Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज शनिवार 19 सप्टेंबर, जाणून घ्या आजचे सर्व राशीचे राशिभविष्य

19/09/2026

संगमनेरमधील वादग्रस्त ड्रग प्रकरण अखेर स्थानिक गुन्हे शाखेकडे; मात्र निर्दोषाला गोवणाऱ्या खाकी वर्दीतील ‘त्या’ अधिकाऱ्यावर कारवाई कधी?

18/09/2026

निष्क्रिय लोकांनी विकासावर बोलू नये; मुरूम-वाळूच्या पुढे न जाणाऱ्या लोकप्रतिनिधींवर बाळासाहेब थोरातांचा घणाघात

18/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरमध्ये गोवंश जनावरांची कत्तल, आरोपी पसार; सुमारे साडेसात लाखाचा मुद्देमाल हस्तगत
गुन्हेगारी

संगमनेरमध्ये गोवंश जनावरांची कत्तल, आरोपी पसार; सुमारे साडेसात लाखाचा मुद्देमाल हस्तगत

संगमनेरचे पोलीस उपअधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे यांना मदिनानगरमध्ये गोवंश जनावरांची कत्तल होत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे त्यांनी आपल्या कार्यालयातील पोलीस कॉन्स्टेबल राहुल सारबंदे, पोलीस नाईक राहुल डोके यांना कारवाईचे आदेश दिले.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar20/04/2025Updated:20/04/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर

संगमनेर शहरातील मदिनानगर येथे गोवंश जनावरांची कत्तल केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुलाम साबेर कुरेशी याच्यासह एका अनोळखी व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला. आरोपीच्या शेडमधून सुमारे ९०० किलो रिट्स कार मधून ६०० किलो गोमांस आणि कत्तल करण्यासाठी बांधून ठेवलेली चार जनावरे जप्त केली आहेत.

संगमनेरचे पोलीस उपअधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे यांना मदिनानगरमध्ये गोवंश जनावरांची कत्तल होत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे त्यांनी आपल्या कार्यालयातील पोलीस कॉन्स्टेबल राहुल सारबंदे, पोलीस नाईक राहुल डोके यांना कारवाईचे आदेश दिले.

पोलीस अधीक्षकांच्या पथकातील राहुल सारबंदे आणि राहुल डोके यांनी रविवारी रात्रपाळीच्या गस्तीवर असलेल्या संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक इम्रान खान व पोलीस कॉन्स्टेबल शशिकांत दाभाडे यांच्यासह पंचांना सोबत घेत मिळालेल्या माहितीच्या आधारे मध्यरात्री तीन वाजण्याच्या सुमारास शेडवर छापा टाकला. त्यावेळी गुलाम कुरेशी आणि त्याचा एक साथीदार पोलिसांना पाहून पळून गेले. पोलिसांनी शेडची तपासणी केली असता, तिथे जनावरांचे मांस आणि कत्तल करण्यासाठी बांधलेली जनावरे आढळून आली.

पोलिसांनी घटनास्थळावरून ३,७५,००० रुपये किमतीचे १५०० किलो गोमांस, ३,००,००० रुपये किमतीची एक मारुती सुझुकी रिट्झ कार, ६०,००० रुपये किमतीच्या ३ मोठ्या काळ्या गाई आणि ५००० रुपये किमतीचे एक वासरू जप्त केले. पोलिसांनी जप्त केलेले मांस रासायनिक तपासणीसाठी पाठवले असून, जनावरांना जीवदया गोशाळा, सायखिंडी येथे हलवले आहे.

संगमनेर शहर पोलीस ठाण्यात पोलीस कॉन्स्टेबल राहुल सारबंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुलाम कुरेशी आणि त्याच्या साथीदारावर भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम २७१, ३२५, ३(५), प्राण्यांना क्रूर वागणूक प्रतिबंधक अधिनियम १९६० च्या कलम ३,११ आणि महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम १९७६ च्या कलम ५(क), ९(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,795
कत्तलखाना छापा गुन्हेगारी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरमधील वादग्रस्त ड्रग प्रकरण अखेर स्थानिक गुन्हे शाखेकडे; मात्र निर्दोषाला गोवणाऱ्या खाकी वर्दीतील ‘त्या’ अधिकाऱ्यावर कारवाई कधी?

18/09/2026

अवैध वाळू तस्करांवर एलसीबीचा दणका; ३० लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त, ३ आरोपींना बेड्या

18/09/2026

ओम ज्वेलर्स चोरी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेकडून पर्दाफाश; तिघांना अटक, मिरजगाव येथील गुन्ह्याचीही उकल

16/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज शनिवार 19 सप्टेंबर, जाणून घ्या आजचे सर्व राशीचे राशिभविष्य

By Annant Ppangarkar19/09/20260

आजचे राशिभविष्य  मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत सकारात्मक आणि उत्साहवर्धक राहील. कार्यक्षेत्रात नवीन संधी…

संगमनेरमधील वादग्रस्त ड्रग प्रकरण अखेर स्थानिक गुन्हे शाखेकडे; मात्र निर्दोषाला गोवणाऱ्या खाकी वर्दीतील ‘त्या’ अधिकाऱ्यावर कारवाई कधी?

18/09/2026

निष्क्रिय लोकांनी विकासावर बोलू नये; मुरूम-वाळूच्या पुढे न जाणाऱ्या लोकप्रतिनिधींवर बाळासाहेब थोरातांचा घणाघात

18/09/2026

गाजलेल्या गीतांचा नजराणा संगमनेरकरांना ‘दिल से’ आवडला! ‘संगमनेर फेस्टिव्हल’चा दुसरा दिवस; रहेमान म्युझिकने गाजवला

18/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.