Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

पोलिसांच्या ताब्यात असलेल्या तरुणाला आमदार खताळ यांच्या कार्यकर्त्याकडून मारहाण; संदेश देशमुख यांच्यावर एनसी दाखल

01/09/2026

दारूच्या नशेत झालेल्या वादातून मारहाण करून हत्या करणाऱ्या आरोपीस जन्मठेप; संगमनेर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

01/09/2026

महायुती सरकारचा मोठा निर्णय: भोजापूर पूरचारीचा नदीजोड प्रकल्पात समावेश; संगमनेर, सिन्नर तालुक्यातील दुष्काळी ३५ गावांना दिलासा!

01/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » निळवंडे लाभक्षेत्रात बंदिस्त पाइपलाइनद्वारे पाणीपुरवठा: राधाकृष्ण विखे पाटील
बैठक

निळवंडे लाभक्षेत्रात बंदिस्त पाइपलाइनद्वारे पाणीपुरवठा: राधाकृष्ण विखे पाटील

शेतकऱ्यांपर्यंत पाणी पोहोचवण्यासाठी मध्यप्रदेशातील मोहनपुरा आणि कुंडलिया जलाशयांप्रमाणे स्काडा प्रणालीचा वापर करून बंदिस्त पाइपलाइनद्वारे पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव विचाराधीन
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar20/04/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर

निळवंडे धरणाच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना बंदिस्त पाइपलाइनद्वारे पाणीपुरवठा करण्याचा विचार सुरू असल्याची माहिती राज्याचे जलसंपदा मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी संगमनेर येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला आमदार डॉ. किरण लहामटे, आमदार अमोल खताळ, माजी आमदार वैभव पिचड, तहसीलदार धीरज मांजरे, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रदीप हापसे, कैलास ठाकरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्रीनिवास वर्पे यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.

निळवंडे धरणाचे लाभक्षेत्र मोठे असल्याने शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत पाणी पोहोचवण्यासाठी मध्यप्रदेशातील मोहनपुरा आणि कुंडलिया जलाशयांप्रमाणे स्काडा प्रणालीचा वापर करून बंदिस्त पाइपलाइनद्वारे पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन कालव्यांच्या अस्तरीकरणाबाबत एकत्रित अहवाल सादर करण्याचे निर्देश जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले. निळवंडे लाभक्षेत्रातील रस्त्यांचे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे.

पाण्यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या आणि धरणग्रस्तांच्या प्रश्नांवर स्वतंत्र बैठक घेतली जाईल. निळवंडे प्रकल्पासाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवरील गुन्हे मागे घेण्यासाठी मंत्रिमंडळासमोर अहवाल सादर करून पाठपुरावा केला जाईल. निळवंडे जलाशयाला स्व. मधुकरराव पिचड यांचे नाव देण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून योग्य निर्णय घेतला जाईल.

या बैठकीत आमदार डॉ. किरण लहामटे आणि माजी आमदार वैभव पिचड यांनीही आपले विचार मांडले आणि शेतकऱ्यांच्या समस्यांवर तोडगा काढण्याची मागणी केली. शेतकऱ्यांच्या समस्यांवर जलसंपदा विभाग प्राधान्य देईल आणि स्थानिक लोकप्रतिनिधींच्या मतांचा विचार करून सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन पालकमंत्री विखे पाटील यांनी दिले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,686
अमोल खताळ किरण लहामटे राधाकृष्ण विखे वैभव पिचड
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026

कृष्णाच्या कुटुंबीयांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार: आमदार अमोल खताळ यांनी घेतली पवार कुटुंबीयांची भेट

30/08/2026

आमदार खताळ यांच्या प्रयत्नांना यश; डोळासणे निवासी वीजजोडणीसाठी १० लाखांचा निधी मंजूर, प्रत्यक्ष कामालाही सुरुवात

26/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

पोलिसांच्या ताब्यात असलेल्या तरुणाला आमदार खताळ यांच्या कार्यकर्त्याकडून मारहाण; संदेश देशमुख यांच्यावर एनसी दाखल

By Annant Ppangarkar01/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  (विशेष प्रतिनिधी): संगमनेर शहरातील खांडेश्वर मंदिरात दर्शनासाठी आलेल्या एका…

दारूच्या नशेत झालेल्या वादातून मारहाण करून हत्या करणाऱ्या आरोपीस जन्मठेप; संगमनेर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

01/09/2026

महायुती सरकारचा मोठा निर्णय: भोजापूर पूरचारीचा नदीजोड प्रकल्पात समावेश; संगमनेर, सिन्नर तालुक्यातील दुष्काळी ३५ गावांना दिलासा!

01/09/2026

आज मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

01/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.