Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेर नगर परिषदेचे मुख्याधिकारी रामदास कोकरे यांचा राज्यस्तरीय सन्मान!
यश / निवड / पुरस्कार

संगमनेर नगर परिषदेचे मुख्याधिकारी रामदास कोकरे यांचा राज्यस्तरीय सन्मान!

मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी वृक्ष संगोपन व संवर्धनासाठी 'सीड बँक' ही नाविन्यपूर्ण संकल्पना सादर केली.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar22/04/2025No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज – मुंबई

महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयोजित ‘राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान’ स्पर्धेत संगमनेर नगर परिषदेचे मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी उत्कृष्ट कामगिरी करत राज्याचा प्रतिष्ठित पुरस्कार पटकावला आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

महाराष्ट्र शासनाच्या वतीने नागरी सेवा दिन २०२५ च्या निमित्ताने राज्यातील नगरपालिका, महानगरपालिका तसेच शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी ‘राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता प्रगती अभियान’ अंतर्गत सन २०२३-२०२४ आणि सन २०२४-२०२५ या वर्षांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

या स्पर्धेत शासकीय अधिकारी म्हणून मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी वृक्ष संगोपन व संवर्धनासाठी ‘सीड बँक’ ही नाविन्यपूर्ण संकल्पना सादर केली. कोकरे यांच्या या उत्कृष्ट कार्याची दखल घेत महाराष्ट्र शासनाने त्यांचा विशेष सन्मान केला.

दिनांक २१ एप्रिल रोजी मुंबई येथील सह्याद्री राज्य अतिथी गृहात आयोजित एका विशेष समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि राज्याच्या मुख्य सचिव श्रीमती सुजाता सौनिक यांच्यासह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत रामदास कोकरे यांना पारितोषिक आणि सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले.

मुख्याधिकारी रामदास कोकरे यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल संगमनेर शहरात आनंदाचे वातावरण आहे. त्यांच्या कार्याचा गौरव झाल्याबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे. ‘सीड बँक’ सारख्या अभिनव उपक्रमातून त्यांनी पर्यावरणाचे जतन आणि संवर्धन करण्याच्या दृष्टीने उचललेले पाऊल निश्चितच प्रेरणादायी आहे, असे नागरिकांचे मत आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 1,296
पुरस्कार रामदास कोकरे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर येथे ३० ऑगस्टला ‘लोकनेते बाळासाहेब थोरात गुणगौरव पुरस्कार’ सोहळा; विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह २० शिक्षकांचा होणार सन्मान

23/08/2026

प्रवीण बागडे यांना ‘लोकशाहीर अण्णाभाऊ साठे साहित्यरत्न’ राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

18/08/2026

संगमनेर तालुका व शहर काँग्रेसच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर; अजय फटांगरे, सोमेश्वर दिवटे आणि अमोल शेलकर यांच्यावर मोठी जबाबदारी

18/07/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

By Annant Ppangarkar15/10/20260

आजचे राशिभविष्य- मेष – घरात शुभ कार्याचे आयोजन होईल. वाहन विषयक काम मार्गी लागेल. एखादी…

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.