Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

विधान परिषद निवडणूक : १७ पैकी ५ जागांवर उमेदवार बिनविरोध, वाचा कोणाचा आहे समावेश

June 4, 2026

‘लग्न आणि धर्म परिवर्तना’साठी दबाव; पीडित महिला अधिकाऱ्याचा राजीनामा, ‘कॉर्पोरेट जिहाद’चा आरोप

June 4, 2026

शासकीय कामात अडथळा आणणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल; प्रशासकीय कारवाईदरम्यान राडा

June 4, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » सहाय्यक पोलीस निरीक्षक हत्याकांड प्रकरणी मुख्य आरोपीला जन्मठेपेची शिक्षा, तर दोघांना ७ वर्षांचा कारावास
न्यायालय

सहाय्यक पोलीस निरीक्षक हत्याकांड प्रकरणी मुख्य आरोपीला जन्मठेपेची शिक्षा, तर दोघांना ७ वर्षांचा कारावास

पनवेल सत्र न्यायालय अभय कुरुंदकर आणि इतर आरोपींना फाशीची शिक्षा सुनावणार की जन्मठेप, याबद्दल मोठी उत्सुकता होती.
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरApril 21, 2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज – पनवेल

संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिंद्रे हत्या प्रकरणात आज पनवेल सत्र न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. न्यायालयाने मुख्य आरोपी अभय कुरुंदकर याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या गुन्ह्यात सहभागी असलेले इतर दोन आरोपी, कुंदन भंडारी आणि महेश फाळणीकर, यांना प्रत्येकी सात वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले होते. मिरा रोड परिसरात २०१६ साली सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिंद्रे यांची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली होती. या हत्याकांडाचा मुख्य सूत्रधार अभय कुरुंदकर आणि अश्विनी बिंद्रे यांच्यामध्ये वैयक्तिक वाद होते, असा आरोप होता. हत्येनंतर आरोपींनी अश्विनी बिंद्रे यांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचाही प्रयत्न केला, असे तपासात निष्पन्न झाले होते.

अभय कुरुंदकरने साथीदार कुंदन भंडारी आणि महेश फाळणीकर यांच्या मदतीने अश्विनी बिंद्रे यांच्या मृतदेहाचे लाकूड कापण्याच्या कटरने लहान तुकडे केले. त्यानंतर हे तुकडे काही काळ रेफ्रिजरेटरमध्ये ठेवले आणि नंतर ते वसईच्या खाडीत वेगवेगळ्या ठिकाणी फेकून देण्यात आले. या अमानुष कृत्याने संपूर्ण पोलीस दलासह राज्यातील नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली होती.

पनवेल सत्र न्यायालय अभय कुरुंदकर आणि इतर आरोपींना फाशीची शिक्षा सुनावणार की जन्मठेप, याबद्दल मोठी उत्सुकता होती. अश्विनी बिंद्रे यांचे कुटुंबीय, पोलीस दल, विविध महिला संघटना आणि सामान्य नागरिक या निकालाकडे डोळे लावून बसले होते. अखेर, न्यायालयाने आज महत्त्वपूर्ण निर्णय देत मुख्य आरोपी अभय कुरुंदकरला जन्मठेपेची शिक्षा सुनावली, तर त्याच्या दोन साथीदारांना सात वर्षांच्या कारावासाची शिक्षा दिली आहे. या निकालामुळे बिंद्रे कुटुंबियांना काही प्रमाणात न्याय मिळाल्याची भावना आहे.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 1,425
अश्विनी बिंद्रे जन्मठेप निर्णय शिक्षा
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

राजेंद्र गडगे याला न्यायालयाचा दिलासा; गंभीर गुन्ह्यांत मिळाला नियमित जामीन

May 29, 2026

नसरापूर हत्याकांड: ६५ वर्षीय नराधमाभोवती कायद्याचा फास आवळला; कोर्टात रोज …

May 28, 2026

व्यावसायिक व्यवहाराचा संशय फिर्यादीला नडला; ‘चेक बाऊन्स’ प्रकरणात संगमनेरात आरोपी दोषमुक्त

May 17, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

विधान परिषद निवडणूक : १७ पैकी ५ जागांवर उमेदवार बिनविरोध, वाचा कोणाचा आहे समावेश

By अनंत पांगारकरJune 4, 20260

मुंबई : विशेष प्रतिनिधी राज्यातील विधान परिषद निवडणुकीत अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी मोठ्या राजकीय…

‘लग्न आणि धर्म परिवर्तना’साठी दबाव; पीडित महिला अधिकाऱ्याचा राजीनामा, ‘कॉर्पोरेट जिहाद’चा आरोप

June 4, 2026

शासकीय कामात अडथळा आणणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल; प्रशासकीय कारवाईदरम्यान राडा

June 4, 2026

सहा मटका अड्ड्यांवर पोलिसांचे छापे; दीड लाखांचा मुद्देमाल जप्त, १० जण ताब्यात

June 4, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.