैलू होते. सामाजीक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक अशा सर्व विषयांमध्‍ये त्‍यांचे ज्ञान खुप मोठे होते. समाजातील वंचीत आणि सोशितांच्‍या जीवनात प्रकाश आणण्‍याचे काम त्‍यांनी केले. त्‍यामुळेच ते क्रांतीचे जनक म्‍हणून ओळखले गेले.

शिक्षणानेच समाजाची वैचारीक क्षमता वाढेल, यातून त्‍यांना हक्‍काची जाणीव होईल. त्‍यामुळेच त्‍यांनी शिक्षणाचा शेवटपर्यंत प्रसार केला. यातूनच समाजामध्‍ये क्रांतीकारी बदल झाले. जातीभेदाची किड नष्‍ट झाल्‍याशिवाय देश एकसंघ होणार नाही. अशी ठाम भूमीका असलेल्‍या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्‍या उक्‍ती आणि कृतीमध्‍ये प्रखर राष्‍ट्रप्रेम आणि राष्‍ट्रनिष्‍ठा भरलेली होती. त्‍यांनी दिलेल्‍या संविधानामुळेच आपला देश यशस्‍वीपणे वाटचाल करीत आहे. केवळ त्‍यांच्‍या नावाचा उपयोग करून समाजामध्‍ये संभ्रम निर्माण करण्‍याचे काम केले जाते. ही खंत त्‍यांनी व्‍यक्‍त केली.

केंद्र सरकारने संविधान दिन साजरा करण्‍याची घोषणा करून एकप्रकारे भारतरत्‍न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा उचीत गौरव केला असून केंद्र आणि राज्‍य सरकारच्‍या प्रत्‍येक योजनेमध्‍ये बाबासाहेबांच्‍या विचारांचे प्रतिबिंब पहायला मिळते. इंदू मिल येथील राष्‍ट्रीय स्‍मारकाचे काम राज्‍य सरकार लवकरच पुर्ण करणार असल्याची ग्‍वाही त्यांनी दिली.

संगमनेरात केले अभिवादन… पालकमंत्री विखे विवाह सोहळ्याच्या निमिताने संगमनेर तालुक्यात होते. शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास त्यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. आ. अमोल खताळ, आरपीआयचे तालुका अध्यक्ष आशिष शेळके यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 585
आंबेडकर जयंती राधाकृष्ण विखे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

सूचकांच्या एका निर्णयाने जिल्हा बँकेच्या निवडणुकीला नवा ट्विस्ट; संगमनेर-राहात्यातील समीकरणे घडली, विखे-देशमुखांच्या गुलालाचा मार्ग मोकळा?

06/10/2026

चंदनापुरी येथे ‘वसुंधरा पायी दिंडी’चे स्वागत व वृक्षारोपण— बदलत्या हवामानावर मात करण्यासाठी प्रत्येकाने झाड लावून संवर्धन करावे: आमदार अमोल खताळ

03/10/2026

अंगारकी चतुर्थीनिमित्त श्री वरदविनायकाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी, आमदार डॉ. किरण लहामटे यांच्यासह हजारो भाविकांनी घेतले दर्शन; खिचडी महाप्रसाद व सामुदायिक अथर्वशीर्ष पठणाने कोतूळ नगरी भक्तिमय

30/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

आमदार अमोल खताळ यांनी वेधले ऊर्जा राज्यमंत्र्यांचे लक्ष; मेंढवन उपकेंद्राचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी

By Annant Ppangarkar10/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- मतदारसंघातील वीजपुरवठ्याशी संबंधित गंभीर समस्या तातडीने सोडवण्यासाठी आमदार अमोल खताळ पाटील…

शनिवार १० ऑक्टोंबर — जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा असेल

10/10/2026

३९ ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त, तरी आरोपीला जामीन! संगमनेर न्यायालयाच्या आदेशात नेमके काय?

09/10/2026

सायखिंडी फाटा गांजा तस्करीत आरोपींना पुन्हा १२ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कस्टडी; बँक खात्यांचे आर्थिक व्यवहार पोलिसांच्या रडारवर

09/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.