Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

राजहंस हा गुणवत्तेचा आणि विश्वासाचा अस्सल ब्रँड: माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

17/09/2026

१८ व्या संगमनेर फेस्टिवलचे दिमाखदार उद्घाटन; समीर चौगुलेंच्या ‘सम्या-सम्या मैफिलीत माझ्या’ने संगमनेरकर मनमुराद हसले

17/09/2026

आमदार सत्यजीत तांबे यांच्या संकल्पनेतून ‘महावादन’चा जल्लोष; संगमनेर दुमदुमले!

17/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » तरुणाचे अपहरण करून निर्घृण खून; ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
गुन्हेगारी

तरुणाचे अपहरण करून निर्घृण खून; ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

या घटनेनंतर सर्व संशयित फरार असून, पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक जितेंद्र पाटील आणि त्यांचे पथक त्यांचा कसून शोध घेत आहेत.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar17/04/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज – राहाता 

राहाता तालुक्यातील गणेशनगर येथून एका १९ वर्षीय युवकाचे अपहरण करून, लोखंडी रॉडने अमानुष मारहाण करत त्याचा खून करण्यात आला. आरोपींनी पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह सिन्नर तालुक्यातील मुसळगाव शिवारात स्कोडा गाडीच्या डिकीत टाकून दिला. या घृणास्पद कृत्याप्रकरणी सिन्नर एमआयडीसी पोलिसांनी सहा संशयितांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

मृत युवकाचे नाव प्रतीक वसंत सदाफळ (वय १९) असे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि. १२) रात्री सुमारे ११ वाजता गणेशनगर येथील निर्मळ रुग्णालयासमोरून त्याचे अपहरण झाले. संशयितांनी त्याला सिल्व्हर रंगाच्या स्कोडा गाडीच्या डिकीत टाकले आणि अज्ञात स्थळी नेऊन लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली, ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर आरोपींनी मृतदेह सिन्नर-शिर्डी महामार्गालगत मुसळगाव शिवारात वनीकरण विभागाच्या नालीच्या पायथ्याशी फेकून दिला.

मृतक प्रतीकचे काही दिवसांपूर्वी संशयित प्रशांत जनार्दन जाधव, अक्षय पगारे, चंदू तहकीक, ओमकार शैलेष रोहम, प्रवीण वाघमारे आणि सोनू पवार यांच्यासोबत किरकोळ कारणावरून वाद झाले होते. याच वादातून तरुणांनी प्रतीकचे अपहरण करून त्याचा खून केल्याचा संशय आहे. प्रतीक बेपत्ता असल्याची तक्रार त्याच्या आईने यापूर्वी वैजापूर पोलीस ठाण्यात दाखल केली होती.

दरम्यान, १३ एप्रिलच्या रात्री १२.१५ वाजता मयत प्रतीकचा भाऊ रितेश सदाफळ याला संशयित प्रशांत उर्फ बाबू जनार्दन जाधव याने त्याच्या भावाच्या मोबाईलवरून व्हिडिओ कॉल केला. कॉलमध्ये त्याचा भाऊ मृतावस्थेत आणि विवस्त्र अवस्थेत दिसत होता, अशी फिर्याद रितेश सदाफळ याने सिन्नर एमआयडीसी पोलिसांकडे नोंदवली.

या फिर्यादीनुसार पोलिसांनी संशयित प्रशांत उर्फ बाबू जनार्दन जाधव (रा. शिर्डी), अक्षय पगारे (रा. शिर्डी), चंदू तहकीत (रा. सावळी विहीर, राहाता), ओमकार शैलेश रोहम (रा. राहाता), प्रवीण वाघमारे (रा. कालिकानगर, शिर्डी) आणि सोनू पवार (रा. सावळी विहीर, राहाता) या सहा जणांविरुद्ध भारतीय दंड विधान कलम ३०२ (खून) आणि इतर संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे.

या घटनेनंतर सर्व संशयित फरार असून, पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक जितेंद्र पाटील आणि त्यांचे पथक त्यांचा कसून शोध घेत आहेत. या घटनेमुळे राहाता आणि शिर्डी परिसरात खळबळ उडाली आहे. परिसरात अवैध धंदे, हाणामारी, शिवीगाळ आणि अपहरणाच्या घटनांमध्ये वाढ झाली असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 2,355
गुन्हेगारी हत्या
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

ओम ज्वेलर्स चोरी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेकडून पर्दाफाश; तिघांना अटक, मिरजगाव येथील गुन्ह्याचीही उकल

16/09/2026

पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय, गणेशोत्सवादरम्यान ‘यांना’ संगमनेर व अकोले तालुक्यात प्रवेश बंदीचे आदेश जारी___वाचा यादी

15/09/2026

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर संगमनेर उपविभागात पोलीस प्रशासनाची मोठी कारवाई; गुन्हेगारी पार्श्वभूमीचे सात जण जिल्ह्यातून हद्दपार

15/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शेती व सहकार

राजहंस हा गुणवत्तेचा आणि विश्वासाचा अस्सल ब्रँड: माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

By Annant Ppangarkar17/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- अवघ्या १५०० लिटर दुधापासून सुरू झालेला संगमनेर तालुका सहकारी…

१८ व्या संगमनेर फेस्टिवलचे दिमाखदार उद्घाटन; समीर चौगुलेंच्या ‘सम्या-सम्या मैफिलीत माझ्या’ने संगमनेरकर मनमुराद हसले

17/09/2026

आमदार सत्यजीत तांबे यांच्या संकल्पनेतून ‘महावादन’चा जल्लोष; संगमनेर दुमदुमले!

17/09/2026

काळाची गरज ओळखून धाडसी दूरदृष्टीचे आणि शेतकरी हिताचे निर्णय घेणे आपली सामूहिक जबाबदारी; बाळासाहेब थोरात यांचे प्रतिपादन

17/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.